तुमच्या घरातील घाणेरडे जुने झालेले इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड चमकवा एका मिनिटांतच फक्त एक रुपयात ..!!

Uncategorized

मित्रांनो, घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे खूप गरजेचे आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवही स्वच्छ घरात राहतो. म्हणूनच लोक वेळोवेळी स्वयंपाकघर, बाथरूम, बेडरूम स्वच्छ करतात. यापैकी स्विच बोर्ड अशा गोष्टी आहेत ज्यांची नियमित साफसफाई केली जात नाही, त्यामुळे त्यावर घाण साचते आणि नंतर ती साफ करणे कठीण होते.

 

अशा परिस्थितीत लोक क्लीन किंवा साबणाने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही वेळा पाण्यामुळे विद्युत तारा पडण्याची भीती असते. म्हणूनच आज आपण घरच्या घरी कोणालाही करता येईल असा हा साधा सोपा उपाय जाणून घेणार आहेत. की ज्यामुळे आपल्या घरातील स्विच बरोबर हे अत्यंत स्वच्छ होते. कोणताही प्रकारचे घाण त्यावर दिसणार नाही.

 

हा उपाय करण्याआधी तुम्हाला घरातील मेन स्विच बंद करावे. कारण आपण ज्या वेळेला आपल्या स्वीच बोर्ड साफ करत असतो ते ओले असले कारणाने आपल्याला करंट लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण मेन स्वीच बंद करावा व मगच साफसफाई करण्यास घ्यावी. धोका बाळगून हा उपाय तुम्ही करू नये. स्वीट बंद केला असता आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. त्यामुळे आपण व्यवस्थित रित्या ते साफ करू शकतो.

 

या उपायासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहेत. पहिले म्हणजे आपल्या घरातील टॉयलेट क्लीनर ज्याला की आपण हार्पीक असे म्हणतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इनो. या दोन गोष्टी आपल्याला घ्यायचा आहेत. त्यासाठी प्रथम आपल्याला एक प्लास्टिकचे बाउल घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा टॉयलेट क्लीनर घ्यायचे आहे. आणि यामध्ये इनो पाकीटांमधील अर्धा पॅकेट आपल्याला यामध्ये घालायचे आहे.

 

हे व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यावे आणि खराब ब्रश घ्यावा. या ब्रशच्या साह्याने आस्वच्छ असलेल्या स्विच बोर्डवर हीच पूर्ण पेस्ट लावून घ्यावी व हलक्या हाताने घासावे. आणि ती पेस्ट पाच मिनिटे तसेच ठेवून द्यावे. पाच मिनिटानंतर पुन्हा एकदा ब्रशच्या सहाय्याने सर्व बोर्ड हलक्या हाताने घासून घ्यावे. घासल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की आपला स्विच बोर्ड पहिल्या पेक्षा स्वच्छ झालेला आहे. त्यानंतर सुख्या कापडाने हा स्वीच बोर्ड स्वच्छ पुसून घ्यावा. तुम्हाला नक्की लक्षात येईल की तुमचा स्विच बोर्ड अगदी स्वच्छ झालेला असेल.

 

अशा प्रकारे या उपायाने तुम्ही काही मिनिटातच तुमचे अस्वच्छ असलेले स्वीट बोर्ड साफ करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *