मित्रांनो, आपला जीवनामध्ये आपल्याला त्रास देणारी व्यक्ती अनेक असतात. पण त्याला कोणता कारणांवरून ते आपल्याला कशा प्रकारे त्रास होईल याचाच विचार करत असतात. या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आपले नातेवाईकच सामील असतात. ज्यांचा आपल्याला खूप त्रास होतो आणि ते आपल्याला खूप त्रास देत असतात. यांना हॅन्डल कसं करावं? हे आपल्याला कळत नसते. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण आपलाला त्रास देणारा नातेवाईकांना कसे हँडल करायचं? याचीच माहिती जाणून घेणार आहोत.
पहिली गोष्ट म्हणजे अशा लोकांकडे फक्त आणि फक्त दुर्लक्ष करा. आपल्याला शक्य होईल तेवढे अशा लोकांना दुर्लक्ष करा. यांनी कोणताही दिलेला त्रास कसा दुर्लक्ष करता येईल याच्याकडे लक्ष द्या. त्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देणे टाळा. कारण जेवढे वेळा तुम्ही त्यांचा सहवास हातात त्याचा जास्त त्रास तुम्हालाच होईल.
दुसरी गोष्ट म्हणजे या स्वार्थी नातेवाईकांसाठी काहीही करणे टाळा. आपण या व्यक्तींसाठी काहीही कोणत्याही वस्तू घेऊ नये. आपण त्यांना गिफ्ट घेत असतो किंवा इतर कोणती वस्तू त्यांना देत असतो तर ते देणे टाळा. कारण अशा लोकांसाठी आपण कितीही केलं तरी ते आपल्याला त्रास देणे कधीही कमी करणार नाही.
तिसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला पटत नाही रुजत नाही त्याला तोंडावर नाही म्हणायला शिका. स्वार्थी लोक परिस्थितीचा व वेळेचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधण्याचा पाहतात व आपला फायदा घेत असतात. अशावेळी अशा लोकांना तोंडावर जमणार नाही म्हणायला शिका. कारण पुढच्या वेळी ते तुमचा नादी लागणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे मदत करण टाळा. स्वार्थी लोकांना खूप घाण सवय असते ज्या थाळीमध्ये ते खात असतात त्याच थाळीला ते छिद्र करत असतात. म्हणजेच जर आपण त्यांची मदत करायला गेलो तर ते आपल्यालाच मूर्ख ठरवतील व आपल्याला त्रास देऊ लागतील. म्हणून अशा लोकांना मदत करणे टाळावे.
पुढची गोष्ट म्हणजे अशा लोकांसमोर इतरांची निंदा करण टाळा. कारण जर आपण इतरांबद्दल या लोकांसमोर बोलायला गेलो तर ते एकाचे दोन करून त्या व्यक्तीला जाऊन सांगतील व आपल्यालाच दोष देऊ लागतील. पुढची गोष्ट म्हणजे जे लोक आपल्याला त्रास देत आहेत अशी लोक जे काही सांगतील किंवा जो काही आपल्याला सल्ला देतील त्याचा विचार अजिबात करू नका. ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.
पुढची गोष्ट म्हणजे अशा व्यक्तींबद्दल आपल्या घरच्यांना सांगून आधीच सावध करा. कारण अशा व्यक्ती आपल्या घरामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून जर आपण वेळीच सावध झालो तर त्यामुळे आपला घरामध्ये कोणतेही वाद-विवाद होणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे या लोकांना कधीही सुधारायचा प्रयत्न करू नका. कारण या व्यक्ती अत्यंत घमंडी, हट्टी व आपल्याच खरे करणाऱ्या असतात. ते इतरांची कोणतीही गोष्ट ऐकून घेण्यास तयार नसतात.
पुढची गोष्ट म्हणजे अशा व्यक्तींसोबत बोलताना गोष्टी जास्त लांबवायचा प्रयत्न करू नका. त्यांच्यासोबत बोलताना तुटकपणे बोला. जेणेकरून त्या व्यक्तीला समजेल की आपल्याशी बोलणार त्याला काही रस नाही. तो त्याचे बोलणे थांबले. पुढची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनात असलेले दुःख व तुमचे आनंद अशा व्यक्तींना सांगायला जाऊ नका. कारण हे तुमच्या दुःखांवर हसायला लागतील व तुमच्या आनंदावर व्यंजन घालण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करत असते.
अशाप्रकारे या काही गोष्टी आहेत त्यांच्या आधारे आपण आपल्याला त्रास देणाऱ्या नातेवाईकांना हँडल करू शकतो.