जेव्हा खूप दुःखी असाल, टेन्शन मध्ये असाल तेव्हा श्रीकृष्णाच्या ह्या ५ गोष्टी लक्ष्यात ठेवा….!!

Uncategorized

मित्रांनो, ज्यावेळेस कुरुक्षेत्रामध्ये गौरव पांडवांची युद्ध चालू होते तेव्हा अजून नैराश्यामध्ये गेला होता. उदास झाला होता. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगून त्याची नैराशी दूर केले होते. त्याच्या सर्व शंकांचे निरासन केले होते. आजच्या या लेखामध्ये आपण त्याच पवित्र गीतेमधून पाच आयुष्य बदलल्याने धडे जाणून घेणार आहोत. आजचा तरुण सुद्धा नैराश्यामध्ये आहे. डिप्रेशन मध्ये आहे. त्याला सुद्धा मार्गदर्शनाची गरज आहे. भगवान श्री कृष्ण ने गीतेमध्ये सांगितलेली प्रत्येक शिकवण आयुष्य बदलणारी आहे.

 

१. कर्माचे महत्व. गीतेच्या अध्यायामध्ये कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन | मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि || 47 ||

जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये अर्जुन बघतोय की त्याला आपल्या नातेवाईकांबरोबर, आपल्या आप्तेष्टांबरोबर, आपल्या गुरुजनांबरोबर युद्ध करावे लागेल. तेव्हा अजून निराश होतो. तेव्हा श्रीकृष्ण त्याला उपदेश देतात. हे अर्जुन मी निर्माता आहे. मी ठरवलं तर एका क्षणात ह्या सर्वांना सुदर्शन चक्राद्वारे नष्ट करू शकतो. पण मला येणाऱ्या पिढ्यांना कर्माचे महत्त्व सांगायचे आहे. पुढे श्रीकृष्ण म्हणतात तू सुद्धा तुझे कर्म करत रहा. परिणामाची चिंता करू नकोस आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी तयार करतात.

 

आपल्याला सुद्धा आयुष्यात यश मिळवायचे असेल तर आपण कर्मावर भर दिला पाहिजे. कृतीवर भर दिला पाहिजे. कारण कर्म केल्याशिवाय आपल्याला हवं ते मिळणार नाही. आणि जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात फळाची अपेक्षा करू नकोस. याचा अर्थ परिणामांची आसक्ती बाळगू नकोस. सतत तुला काय मिळणार आहे याचा विचार करू नको. तुझे पूर्ण लक्ष कर्मावर ठेव.

 

2. रागावर नियंत्रण मिळवा.

गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 63 व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात

क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।

स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ||63||क्रोधापासून संमोहन निर्माण होतो. मोहामुळे स्मृती भ्रष्ट होते. स्मृती भ्रष्ट झाली की माणसाची बुद्धी काम करायची बंद होते आणि बुद्धी काम करायचे बंद झाले की माणसाचा विनाश होतो. म्हणून सर्व प्रकारच्या अपयशाचे मूळ कारण क्रोध आहे. त्यामुळे माणसाने क्रोधा व नियंत्रण मिळवले पाहिजे. तरच तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.

 

3. त्याग. कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या कर्णकडे इंद्रस्त्र होते. कितीही मोठा योद्धा असला तरी इंद्रस्त्र समोर त्याचा मृत्यू अटळ होता. हे श्रीकृष्णाला माहिती होते म्हणून श्रीकृष्णाने भिमाचा मुलगा घटोत्कचला बरोबर लढाई करायला सांगितले होता. म्हणून कर्ण यांनी त्याच्यावर वापर करावा लागला आणि त्यामध्ये घटत गच्च मृत्यू होतो. कृष्णाला गटोत्कच सारख्या महान योद्धाचा त्याग करावा लागला. कारण त्याला अर्जुनाला वाचवायचे होते. म्हणून आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये मोठे यश मिळवायचे असेल तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. जसे की कम्फर्ट झोन, आपला अहंकार, वेळ, पैसे, मोठे यश आपण मिळू शकत नाही.

 

4. कोणतेही काम छोटे नसते. श्रीकृष्ण ठरवले असते तर त्याने एकट्याने स्वतःच्या जोरावर कुरुक्षेत्राचे युद्ध जिंकले असते. एवढे सामर्थ्य श्रीकृष्णाकडे होते. पण तो अर्जुनाचा मार्गदर्शक झाला आणि फक्त मार्गदर्शक झाला नाही तर त्याच्या रथाचा सारथी सुद्धा झाला. यावरून आपण हे शिकू शकतो की कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. काम काम असते. आपण कोणतेही काम करत असू ते प्रामाणिकपणे आणि आनंदाने केले पाहिजे. आयुष्यातला मोठा काळ कामामध्ये जातो त्यामुळे समाजाने राहायचे असेल तर आपण कोणतेही काम करत असू त्यावर प्रेम केले पाहिजे.

 

5. मैत्री. सुदामा हा कृष्णाचा लहानपणीचा मित्र होता. पण सुदामा 18 विश्व दारिद्र मध्ये जगत होता. त्याच्या कुटुंबाला दोन टाईम व्यवस्थित जेवायला सुद्धा मिळत नसे. कृष्णा कडून काही मदत होईल का या आशेने सुदामात कृष्णाला भेटायला जातो. पण जेव्हा तो कृष्णाला भेटला तेव्हा त्याचे धैर्य होत नाही की कृष्णाला त्याच्या घरच्या परिस्थितीबाबत सांगावे, सुदामा जेव्हा घरी येतो तेव्हा त्याच्या कुटुंबाची परिस्थिती एकदम बदललेली असते. सुंदर घर, बायका मुलांना छान छान कपडे, दागिने सर्व काही तो पोहोचायच्या आधीच कृष्णाने त्याला दिलेले असते. कृष्ण हा खरा मित्र होता. तरी आपल्या मित्राची सर्व परिस्थिती ओळखली होती. आपण सुद्धा आयुष्यामध्ये असे मित्र जोडले पाहिजे जे आपल्या संकटकाळी मदतीला धावून येतील.

 

 अशाप्रकारे हे होते ते पाच शिकवण जी श्रीकृष्णाने भगवद्गीते मध्ये सांगितलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *