मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटतं की, त्यांचं घर स्वच्छ आणि सुंदर दिसावं. त्यामुळे आपण नेहमी घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. घराच्या स्वच्छतेचा विचार करताना बाथरूमची स्वच्छता केली जाणंही तितकीच महत्त्वाची आहे. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा बाथरूम स्वच्छ करणं गरजेचं आहे; पण अनेकदा बाथरूम स्वच्छ करताना आपण नळांकडे लक्ष देत नाही आणि काही काळानंतर हे नळ गंजल्याचे दिसून येते. नळावर क्षारयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात चिकटतात आणि त्यामुळे ते अत्यंत खराब दिसू लागतात. म्हणूनच आज आपण या नळांवरील क्षारयुक्त पदार्थ कशाप्रकारे काढावे याची माहिती जाणून घेणार आहोत.
आपल्या घरातील नळ खूप दिवस जर आपण ते स्वच्छ केले नाही तर त्यावर क्षार जमा होतात आणि हे जमा झाल्यामुळे ते नळ अस्वच्छ दिसू लागतात. म्हणूनच आज आपण अशा काही दोन सोप्या टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे आपले नळ अत्यंत नवीन प्रमाणे दिसू लागेल. यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता लागणार आहे. त्या गोष्टी कोणत्या व त्यांचा वापर कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
त्यातील पहिली वस्तू म्हणजे लिंबू. हा लिंबू खराब झालेला असला तरी देखील चालू शकते किंवा वाळलेला असला तरी देखील चालू शकते. दुसरी वस्तू म्हणजे सोडा. तिसरी वस्तू म्हणजे स्क्रबर आणि चौथी वस्तू म्हणजे टूथपेस्ट इत्यादी वस्तूंच्या आवश्यकता आपल्याला लागणार आहे. सगळ्यात पहिला आपल्याला का वाटीमध्ये दोन चमचे सोडा घ्यायला आहे आणि या सोड्यामध्ये लिंबू बुडवून तो संपूर्ण नळाला लावायचा आहे.
व्यवस्थित रित्या सर्व ठिकाणी नळाला लावून घ्यावे. व्यवस्थित सर्व ठिकाणी लागल्यानंतर पंधरा मिनिटे ते तसेच ठेवावे. पंधरा मिनिटांनंतर स्क्रबर वर टूथपेस्ट घेऊन त्याच्या साह्याने घासून घ्यावे. व्यवस्थित रित्या घासून झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. धुतल्यानंतरच तुम्हाला दिसेल की आपला नळ किती स्वच्छ झालेला आहे.
यावर पाण्याचे डाग पडू नयेत म्हणून आपण आपल्या घरातील बाद सुक्या कपड्याने हे पाणी स्वच्छ पुसून घ्यावे. अशाप्रकारे जर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व नळ अगदी नवीन प्रमाणे दिसू लागतील.
तुम्ही देखील हा साधा सोपा उपाय नक्की करून बघा. नक्कीच तुमच्या घरातील नळ स्वच्छ होतील.