मित्रांनो, मुंग्या लाल आहेत की काळ्या? तसेच एखाद्या विशिष्ट मार्गाने येत असल्या तर अनेक प्रकारचे संकेत मिळतात. म्हणून जर तुम्हाला घरी मुंग्या दिसल्या तर नक्कीच त्यांच्याकडे लक्ष द्या. तसेच, मुंग्या घरात वरच्या किंवा खालच्या दिशेने जात आहेत. याशिवाय आपल्या घरात मुंग्यांना काही खायला मिळत आहे की नाही, बर्याच घटनांबाबतही संकेत आहेत. याची माहिती आज आपण जाणुन घेणार आहोत.
ज्योतिषशास्त्राप्रमाणे घरात मुंग्या असतील जीवनात काही वेगळे घडणार असल्याचे संकते आहे समजावे. घरात अचानक काळ्या मुंग्या दिसू लागल्या तर त्या ऐश्वर्य आणि धन वृद्धीचे संकेत देतात. परंतू मुंग्या अधिक प्रमाणात असल्या तर कुटुंबात मतभेद होऊ शकतात म्हणून मुंग्यांना साखर टाकावी. याचा एक अर्थ तर हा आहे की कमी संख्येत मुंग्या असणे सुख, शांती आणि समृद्धीसाठी सकरात्मक संकेत आहे. परंतू अधिक संख्येत मुंग्या असल्यास घराबाहेर गूळ ठेवावे.
याने घरातील मुंग्या नाहीश्या होतील. तसेच एक उपाय हा देखील आहे की काळ्या मुंग्या लक्ष्मीचा रुप मानल्या गेल्या आहे अशात काळ्या मुंग्यांचे झुंड दिसल्यास त्यांना हळद- कुंकुं वाहण्याची प्रथा आहे. यानंतर शक्य असल्यास लाल रंगाचे वस्त्र नेसून लक्ष्मीची उपासना करावी, असे करणे लाभदायक ठरेल. तसेच नवीन घराची नीव ठेवताना तेथे काळ्या मुंग्या दिसणे शुभ आहे. मुंग्यांचा झुंड असल्यास आधी त्यांना कणिक टाकावी नंतर काम सुरु करावे. पुन्हा येथे सांगत आहोत की कमी मुंग्या दिसणे लाभकारी तर जास्त प्रमाणात मुंग्या दिसणे संकट येण्याची शक्यता दर्शवतं म्हणजे अचानक घरात दाणे एकत्र करत असलेल्या मुंग्या दिसू लागल्या तर संकट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या व्यतिरिक्त अचना रांगेत अधिक संख्येत मुंग्या चालत असल्या तर संकट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या व्यतिरिक्त अचना रांगेत अधिक संख्येत मुंग्या चालत असल्या तर पावसाचे संकेत आहे. या व्यतिरिक्त नमकीन पदार्थांमध्ये मुंग्या लागल्यास वाईट काळ येण्याचे संकेत असतं. जर तुमच्या घरी काळया मुंग्या येत असतील तर ही सुखी आणि समृद्धीची चिन्हे आहेत. त्याच वेळी, जेव्हा आपण घरात लाल मुंग्या पाहता तेव्हा सावधगिरी बाळगा. लाल मुंग्या अशुभ मानल्या जातात. त्यांचे दृष्य भविष्यातील त्रास, विवाद, पैसे खर्च होणार असल्याचे दर्शवितात.
वरच्या बाजूने जाणारी काळ्या मुंग्यांची रांग तुमचा उत्कर्ष दाखवते. तर खालच्या बाजूने जाणारी रांग अधोगती दर्शवते. बऱ्याच वेळा लोक काळ्या मुंग्यांना साखर, पीठ इत्यादी घालतात. कारण काळी मुंगी देवमुंगी मानतात आणि तिला साखर घालणे शुभ मानतात. साखरेच्या डब्यालामुंग्या येत असतील तर काही नवीन नाही, पण जर या मुंग्या तांदळाच्या डब्याला येत असतील, तर काही दिवसांतच तुमच्या पैशाची वाढ होणार हे एक शुभ चिन्ह आहे. त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.
भौतिक सुखसुविधा असलेल्या गोष्टींसाठी काळ्या मुंग्या येणे शुभ मानले जाते.लाल मुंग्या घरातून बाहेर जाताना दिसत असतील तर तेही शुभ चिन्ह आहे. लाल मुंग्या कडकडून चावतात. याच कारणाने बहुदा त्यांना राक्षस मुंग्या म्हटले जात असावे. अशा मुंग्यांनी त्वरित घराबाहेरच मार्ग निवडावा म्हणून त्यांच्यासाठी अन्नपदार्थ किंवा चिमूटभर साखर दाराबाहेर टाकावी. त्यांना घराबाहेर पाठवावे, पण जाता जाता त्यांनाही अन्नदान करावे.
मुंग्या कुठल्या दिशेने घरात शिरकाव करत आहेत, यानेही खूप फरक पडतो. जर घरात काळ्या मुंग्या उत्तरेकडून येत असतील तर ती तुमच्यासाठी शुभ चिन्हे आहेत. पूर्वेकडून मुंग्यांचे आगमन म्हणजे आपल्या घरी कोणतीही सकारात्मक माहिती येऊ शकते. त्याच वेळी, पश्चिम दिशेने मुंग्या आल्यामुळे, बाहेरच्या प्रवासाची तयारी होऊ शकते. परंतु दक्षिण दिशेने मुंग्या येत असल्यास त्यांना त्वरित प्रतिबंध घालावा.
अशा प्रकारे घरात मुंग्या आल्या तर काय घडते याची महिती आज आपण जाणुन घेतली आहे.