मित्रांनो,एखादी व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून इग्नोर करते, तुमच्याकडे लक्ष देत नाही. तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही…! तर नेमके काय करायचे? त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो… याचे त्या व्यक्तीला काहीच पडलेले नसते. त्यावेळेस त्या व्यक्तीसोबत कशा पद्धतीने वागायचे….? आपण कसे वर्तन ठेवायचे. याविषयीची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
जर ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तरीही तुम्ही त्याला भाव देत असाल किंवा तुम्ही त्याला सतत विचारताय काय झाले…? तू माझ्याशी का बोलत नाही….? माझे काय चुकले…? जर असे पुन्हा पुन्हा विचारत जाल तर त्या व्यक्तीला आपल्याबद्दल…. म्हणजेच माझ्याशिवाय याच्या आयुष्यात काहीच नाही. मी कसाही वागलो, तर हा माझ्याकडे येणार, असे त्याला वाटत राहते आणि तो जास्त भाव खातो. म्हणून तुम्ही त्याला जास्त भाव देणे प्रथम बंद करा.
तुम्ही बिझी व्हा… स्वतःला कामांमध्ये गुंतवून ठेवा तेव्हा ती व्यक्ती तुमचा विचार नक्कीच करू लागेल. हा आपल्याला काहीच विचारत नाही विसरून गेला का… असे केल्याने तीच व्यक्ती तुम्हाला किंमत देईल आणि तुमच्या मागे लागेल. आपली किंमत आपणच वाढवायची आहे, त्या व्यक्तीला दाखवून द्या की…. मी ही खूप कामात असतो तुझ्यामुळे माझे काही अडत नाही.
अशा व्यक्तींकडे अचानक दुर्लक्ष करणे आपल्याला शक्य होत नाही. पण आपल्या भल्यासाठी करावाच लागेल. तुम्हाला किंमत देत नसेल…. तर स्वतःमध्ये बदल हा घडवावाच लागेल. आणि हा बदल तुमच्या नेहमी हिताचाच असतो.हे सगळे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवाल. तुम्ही तुमची किंमत कमी करून घेऊ नका. तू कुठे होतास…..? मला का सांगितले नाही…? मला विचारले का नाही…? असे प्रश्न विचारून तुम्ही त्याला जास्त भाव अजिबात देवू नका.
त्याच्या वैयक्तिक जीवनात जास्त ढवळाढवळ करू नका. यामुळेही ते तुम्हाला इग्नोर करत असतात.जर एखादी गोष्ट त्याला आवडत नसेल तर करू नका. तुम्ही परिस्थिती नुसार तुमचे वर्तन ठेवा. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काही अर्थ नाही. असे बोलणे प्रथम बंद करा.यासाठी तुम्ही तुमच्या मध्ये बदल करा. स्वतःला महत्त्व द्या. समोरची व्यक्ती तुम्हाला ही महत्व देईल. स्वतःमध्ये बदल घडवा.
आपण कुठे चुकतो… आपण काय केले पाहिजे… यावर काम करा आणि तुमच्या चुका दुरुस्त करा. तुम्ही स्वतःला डेव्हलप करा.ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद मिळतो, त्या गोष्टी नक्की करा. आणि आनंदी राहा. स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा. त्यामध्ये तुमचा वेळ घालवा. तुमचा व्यक्तिमत्व भारदस्त बनवण्याचा प्रयत्न करा.तुम्ही दुसऱ्याचे नाही…. तर तुमचे दुसऱ्यांनी आचरण केले पाहिजे… एवढे परफेक्ट स्वतःला बनवा.
आणि महत्त्वाचे म्हणजे एटीट्यूड मध्ये जगायला शिका. नवीन गोष्टी आत्मसात करायला शिका. असे जगा की… समोरच्याला आपल्याकडे बघून जगायची इच्छा झाली पाहिजे. तुमचा हेवा वाटला पाहिजे असे जगा. तुमच्याकडे बघून वाटले पाहिजे याला कशाचा एवढा सुख आहे… की तो तेवढा आनंदी आहे….! एवढे स्वतःला आनंदी आणि खुश ठेवण्याचा प्रयत्न करा.यासाठी स्वभावामध्ये बदल करणे मात्र फार महत्त्वाचे आहे.
ज्या वेळेस तुम्ही तुमच्या वर्तन आणि विचारात बदल कराल त्यावेळेस समोरची व्यक्ती आपोआप बदलेल. आणि तुमच्या मध्ये झालेला बदल तो व्यक्ती नक्की स्वीकारेल. आणि त्याच्याकडून झालेल्या चुका तो नक्की दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. जर त्याला गरज असेल तर तो त्याच्या कडून तुमच्या सोबत असलेले नाते टिकवण्याचा नक्की प्रयत्न करेल.
अशाप्रकारे जर तुम्हाला कोणती व्यक्ती इग्नोर करत असेल तर त्या व्यक्तीबरोबर कसे वागावे. याबद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.