प्रत्येक हुशार आणि बुद्धिमान व्यक्तीमध्ये हे ९ गुण असतातच ..!!

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते विशिष्ट गुण असतात. परंतु जी व्यक्ती बुद्धिमान आहे त्या व्यक्तीमध्ये काही विशिष्ट गुण असने खूप गरजेचे आहे. आणि या गुणांनीच ती व्यक्ती बुद्धिमान आहे असे सिद्ध होते. म्हणूनच आज आपण बुद्धिमान व्यक्तीमध्ये कोणते 9 गुण असतात? याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

 

पूर्वीच्या काळामध्ये संत लोक आपल्या

शिष्यांना

वाईट काळा मध्ये आपल्या बुद्धीचा वापर कसा करावा. प्रत्येक परिस्थितीतून मार्ग कसा काढावा. याबद्दलची शिकवण देत होते. एकदा एक संत आपला शिष्यांना घेऊन एका गावातून दुसऱ्या गावात जात होते आणि ते देखील आपल्या शिष्याला बुद्धीच्या बाळावर वाईट परिस्थितीतून कसे बाहेर पडावे व आपला बुद्धीचा योग्य तो वापर कसा करावा. याबद्दलची शिकवण ते त्यांना देत होते. आणि याचमुळे त्यांनी अशी योजना आखली होती ती संध्याकाळच्या वेळेत ते जंगलामध्ये पोचतील आणि त्याप्रमाणेच घडले. संत व त्यांचे 5 शिष्य रात्रीच्या वेळेस घनदाट जंगलातून जात होते.

 

खूप रात्र झाली होती आणि या रात्रीच्या वेळेमध्ये कीटकांचा आवाज येत होता. शिष्य खूप घाबरले होते. परंतु संत हे खूप धाडसी होते. प्रत्येकाच्या हातात एक काठी आणि एक कंदील होता. पुढे पुढे चालत असताना संतांना एक झाड दिसले आणि त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले, ‘आपण या झाडाखाली विश्रांती घेऊया आणि थोड्या वेळाने पुन्हा पुढे जाऊ!’ शिष्य खूप घाबरले होते. त्यांना कसे बसे या जंगलातून लवकरात लवकर बाहेर पडायचे होते. परंतु आपल्या संतांची आज्ञा असल्यामुळे ते देखील तिथे थांबण्यास तयार झाले.

 

प्रत्येकाच्या कंदीलामुळे तिथे उजेड ही खूप झाला होता. वेळ जावी म्हणून प्रत्येक शिष्य आपल्या संतांना काही प्रश्न विचारत होते आणि संत ते अत्यंत सोपा भाषेमध्ये त्यांना त्याची उत्तरे देत होते. त्यातीलच एकाने प्रश्न केला, ‘गुरुजी तुम्ही आम्हाला नेहमी सांगत असतात बुद्धीचा योग्य वापर करा. पण बुद्धीचा योग्य वापर करणे म्हणजे नेमके काय आणि बुद्धिमत्ता नेमका कसा असतो? या बुद्धिमान व्यक्तीची लक्षणे कोणकोणते आहेत?’

 

यावर दुसरे शिष्य देखील अत्यंत उत्सुकतेने संताकडेकडे पाहून लागले. कारण त्या सर्वांना देखील हा प्रश्न होताच. यावर संत म्हणू लागले, ‘बुद्धिमान व्यक्ती त्याच्या बुद्धीचा योग्य वापर करतो आणि त्याच्या काही गुणामुळे तो बुद्धिमान आहे हे ओळखले जाते. आज आपण या बुद्धिमान व्यक्तींची अशी काही नऊ गुण जाणून घेणार आहोत की ज्यामुळे तो बुद्धिमान आहे हे ओळखले जाते. यावर ते सर्व शिष्य मन लावून ऐकू लागतात.

 

बुद्धिमान व्यक्तीचा पहिला गुण म्हणजे ते वेळेला खूप महत्त्व देतात. बुद्धिमान व्यक्ती कधी आपला वेळ वाया घालत नाही आणि ते कोणत्याही फालतू कामासाठी आपला वेळ देत नाहीत. ते सर्वप्रथम जे काम कठीण आहे ते काम करण्याकडे लक्ष देतात आणि आपला फालतू वेळ देखील ते आपला कामांमध्ये लावतात. वेळ हा कोणासाठीच थांबत नसतो. म्हणून त्या वेळेचे महत्त्व असणे खूप गरजेचे असते. बुद्धिमान व्यक्तीचा दुसरा गुण म्हणजे आपला शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचा योग्य वापर करणे. बुद्धिमान व्यक्ती जास्त बोलत बसत नाहीत. ते आपली ऊर्जा आपले काम करण्यात खर्च करत असतात. ते आपले काम योग्यरीत्या पूर्ण झाल्यावरच त्याबद्दलची माहिती लोकांना देतात. काम होण्याआधी ते कोणत्याही प्रकारची माहिती इतरांना देत नाही. त्यांच्या वेळी चा आणि ऊर्जेचाही योग्य तो वापर झाल्याने त्यांना विचार करण्याची देखील मानसिकता त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात मिळणार होते.

