मनाला स्पर्श करणारे सुविचार ….. ही वाईट वेळ आज ना उद्या निघून जात असते….. !!

Uncategorized

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाईट वेळी येतच असतात. आपण या जीवनात काहीतरी साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितींना आपल्याला सामोरे जावे लागते. काही वेळा आपल्या वाटेला सुख येतात. तर काही वेळेला खूप मोठे दुःख येते. अशा दुःखी परिस्थितीमध्ये आपले मन खूप नाराज होते. परंतु काही चांगल्या विचारांचा प्रभाव आपल्या मनावर अत्यंत पडत असतो. म्हणूनच आज आपण काही चांगले विचार जाणून घेणार आहोत.

 

“आपल्याला नेहमी तोंडावर खरं बोलण्याची सवय असते म्हणून आपण लोकांच्या नजरेत वाईट असतो परंतु तरीदेखील आपण खरंच बोललं पाहिजे”

यशस्वी व्हायचं असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते पण यशाचं शिखर गाठायचं असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते.

यशस्वी व्यक्ती म्हणजे जो सकाळी लवकर उठतो आणि आज कोणते काम करायचे आहे ते ठरवतो आणि रात्रीपर्यंत ती सर्व कामे कितीही त्रासानंतर पूर्ण करतो तोच व्यक्ती.

जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झालाच पाहिजे वाईट माणसं जिंकली तरी चालतील पण चांगला माणूस हारला नाही पाहिजे.

जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्ने लिहितात त्यांच्या नशिबाची पानं कधीच कोरी नसतात.

आनंद ही अशी एक वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो.

वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जर सगळंच आपलं होत गेलं असतं तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत कधीच समजली नसती.

स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं.

जेव्हा आपण दुसऱ्याच्या मदतीचा हात देतो तेव्हा तोच हात आपल्या मदतीसाठी उभा राहतो.

वाईट परिस्थिती, कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की, त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते!

श्रद्धा ज्ञान देते, नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते पण तिन्ही मिळाले, तर त्या व्यक्तीला दुनिया सन्मान देते.

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत. याची त्यांना कल्पना नसते.

परिस्थिती कशीही असो, सत्य आणि सातत्य आपल्या सोबत असले की, आपल्याला कोणीच रोखू शकत नाही.

सुख तुम्ही कोणालाही वाटावं पण दुःख फक्त विश्वासाच्या माणसाला सांगावं.

मदत खूप महाग गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका, कारण खूप कमी लोकं मनाने श्रीमंत असतात.

आरशासमोर कधीच मनातली प्रतिमा प्रकट होत नाही त्यासाठी स्वतःशी प्रामाणिक असावं लागतं.

जेव्हा व्यवहार आणि मोजमापाचा खेळ सुरु होतो तिथंच मैत्रीचं नातं कोलमडून पडलेलं असतं.

बाप कसाही असला ना तरी त्याचं असणं गरजेच असतं त्याच्याशिवाय जगणं खूप कठीण असतं.

मनापासून जीव लावला की, रानातलं पाखरू सुद्धा आवडीनं जवळ येतं आपण तर माणूस आहोत लोकं म्हणतात रिकाम्या हाती आलोय रिकाम्या हाताने जाणार, असं कसं…? एक रुदय घेऊन आलोय आणि जाताना लाखो रुदयात जागा करून जाणार.

जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर संबंध संपतात.

माणसाला जिंकायचं ते केवळ आपुलकीने कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्यावेळेस साथ देणार नाही. पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही.

आजकालची माणसं वाऱ्यालाही चकवा देणारी आहेत आजकालची माणसं अगदी सहजपणे बदलणारी आहेत आज कालची माणसं हसत हसत पाठीवर वार करणारी आहेत आजकालची माणसं जिंकत आलेला डाव उधळून लावणारी आहेत.

आजकालची माणसं तुम्ही लावलेला जीव अगदी सहजपणे विसरणारी आहेत. आजकालची माणसं मुखात एक आणि पोटात एक दाखवणारी आहेत. आजकालची माणसं किती सहज सोपा रंग बदलणारी आहेत.

काळजी हृदयात असावी शब्दात नाही आणि राग शब्दात असावा हृदयात नाही गरजेपुरती माणसं जोडावी. ती सवय असावी. एकदा नातं जोडलं तर ती शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय असावी.

रागात कधीच कोणाला वाईट बोलू नका कारण “राग” थोड्या वेळाने शांत होतो पण “बोलणं” कायम मनात घर करून राहतं.

नाती जिवंतपणीच सांभाळा नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नसतो.

जिव्हाळा हा समाधानी लोकांच्या जीवनातील ऋतू असतो.

तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते.

कधी कधी आपण फार मजेशीर वागतो देवाकडे पाठ करून उभे राहायचं नाही म्हणतो. आणि मग देवालाच आपल्या पाठीशी उभे राहायला सांगतो.

प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही.

 

अशाप्रकारे हे सुंदर विचार आहेत. ज्यामुळे वाईट काळामध्ये आपल्याला धीर मिळत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *