मित्रांनो, प्रत्येकाच्या घरी पोळी शेकण्यापासून ते पापड तळण्यापर्यंत अनेक गोष्टी बनवण्यासाठी तव्याचा वापर केला जातो. लोखंडी किंवा नॉन स्टिक तवा रोज वापरून त्यावर काळसरपणा आणि चिकटपणा जमा होतो. अशा तव्यावर चपात्या बनवल्या तर त्या खराब होतात. इतकंच नाही तर तव्यावर अजून काळा थर जमा होतो. अशावेळी तो तवा कितीही घासला, रगडला तरी त्यावरील काळपटपणा कमी होत नाही.
म्हणून आज आम्ही तुम्हाला काळाकुट्ट झालेला तवा अगदी नव्यासारखा करण्यासाठी स्वस्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहो. हा घरगुती उपाय करून तुम्ही अगदी १० मिनिटांत काळकुट्ट तवा चमकवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक चमचा साखरेची गरज असेल. अगदी स्वस्तात मस्त हा उपाय एकदा करून बघा. हा उपाय कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी काय करावे?सर्वप्रथम तवा गॅसवर ठेवून चांगला तापवून घ्यायचा. भाकरी बनवण्यासाठी ज्या प्रकारे आपण तवा तापवून घेतो अगदी त्याचप्रकारे हा तवा तापवा. जेणेकरून आपण त्यावर जे साहित्य टाकू ते लगेच गरम होईल. तव्यावर वाफ दिसू लागली की समजा तो चांगला तापला आहे. आता या तव्यावर एक चमचा साखर टाका. तव्याच्या सर्व बाजूने ही साखर पसरून घ्या. साखर टाकताच क्षणी साखर जळू लागेल.
साखर वितळून काळी होऊ द्या व त्यातून धूर निघू द्या. यावेळी गॅस चालूच ठेवायचा आहे. यानंतर ज्या ठिकाणी साखर नीट टाकलेली दिसत नाही, तिथेही थोडी साखर टाका. साखर एकदम जळून काळीकुट्ट होत नाही तोपर्यंत जळू द्या. कारण यानेच तवा स्वच्छ निघणार आहे. यानंतर त्यावर खायचा सोडा टाका. आता गॅस थोडा मंद आचेवर ठेवा.
सोड्यामुळे जळलेल्या साखरेतून फेस येऊ लागेल, यानंतर अर्धे कापलेले लिंबू सुरीला अडकवा आणि तव्यावर हलक्या हाताने स्क्रब करा. तव्याच्या कडेपासून सगळीकडे लिंबूने नीट स्क्रब करत राहा. काळाकुट्ट तवा घासण्यासाठी तुम्हाला अर्धा ते एक तास लागतो, पण ट्रीकने तुम्ही ५ ते १० मिनिटांत तवा स्वच्छ करू शकता.
तव्यावर लिंबाने काही वेळ स्क्रब केल्यानंतर फेस येण्याचे प्रमाण कमी होईल, तेव्हा गॅस बंद करून टाका. यानंतर तवा १० मिनिटे थंड होण्यासाठी ठेवा आणि नंतर पाण्याखाली धुवून घ्या. यानंतर पॉलिश पेपरने तवा पुन्हा स्क्रब करा, याने तव्यातील काळपटपणा पटकन निघून जाईल. अशाप्रकारे तुम्ही काळी झालेली कढईदेखील स्वच्छ करू शकता.
अशाप्रकारे फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण काळा कुठे झालेला तेव्हा नवीन करू शकतो.