मित्रांनो, घरात उंदरांचा वावर नकोसा वाटतो. घरात जर एकही उंदीर शिरला तर डोकेदुखी होते. उंदीर अन्नधान्य तसंच कपडे सर्वच गोष्टी कुरतडून टाकतात. घरात सगळ्या गोष्टींची नासधूस करून टाकतात. उंदरांना घालवण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही ते जात नाहीत. अशा परिस्थितीत ही हानी टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करून तुम्ही उंदरांपासून मुक्ती मिळवू शकता. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण एक असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत की ज्यामुळे उंदीर घरातून कायमचे दूर होतील.
घरामध्ये एखादा उंदीर दिसला तर प्रत्येकाला चिंता वाटत राहते. कारण उंदीर हे आपल्याला एक जरी दिसला असला तरी त्यांची संख्या काहीच दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात वाढते आणि यामुळे ते घरातील नास धूस भरपूर प्रमाणात करू लागतात. त्यामुळे आपल्या घरातले खूप नुकसान होत असते. त्याचबरोबर उंदरांचा वावर घरामध्ये वाढल्याने घरातील लोकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ लागतो. म्हणून या उंदरांना वेळेस घराबाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे.
आज बाजारामध्ये अनेक प्रकारचे केमिकल उपलब्ध आहेत. परंतु या केमिकलचा वापर केला त्यामुळे ते चुकून आपला हाताला लागल्यामुळे त्यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आपण घरगुती साधनांचा वापर करून कशाप्रकारे आपल्याला घरातील उंदीर कमी करण्याचा उपाय बनवता येतो. याची माहिती आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरात उपलब्ध असलेले कोणतेही पीठ घ्यायचे आहेत. त्या पिठाचे प्रमाण तुम्ही दोन चमचे इतके घेऊ शकता. यामध्ये एक चमचा इतका धुण्याचा सोडा घालायचा आहे. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चार चमचा इतके मीठ घालायचे आहे. आणि हे मिश्रण व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेले कोणतेही टॉयलेट क्लीनर यामध्ये घालायचे आहे.
हे टॉयलेट क्लीनर इतक्या प्रमाणात घालावे की त्या सर्व मिश्रणाचे आपल्याला एक प्रकारची गोळी तयार करता येईल.अशा प्रकारे हे टॉयलेट क्लिनर घालून एक एक छोटे छोटे गोळे तयार करावे आणि हे गोळे ज्या ठिकाणी आपल्याला असे वाटत असते की उंदराचा वापर त्या ठिकाणात जास्त प्रमाणात होत आहे. अशा ठिकाणी आपल्याला हे छोटे छोटे गोळे त्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहेत. हे गोळे रात्रीच्या वेळेस ठेवावे आणि सकाळपर्यंत नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी उंदीर असलेला दिसून येईल.
अशाप्रकारे आपण या घरगुती उपायाचे साह्याने घरातील उंदीर नाहीसे करू शकतो.