टेंशनमध्ये सुद्धा मन आनंदीत आणि प्रसन्न करणारे सुंदर आणि अनमोल सुविचार…..!!

Uncategorized

मित्रांनो, सुविचार म्हणजे संस्काराची शिदोरी असते. आणि ही शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरणारे असतात. या सुविचारांमधून माणसाला खूप मोठी शिकवण मिळत असते आणि ही शिकवण त्यांना आयुष्यभर लक्षात राहत असते. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण असेच काही सुंदर सुविचार जाणून घेणार आहोत. की ज्यामुळे ते सुविचार ऐकून आपला मनावरती चांगले संस्कार होतील व हे संस्कार आपल्याला आयुष्यभर पुरतील.

 

माणसाने कठीण प्रसंगात कासवाप्रमाणे आपल्या पाठीचे कातडे घट्ट करून दणकेही खावेत, परंतु योग्य वेळ येताच सापाप्रमाणे फणा काढावा.

जगात दोन अशी रोपं आहेत, जी कधी कोमेजत नाहीत आणि कोमेजली तर त्याचा काही इलाज नाही पहिलं निःस्वार्थ प्रेम आणि दुसरं अतूट विश्वास.

लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी… किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी… क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी.

जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकुन कायत हृदयात राहतो.

कुठंला पण माणूस असंच नाही बदलत काही घटना अश्या घडतात की त्याला संपूर्ण बदलून टाकतात.

माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार. कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात. परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करीत असतात.

ताकात लोणी असेल तर चालेल पण लोण्यात ताक नसावं. कोळश्यात हिरा असेल तर चालेल पण हिऱ्यात कोळसा नसावा. पाण्यात बोट असेल तर चालेल पण बोटीत पाणी नसावं. त्याचप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तर चालेल पण मैत्रीत राजकारण नसावं.

मैत्री करायची तर अशी करायची की ती व्यक्ती आपल्याबरोबर बोलो या ना बोलो, पण त्या व्यक्तीने कधी “मैत्री” हा शब्द जरी ऐकला की आपली आठवण आली पाहिजे.

समाजात जो सरळ व सत्याने वागतो, त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात. कारण, जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात. परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही. पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.

सगळा राग, संताप, हाल-अपेष्टा, अपमान बाजूला ठेवून काही स्त्रिया फक्त आपल्या मुलांसाठी जगत असतात.

लोकं ब्लड प्रेशरच्या धाकानं मीठ खाणं सोडून देतात, शुगरच्या धाकानं गोड खाणं सोडून देतात.. मात्र ईश्वराच्या धाकानं दुसऱ्यांच्या हक्काचं हरामाचं खाणं हे मरेपर्यंत सोडत नाही.

बुद्धिमत्ता तुम्हाला सर्वोच्च पदावर नेऊन पोहोचवते, पण तेथे किती काळ टिकून राहायचं हे मात्र तुमचं वर्तन ठरवत असतं.

आयुष्याचा अभ्यास करताना लक्षात आलं, प्रेमाचं आश्वासन देणारे खूप दिसतात पण काळजी करणारा एखादाच असतो आणि तो एखाद्यालाच मिळत असतो.

एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणं हे जगातील सुंदर भाबना असते आणि त्याच व्यक्तीने आपल्या प्रेमात पडून आयुष्यभर आपल्या सोबत जगावं हे नशीब असतं.

चुका या सर्वांकडून होत असतात फरक फक्त इतकाच असतो, स्वतःच्या झाकल्या जातात आणि दुसऱ्यांच्या दाखवल्या जातात.

संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी अर्धांगिणीची साथ ही भक्कम असली की झोळीचं अस्तित्व हे शाबूत राहत असतं.

नेहमी देवावर विश्वास ठेवा कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे ही गुगल वर सापडत नाहीत.

आपल्या व्यथाचा पाठ हा चारचौघात वाचू नका, कारण लोकं त्याची कथा बनवून सार्वजनिक तमाशा करून जगाच्या रंगमंचावर प्रसारित करत असतात.

एकमेकांचा हात पकडताना दोन्हीकडून घट्ट विश्वास असावा लागतो म्हणजे एकाचा जर का हात निसटला तर दुसऱ्याची पकड ही घट्ट असायला हवी.

 

अशाप्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत ते आपले टेन्शनमध्ये हे आनंदी राहण्यास मदत करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *