देवांच्या मूर्ती साफ करा शास्त्रशुद्ध पद्धतीने…. ना साबण ना पितांबरी लावता फक्त पाच मिनिटांत?

Uncategorized

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्म मध्ये प्रत्येक घरात देवघर हे असतात. ज्या देव घरामध्ये आपण आपल्या कुलदेव, कुलदेवी यांची पूजा करत असतो. त्याचबरोबर ज्यांना आपण आपले आराध्य मानतो अशा देवांचे देखील आपण पूजा दररोज करत असतो. त्यांना त्याचबरोबर रोज दिवा अगरबत्ती लावून आपली पूजा संपन्न करत असतो.

 

या दिवा अगरबत्तीमुळे देवघरातील देवांवर काळवटपणा येतो. त्याचबरोबर जे आपण केमिकल युक्त असलेले पितांबरी ते वापरतो त्यामुळे देखील आपले देव तात्पुरते स्वच्छ होतात परंतु ते अधिक काळ पर्यंत स्वच्छ राहत नाहीत आणि त्या देवांच्या मूर्तीवर वेगळ्याच प्रकारचा काळवटपणा येतो. आणि हा काळवटपणा जाण्यासाठी आपण देव ब्रशच्या सहाय्याने किंवा इतर कोणत्याही साधनाने घासत असतो.

 

परंतु शास्त्रामध्ये सांगितलेल्यानुसार देव कधीही घासू नये. ब्रशच्या साह्याने जे घासतो ते तर अजिबातच घासू नये असे सांगितलेले आहे. म्हणूनच आज आपण देव स्वच्छ करण्यासाठी एक देवांसाठी उठणे पाहणार आहोत की ज्यामुळे देव लख्ख व चकचकीत स्वच्छ होतील. घरातील देव स्वच्छ असले की देवघर अगदी प्रसन्न वाटते आणि त्यामुळे घरामधील वातावरण देखील सकारात्मकता निर्माण होते व घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते.

 

म्हणून आपले देव स्वच्छ असणे खूप गरजेचे असते. यासाठीच आज आपण देव स्वच्छ करण्यासाठी एक उपाय जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला बेसन पीठ, दही, लिंबू व खाण्याचा सोडा इत्यादी गोष्टींची आवश्यकता आहे. प्रथम आपल्याला एका वाटीमध्ये दोन चमचे इतके बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे इतके दही घालायचे आहेत. ही दही थोडी आंबट असावी.

 

त्यानंतर एका लिंबूचे अर्धे अर्धे दोन काप करून एक अर्धा काप पूर्ण यामध्ये पिळून घ्यावा. त्याचा रस या बेसन पीठ व दह्यामध्ये घालावा आणि अर्ध्यातील थोडासा रस यामध्ये घालावा. थोडा रस तसाच अर्धा लिंबू मध्ये ठेवावा. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा इतका खाण्याचा सोडा घालावा आणि हे मिश्रण व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यावे.

 

त्यानंतर आपल्या देवघरातील देव घेऊन जो आपण अर्धा भाग लिंबूचा ठेवला होता तो लिंबूचा भाग घेऊन त्या मिश्रणामध्ये बुडवावा त्याने देव घासावे. जर आपले देव जास्तच अस्वच्छ झाले असतील तर थोडीशी साखर घेऊन या देवांवर घालून आणि जेवण केलेल्या मिश्रणामधील लिंबू घालून त्याच लिंबू ने ती साखर व मिश्रण यांनी घासावी. त्यामुळे ते व्यवस्थित रित्या घासले जातील व अगदी स्वच्छ होतील.

 

या मिश्रणांनी तुम्ही देवघरातील भांडी देखील घासू शकता. पितळेची किंवा तांब्याची भांडी यामुळे अगदी स्वच्छ निघतात. या उपायांमध्ये आपण कोणत्याही केमिकल युक्त पदार्थाचा वापर केला नसल्यामुळे आपले देव देखील तात्पुरते स्वच्छ राहणार नाही. ते अगदी दीर्घकाळासाठी स्वच्छ होतील व त्यांना ची कोणत्याही प्रकारचे झीज होणार नाही.

 

अशा प्रकारे या शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण आपले देव घासले तर नक्कीच आपले देव अगदी स्वच्छ व लखलखत होतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *