मित्रांनो, सुखी जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. माणसाच्या सुखी जीवनासाठी चाणक्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिलीये. चाणक्य नीती या त्यांच्या ग्रंथाद्वारे तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. चाणक्य नीती मूळतः संस्कृतमध्ये लिहिलेली आहे. आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रात धर्म, अर्थ, काम, मोक्ष, कुटुंब, समाज तसेच अनेक विषयांवर नियम दिले आहेत.
चाणक्य नीतीनुसार, हे सर्व नियम सध्याच्या काळाशीही संबंधित आहेत. ज्यामध्ये हे देखील सांगण्यात आलंय की, पुरुषाचा आपल्या पत्नीवरून भ्रमनिरास का होतो आणि तो दुसऱ्या स्त्रीकडे का संमोहित होतो. लग्नानंतर स्त्री-पुरुषाला इतर कोणाबद्दल आकर्षण असणं हे सामान्य आहे. मात्र ज्यावेळी हे आकर्षण कौतुकाच्या पलीकडे जाऊन त्यांच्यामध्ये एक नातं फुलतं तेव्हा ही गोष्ट चूक मानली जाते.
हे नातं आपल्या समाजात मान्य नाही. अशा नवीन नात्यात जुने प्रेमसंबंध आणि लग्न मोडण्याची क्षमता असते. जाणून घेऊया पत्नी असूनही दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होण्यामागे आचार्य चाणक्यांनी काय गोष्टी सांगितल्या आहेत. याची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
बोलण्यामध्ये मधुरता नसणं.
काळाच्या ओघात वैवाहिक नात्यात कटुता येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बोलण्यातला गोडवा कमी होणं. अशा परिस्थितीत घरातील स्त्री असो वा पुरुष, तो घराबाहेर गोडवा शोधू लागतो. आणि अशावेळी पुरुष दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होऊ लगातो. वैवाहिक नात्यातील इतर सुखांसोबत मानसिक आनंदालाही महत्त्व असते, ज्याच्या अभावामुळे नाते तुटू लागतं.
आकर्षणाची कमतरता.
जेव्हा पती-पत्नी एकमेकांकडे लक्ष देत नाहीत त्यावेळी पुरुष दुसऱ्या स्त्रिमध्ये मन गुंतवण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी जोडपी पूर्ण वेळ देत नाहीत किंवा फक्त एकमेकांच्या उणीवा मोजत राहतात, अशा परिस्थितीत नात्यात दुरावा येऊ लागतो. अशा स्थितीत पत्नीऐवजी पती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतो.
विश्वासाची कमतरता.
वैवाहिक जीवनातील सर्वात मोठी ताकद म्हणजे विश्वास असतो. जर स्त्रीने हा विश्वास तोडला तर पुरुष आणि जर पुरुषाने हा विश्वास तोडला तर स्त्री घराबाहेर नातं शोधू लागतात. त्यामुळे त्यांच्या गरजांसाठी विवाहबाह्य संबंधांचा विचार केला जातो.
बाळ होणं.
वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये अपत्य जन्माला आल्यानंतर काही वेळा नात्यात बदल होतो. स्त्री-पुरुष एकमेकांसोबत वेळ घालवू शकत नाहीत. अशावेळी पुरुष घराबाहेर इतर महिलेकडे आकर्षित होतात. अशावेळी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होते.
अशाप्रकारे ही काही लक्षणे आहेत त्यामुळे विवाहित पुरुष परस्त्रीकडे आकर्षित होत असतात.