मित्रांनो, सण – समारंभ म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच. पण सणवार नसेल तर गोड – चमचमीत पदार्थ खाऊ नये का? लाडू हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ. लाडू अनेक प्रकारचे केले जातात. शेवचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनचे लाडू, बुंदीचे लाडू, लाडूचे अनेक प्रकार महाराष्ट्रात फार फेमस आहे. अनेकांना रव्याचे लाडू फार आवडतात.रव्याचे लाडू करण्यासाठी त्याला लागणारं साहित्यांचे योग्य प्रमाण माहित असणं गरजेचं आहे.
काही लोकं रव्याचे लाडू दुकानातून विकत आणतात. पण विकतचे लाडू आणण्यापेक्षा घरगुती साहित्यात लाडू तयार करा. उन्हाळ्यात मुलं खेळून आल्यानंतर त्यांना छोटी भूक लागते, भूक भागवण्यासाठी हे पौष्टीक लाडू घरात तयार करा. हे लाडू घरातील सदस्यांना नक्कीच आवडतील. आपल्या माहितीप्रमाणे रव्याचे लाडू साखरेच्या पाकामध्ये बनवली जातात. परंतु आजच्या लेखात आपण बिना पाकाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
अर्धा किलोचे बिना पाकाचे लाडू करण्यासाठी आपल्याला एकदम बारीक आसलेला रवा अर्धा किलो घ्यायचा आहे. म्हणजेच दोन वाटीच्या प्रमाणात हा दोन वाटी रवा असेल. तर एक वाटी इतके साखर आपल्याला घ्यायची आहे. जवळजवळ 350 ग्रॅम इतकी साखर होते आणि अर्धी वाटी तूप आपल्यासाठी घ्यायचा आहे. हे साधारण दीडशे ग्रॅम होते. अशा प्रमाणात आपल्याला या सर्व गोष्टी द्यायचा आहे.
त्यानंतर आपल्याला काढाई मध्ये दोन चमचे इतके तूप टाकायचं आहे आणि ते तूप वितळून द्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये रवा घालायचा आहे. साधारण दहा मिनिटे रवा चांगला परतायचा आहे. दहा मिनिटानंतर पुन्हा दोन चमचे आपल्याला यामध्ये तूप टाकायचा आहे. व पुन्हा दहा मिनिटे चांगल्या प्रकारे रवा परतून घ्यायचा आहे. दहा मिनिटानंतर परतल्या वर तुपातील एक चमचा इतके तूप शिल्लक ठेवून बाकीचे सर्व तूप यामध्ये घालावे व चांगल्या प्रकारे अजून पाच मिनिटे हा रवा चांगला परतवून घ्यावा.
साधारण 25 मिनिटे हा रवा आपल्याला चांगला प्रकारे परतवून घ्यायचा आहे. तोही गॅसचा मंद आचेवर आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक वाटी इतकी घेतली साखरेला पिठीसाखर बनवून घ्यायची आहे. व ही साखर आपल्याला त्या रव्यामध्ये घालायचे आहे. संपूर्णपणे पिठीसाखर रव्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढाई वर एक झाकण ठेवून 15 मिनिटे आपल्याला ते मिश्रण तसेच ठेवून द्यावे.
पंधरा मिनिटानंतर झाकण उघडून त्यामध्ये आपल्याला एक चमचा इतकी वेलची पूड आणि उरलेले सर्व तूप आपल्याला यामध्ये घालायचे आहेत व हे मिश्रण सर्व चांगले परतून घ्यायचे आहेत. परतून घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्याचे चांगल्या प्रकारे लाडू अगदी सहजरीत्या वळता येतील.
अशा प्रकारे हे बिना पकाचे लाडू पण व्यवस्थित रित्या बनवू शकतो.