 

बुद्धिमान व्यक्तीचा तिसरा गुण म्हणजे ही लोकं प्रत्येक गोष्टीतून काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात. कोणती ना कोणता गोष्टी तू त्यांना काय नवीन शिकता येईल याच्याकडे ते लक्ष देत असतात आणि यामुळे त्यांचे ज्ञान जास्त प्रमाणात वाढत असते. प्रत्येक गोष्टीची त्यांना माहिती होत असते. बुद्धिमान व्यक्तीचा चौथा गुण म्हणजे बुद्धिमान व्यक्ती आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांना सांगत नाहीत. कारण या बुद्धिमान व्यक्तींना माहीत असते की आपण कोणती गोष्ट कोणाला सांगावी व कोणाला सांगू नये. जर आपण इतरांना सर्वच गोष्टी सांगत गेलो तर त्या व्यक्ती फायदा घेऊ शकतात. म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यांच्या मनातील सर्वच गोष्टी दुसऱ्यांना सांगत नाहीत.

 

पाचवा गुण म्हणजे बुद्धिमान व्यक्ती खूप बुद्धीनिष्ठ असतात. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेत असताना त्याचा पुरेपूर विचार करत असतात. त्याबद्दलची संपूर्ण जाणून घेत असतात. त्याचा आपल्याला कोणता फायदा आहे, कोणता फायदा नाही, याबद्दलची सर्व माहिती घेतात व मगच त्याचा निर्णय घेत असतात. कोणताही निर्णय तो घाई घाई किंवा गडबडीमध्ये घेत नाहीत. सहावा गुण म्हणजे बुद्धिमान व्यक्तीचा स्वतःवर भरपूर विश्वास असतो. आत्मसन्मान असलेल्या व्यक्तींना कोणीही खाली पाडू शकत नाही. ज्या व्यक्तीचा स्वतःवर खूप विश्वास आहे अशा व्यक्तींचे कोणी काही बिघडू शकत नाही. त्यांचे स्वतःवर व आपल्या भावनांवर पुरणपूर कंट्रोल असते.

 

सातवा गुण म्हणजे बुद्धिमान व्यक्ती बोलताना खूप सांभाळून बोलत असतात. बुद्धिमान व्यक्तींना कधी कुठे कसं व काय बोलावे. याबद्दलची संपूर्ण माहिती असते. आणि या गुणांमुळेच त्यांना योग्य तो निर्णय घेतात. आणि म्हणूनच ते आपले बोलणे सांभाळून बोलत असतात. कारण त्यांना माहीत असते आपल्या बोलण्याचा फार मोठा परिणाम हा भविष्यात आपल्याला होणार असतो. म्हणून कधीही आपला बोलण्याकडे प्रथम लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर संवाद साधत असताना ते समोरच्या व्यक्तीला देखील बोलण्याची संधी देत असतात.

 

आठवा गुण म्हणजे बुद्धिमान व्यक्ती प्रत्येक गोष्टीकडे खूप कुतुहालाने पाहत असतात. बुद्धिमान व्यक्ती या प्रत्येक गोष्टीचा खूप खोलवर जाऊन अभ्यास करत असतात. जोपर्यंत त्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोवर त्यांचे प्रयत्न ते कमी करत नाहीत आणि प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर अभ्यास ते करत असतो आणि याच सवयीमुळे त्यांच्या ज्ञानात भरपूर वाढ होत असते. बुद्धिमान व्यक्तीचा शेवटचा नववा गुण आहे निर्भयता आणि धाडसी वृत्ती. बुद्धिमान व्यक्ती ही कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही. ती प्रत्येक परिस्थितीला निर्भयपणे सामोरे जाते आणि धाडसाने त्याचा सामना करत असते. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरले हा आपला पर्याय नसतो. त्याला धीराने सामोरे गेले पाहिजे. अशा प्रकारे हे काही 9 गुण आहेत जे बुद्धिमान व्यक्तींमध्ये असतात. असे संतांनी त्या शिष्यांना सांगितले.

 

अशाप्रकारे हे नाव गुण प्रत्येक बुद्धिमान व्यक्तींमध्ये आढळतात आणि या गुणांमुळेच ते बुद्धिमान आहेत हे आपल्याला कळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *