जगातील प्रत्येक बायको ह्या ५ अपेक्षा आपल्या नवऱ्याकडून ठेवत असते….. हे पुरवणारा नवरा सर्वश्रेष्ठ असतो ..!!

Uncategorized

मित्रांनो, पत्नी भावनात्मक संतुष्ट असेल तर संसार खूप आनंदी आणि समाधानी असतो. आयुष्यभर कुटुंबासाठी झटणाऱ्या पत्नीच्या काही माफक अपेक्षा पतीने पूर्ण केल्यास पत्नी जीव ओवाळून टाकते. परंतु पुरुषप्रधान संस्कृती मध्ये असे घडताना तुरळकच दिसते. तरीही काही पती आपल्या पत्नीच्या ह्या ५ अपेक्षा पूर्ण करणारेही असतात. या कोणत्या पाच अपेक्षा आहेत ज्या बायकोला आपल्या नवरा करून असतात? याची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

कुणा दुसर्याच्या बागेत लाडाने वाढलेले पुष्प नवऱ्याच्या घरची बाग आणि संसारवेल फुलवते ती म्हणजे पत्नी. माहेरच्या लाडात उगवलेली सरिता स्वतःच्या कक्षा रुंदावत नवऱ्याच्या सर्व गुणदोषांसकट स्वतःच्या पोटात घालूनही संथ वाहणारी नदी म्हणजे पत्नी.कुटुंबातील प्रत्येकाचे टोमणे सहन करूनही सर्व कर्तव्य निमूटपणे पार पाडून कुटुंबासाठी झटते ती म्हणजे पत्नी. प्रेम त्याग आणि परोपकाराचे दुसरे नाव म्हणजे पत्नी.संसार आपत्य कुटुंब या सर्वांना जिने वाहन दिलेले असते ती म्हणजे पत्नी.

 

पत्नी ही पतीची अर्धे अंग असते. म्हणूनच पत्नीला अर्धांगिनी म्हणतात. पत्नी संकटात खंबीरपणे साथ देत. सर्वांनी साथ सोडली तरी पत्नी कायम सोबत असते. साखर ज्याप्रमाणे पाण्यात विरघळते तशी संसारात विरघळून गोडवा निर्माण करणारी म्हणजे पत्नी.या पत्नीला आपल्या संसारामध्ये पतीकडून फक्त पाचच अपेक्षा असतात.

 

त्यातील पहिली म्हणजे सन्मानाची वागणूक.पदरी पडलेल्या प्रतिकृती प्रियकराला जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या कुशीतच स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या प्रेमळ प्रेयसीची म्हणजेच पत्नीची इच्छा असते की सन्मानाची वागणूक द्यावी. प्रत्येकच गोष्टीत पुरुषी अहंकार न आणता स्वतःवरून तिच्या अस्तित्त्वाचा आणि मनाचा विचार करावा. कुटुंबातील इतरांचे बोलणे ऐकून ती खूप दुःखी झालेल्या असते.पतीच्या चार शब्दाने ती सर्व कटू गिळून घेते. म्हणून नवऱ्याने बायकोला सन्मानाची वागणूक द्यावी. अशी बायकोची इच्छा असते.

 

दुसरी आपेक्षा म्हणजे दोषासोबतच गुणाकडे सुद्धा लक्ष द्यावे.जी व्यक्ती काम करते, निर्णय घेते तिच चुकत असते.वर्षानुवर्षे गॅरेज ला लावलेल्या गाडीचा कधी अपघात झालेला पाहला का? कित्येक वर्ष संसारामध्ये काम करून तिच्याकडून काही चुका होतात. परंतु एखादी चूक झाली तर त्याबद्दलचे बोलणे सर्वजण तिला बोलत असतात. मात्र चांगले काम झाले तर तिला कोणीच काय बोलत नाही. म्हणून चांगल्या कामाचे कौतुक करावे, चार कौतुकाचे शब्द तिच्याही मनाला आनंद देतात. ही बायकोची आपला नवरा कडून दुसऱ्या अपेक्षा असते की आपला चुकीबरोबरच गुणांकडे देखील लक्ष दिले पाहिजे.

 

तिसरी अपेक्षा म्हणजे, भांडणामध्ये दोघांनीही एक पाऊल मागे घ्यावं. ज्या घरातील नवरा-बायको स्वतःच्या चुका मान्य करून कबूल करतात. त्या नवरा बायकोचे प्रेम कधीही संपत नाही किंवा कमी होत नाही. नातं टिकवणं ही प्रक्रिया दोन्ही बाजूने व्हायला हवी. परंतु पुरुष प्रधान संस्कृतीमुळे नेहमी माघार या बायकाच घेत असतात. म्हणूनच त्याची अपेक्षा असते. नेहमी माघार बायकोनीच घेतल्यापेक्षा नवऱ्यानेही घ्यावी.

 

चौथी अपेक्षा म्हणजे मुले आणि समाज यांच्यापुढे अपमान करू नये. प्रत्येक नवरा बायको मध्ये भांडणेही होत असतात आणि ती श्रीखंड सारखे असतात जशी कधी गोड तर कधी आंबट. प्रत्येक नवरा बायकोचे किरकोळ भांडण होत असतेच. परंतु हे भांडण मुलांसमोर आणि समाजापुढे केलेला अपमान स्त्रीला गर्भगळीत करतो. मानसिक खच्चीकरण स्त्रीला थकवते. काहीवेळा इतरांच्या पती पत्नीच्या नात्यात हस्तक्षेप करण्याने संसार धुळीस मिळण्याची भीती असते. अशावेळी संयमाने आणि धीराने गैरसमज दूर करायला हवे.

 

पाचवी अपेक्षा म्हणजे दुःख आणि आजारपण त्यामध्येच खरी परीक्षा असते. असे म्हटले जाते पत्नीचे खरे रूप नवऱ्याच्या आर्थिक संकटात दिसतं तर नवऱ्याचा खरा स्वभाव पत्नीच्या आजारपणात दिसते. आजारपणात आणि दुःखात बायकोला नवऱ्याचा हात हातात हवा असतो. पत्नी अशी व्यक्ती आहे जिच्या असन्याने आयुष्यात वसंत बहरतो आणि नसन्याने फाल्गुनामधली उदासीनता जाणवते. तिच्या आजारपणामध्ये तिला तिच्या नवऱ्याचे असणे खूप महत्त्वाचे वाटते. हीच तिची अपेक्षा असते.

 

नवऱ्याकडून अतिशय माफक अपेक्षा ठेवणारी, प्रत्येकासाठी झिजणारी आणि काहीही झाले तरी संसाराला जपणारी म्हणजे पत्नी. स्वतःच्या जिवातून एक नवा जीव निर्माण करणारी विश्व निर्माती म्हणजे पत्नी… माहेरच्या उंबरठ्याबाहेर पडल्यावर वेटना पिऊन सासरचे गोडवे गाणारी थोर स्त्री म्ह म्हणजे पत्नी

माहेरी गेल्यावरही उरात सासरी परतीची धास्ती आणि ओढ असणारी सुद्धा पत्नी…आयुष्य संपून अनंताच्या प्रवासाला निघताना ही सासरकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता. माहेरचीच साडी नेसून मार्गक्रमण करणारा देह सुद्धा पत्नीचाच !!

 

अशा प्रकारे या काही पाच अपेक्षा आहेत. ज्या पत्नीला आपल्या पतीकडून असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *