जे जास्त विचार करतात त्यांच्यासाठी… आत्ताच ही एक गोष्ट लक्षात घ्या नाहीतर संपला समजा ..!!

Uncategorized

मित्रांनो, रात्री झोपण्यासाठी म्हणून बिछान्यावर पडलं की तात्काळ तुमच्या मनात विचार सुरू होतात का? पुढच्या काळात आपल्यावर हे संकट तर नाही ना येणार? किंवा काही दिवस-वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण तुमच्या मनात सारखी आणि रोज येते का? मनातले विचार संपतच नाहीत किंवा एकापाठोपाठ एक विचार येतच राहातात, मन कधी शांतपणे बसलंय असं वाटतच नाही का? असे जर विचार तुमच्या मनामध्ये येत असतील तर याला जास्त विचार करणे असे म्हटले जाते. याच जास्त विचार करणारा लोकांना बद्दल आजच्या लेखांमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत.

 

विचार करणं आणि अतिविचार करणं यातला फरक आपण जाणून घेणार आहोत. अनेक लोकांना हा अतिविचाराचा त्रास होत असतो. सतत एकच विचार मनामध्ये असणं किंवा एकापाठोपाठ सलग विचारांची माळ मनात सुरू होणं असं सुरू असतं.ऑफिसचा कॉम्प्युटर लॉग आऊट केला तरी मनातून ऑफिसचं काम लॉग आऊट होत नाही. सतत नोकरीचे, व्यवसायाचे विचार मनात येत राहातात.काही लोकांमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचे, भविष्याचे, नोकरी मिळतील का याचे विचार येत असतात.

 

आपण परीक्षेत नापास होऊ, आपली नोकरी जाईल, आपल्याला नोकरीच मिळणार नाही, आपल्या प्रेमसंबंधात अडथळा येईल, आपला जोडीदार सोडून जाईल, अपघात झाला तर कसं होईल? एखादा आजार झाला तर त्याचा खर्च कसा भरुन काढायचा? मुलं वाईट वळणाला लागतील का? असे विचार येत राहातात. मानसिक आधाराची आपल्याला गरज आहे हे कसं ओळखायचं?मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही किती जागरूक आहात?तुमच्या घरातील व्यक्तीला ‘मानसिक आजार’ झाला आहे हे कसं ओळखाल?हे विचार सतत मनात येत असतील तर अतिविचारांचा त्रास आपल्याला होतोय का हे पाहाणं गरजेचं आहे.

 

अतिविचार म्हणजे गरजेपेक्षा जास्त विचार, चिंता करत राहाणं. यामुळे आपली भरपूर शारीरिक, मानसिक ऊर्जा खर्च होत असते.यातील बहुतांश विचार टोकाचे आणि नकारात्मक असतात. ते कधी प्रत्यक्षात येतील असे नाहीच पण अतिविचार करणारी व्यक्ती त्यावर विचार करते.यामुळे अनेक रुग्णांना झोप येत नाही, झोप पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या पुढच्या दिवसावर आणि एकूणच जगण्यावर परिणाम होतो. सतत थकवा आल्यासारखं वाटतं. गळून गेल्यासारखं वाटतं.

 

विचार करणं हे माणसाला मिळालेलं वरदान समजलं जातं. याच विचारांच्या जोरावर मनुष्याने आजवरची प्रगती केली आहे. पण आपल्या विचारप्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास मोठे प्रश्न उदभवू शकतात. विचार हे माणसाचे शस्त्र मानले तर हे शस्त्र दुधारी आहे याचंही भान ठेवलं पाहिजे. विचारांचा चांगला आणि वाईट असा दोन्हीप्रकारे वापर करता येतो. विचारांचा उपयोग होतो तसा दुरुपयोगही होतो. त्यामुळे अतिविचार करणं म्हणजे त्या शस्त्राचा अतिवापर, अयोग्य मार्गाने वापर करण्यासारखं आहे.

 

अतिविचाराला मनुष्याच्या विचार करण्याच्या शक्तीचा दुरुपयोग आणि गैरवापर समजलं जातं. पुढचा विचार करणं चांगलं असलं तरी एकामर्यादेपेक्षा जास्त हवेत इमले बांधत बसणं चुकीचं आहे. त्यामुळे आताचा वर्तमानातला महत्त्वाचा वेळ वाया जाऊ शकतो.जर आपलं रोजच्या वेळेचं गणित चुकत असेल त्यामुळे आपल्या कामावर परिणाम होत असेल तर आपण अतिविचार करत आहोत का हे तपासलं पाहिजे.आपण जो विचार करत आहोत ते आवश्यक प्रमाणात आहे की आपण अतिविचार करत आहोत हे ओळखणं गरजेचं आहे.

 

दिवसभर सततच्या त्रासदायक विचारांचा शरीरावरही परिणाम दिसून येतो. अतिविचारांमुळे भुवयांपासून मानेपर्यंतचे स्नायूंचे तंतू आक्रसतात आणि त्या व्यक्तीला संध्याकाळपर्यंत डोकं जड झाल्यासारखं वाटून डोकं दुखायला लागतं. अशा व्यक्तीला सतत थकल्यासारखं वाटतं.भीतीच्या, रागाच्या, दुःखाच्या, नकारात्मक, बदला घेण्याच्या विचारांमुळे चेहरा, जबडा, मान इथले अनेक स्नायू आक्रसतात.

 

अतिविचार करत आहोत हे समजण्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे विचारांमुळे झोपेवर होणारा परिणाम. सततच्या विचारांमुळे त्या व्यक्तीला झोप लागत नाही. या व्यक्तींच्या झोपेचा पहिला टप्पा म्हणजे झोप येण्याचा टप्पाच सुरूच होत नाही. मग झोप येत नाही म्हणून पुन्हा विचार आणि विचार आले म्हणून पुन्हा निद्रानाश अशा चक्रात ती व्यक्ती सापडते.अतिविचार करणाऱ्यांना काही लोकांमध्ये जेवणाची इच्छाच निर्माण होत नाही, त्यांना तहान-भूकेचं भान राहात नाही. तर काही लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

 

अशाप्रकारे अर्थी विचार केल्यामुळे माणसाला शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून कधीही अति विचार करत बसू नये. योग्य तितका आणि जेवढा गरजेचा आहे तितकाच विचार करायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *