मित्रांनो, पावसाळा खूप आनंददायी असला तरी तो काही अडचणीही घेऊन येतो. पावसाचे आगमन होताच विविध प्रकारचे कीटक दिसून येतात, कारण हवेत आर्द्रता आणि पाणी साचल्यामुळे या ऋतूत कीटकांच्या पुनरुत्पादनाचे प्रमाण झपाट्याने वाढते. यापैकी काही कीटकांना पंख असतात आणि काही जमिनीवर आणि भिंतींवर रेंगाळतात. जर हे कीटक आपल्या स्वयंपाकघरात पोहोचले आणि अन्नपदार्थांच्या संपर्कात आले तर ते अनेक संसर्गजन्य रोगांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे घराला या कीटकांपासून मुक्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
या कीटकांमुळे अनेक आजार पसरण्याचे देखील शक्यता असते. त्याचबरोबर आपल्या मुलांना बाळांना देखीलही संसर्गजन्य रोग या किटकांमुळेच जास्त प्रमाणात होत असतात. म्हणूनच आज आपण या कीटकांना घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला घरात असलेल्या काही घटकांपासून हा उपाय करता येतो व घरातील किटकांना बाहेर काढता येते.
या हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचे भांडे, कापूर, तमालपत्री आणि मोहरीचे तेल इत्यादीची आवश्यकता लागणार आहे. मातीचे भांडे यासाठी कारण जर कापराचा वास कोणत्या दुसऱ्या भांड्याला लागला तर त्याचा वास लवकर जात नाही. म्हणून मातीचे भांडे वापरावे. प्रथम आपल्याला कापूर घेऊन त्याची बारीक पूड तयार करायचे आहे आणि ते मोहरीच्या तेलामध्ये मिक्स करायचे आहे. हे व्यवस्थित रित्या विरघळू द्यावे.
त्यानंतर एका बाजूला मातीच्या भांड्यामध्ये जी आपण तमालपत्र घेतलेले आहेत त्याचे दोन दोन भाग करून संपूर्ण मांडायची तमालपत्र पसरवून ठेवावी आणि त्यामध्ये हे मोहरीचे तेल व कापूर यांचे मिश्रण त्यामध्ये घालावे व त्याचा दिवा पेटवावा. थोडा प्रमाणात भेटल्यानंतर त्याचा धूर होईल. धूर झाल्यावर दिवा बंद करावा आणि हा धूर आपल्या घरातील सर्व ठिकाणी फिरवावे. अशा प्रकारे हा उपाय आहे जो तुमच्या घरामध्ये येणारा कीटकांपासून मुक्तता करून देईल.
कारण कापूर आणि मोहरीचे तेल यांचा एक प्रकारचा उग्र वास निर्माण होतो. त्यामुळे कीटक घरांमध्ये राहत नाहीत आणि तमालपत्रे मुळे धूर निर्माण होण्यास मदत मिळते. अशा प्रकारे हा साधा सोपा उपाय आहे. ज्यामुळे घरातील कीटकांपासून आपल्याला सुटका मिळते.
तुम्ही देखील हा उपाय नक्कीच करून बघा त्याचा फायदा तुम्हाला झालेला नक्कीच दिसून येईल.