गरजेपुरता मामा, आणि ताकापुरती आज्जी, मतलबी लोकांना असे ओळखायला शिका ..!!

Uncategorized

मित्रांनो, मनुष्याच्या आयुष्यात योग्य दिशा प्रदान करण्याचे काम चांगले सुविचार करतात. निराशेच्या गर्तेत गेलेल्या व्यक्तीला पुन्हा विचारांची व सकारात्मकतेची उभारी देण्याचे काम चांगले सुविचार करतात. म्हणूनच आज आपण या लेखातून सुंदर सुविचार जाणुन घेणार आहोत.

 

एकाच व्यक्तीवर मन स्थिर राहिले पाहिजे हजार असतील पर्याय समोर तरी मनाला आवरलं पाहिजे कधी न होऊ द्यावा प्रेम जुनं.. जुन्याच्याच नव्याने प्रेमात पडता आलं पाहिजे अबोला, राग, रुसवा, दुरावा याने नातं अजून घट्ट झालं पाहिजे नातं समजून उमजून एकमेकांना साथ दिली पाहिजे जुन्याच्याच नव्याने पुन्हा पुन्हा प्रेमात पडता आलं पाहिजे..!

नातं तेच टिकतं ज्यामध्ये दोघेही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नाहीत.

भडजींची कथा आणि बायकोची व्यथा एक सारखी असते, समजत काहीच नाही तरी लक्षपूर्वक ऐकण्याचं नाटक करावं लागतं.

स्वतःवर प्रेम करायला शिका कारण लोकांचं काय ते आज आपले.! उद्या दुसऱ्यांचे..!

जो आपल्या वाईट वेळात हाजीर असतो, तोच आपला वजीर असतो.

दुसऱ्याला नावं ठेवताना स्वतःची लायकी आधी बघावी, माणसानं लय साजूक तुपातलं असल्यासारखं वागू नये कारण कारस्थानं ही प्रत्येकाची माहिती असतात, म्हणून स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही सवय बंद करावी..!

जग हे तुम्हाला विकायला बसलं आहे तुम्ही फक्त टिकायला शिका.!

फिरताना साधं राहणीमान घेऊन फिरायचं पण जवळ एवढं ठेवायचं की बसलेल्या जागी समोरच्याला खरेदी करू शकेल..! नेहमी वजनात राहायचं..

नात्यात कितीही वाद झालं तर एकमेकांचा असलेला आदर हा कायम असला पाहिजे..!

तुम्ही मदत किती लोकांना केली हे महत्त्वाचं नसतं तर जाणीव किती लोकांनी ठेवली हे अर्थपूर्ण असतं कारण आजार बरा झाला की डॉक्टरकडे कोणी फिरकून पहात नाही तसेच गरज संपली की तुम्हाला कोणी ओळखत नाही आणि स्वतःची ओळख देत नाही, हाच माणसांचा नवा रिवाज आहे.

स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारा असेल तर त्याला गमवायची चूक कधीच करू नका कारण आजकाल खरं प्रेम भेटायला नशीब लागतं.

जुने आठवत राहिल्यानं फक्त त्रास होईल, नव्याने सुरुवात केली की प्रत्येक क्षण हा खास होईल..

भाऊ हा सक्खा असो किवा मानलेला. एका बहिणीच्या आयुष्यात त्याची जागा उंचच असते.

काही शब्द हे ओठांच्या आत मध्येच बरे असतात नाहीतर व्यक्त करून परत आपणाला हृदयाशी घालमेल करायला लावतात…

वेड्यासारखं शांत रहा लोकांचे रंग हे स्पष्ट दिसतील.

प्रत्येक वेळी कारणं देऊन चालत नाही नातं खरच टिकवायचं असेल तर थोडा वेळही द्यावा लागतो..

जे आपल्या भोवती असतात त्यात सगळेच आपले नसतात, जवळ बसतात प्रेमानं हसतात पण वेळ आल्यावर तेच डसतात.

स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचा वापर करू नका आणि आपलाही वापर कुणाला करू देऊ नका.

असत्य नेहमी गोंगाट करतं सत्य हे मात्र शांततेत सिद्ध होतं..

सगळं सहज मिळेल, एवढं सोपं आयुष्य कधीच नसतं प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते, आणि ती वेळ आल्यावरच आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळत असते.. म्हणून प्रयत्न करत राहायचं.. ते कधी सोडायचं नाहीत..

नातं हे तोडायला नाही पाहिजे असं म्हणतात, पण समोरच्याला आपली कदरच नसेल तर त्याच्यापासून दूर गेलेलेच बरं असतं.

आजकाल जेवढी लाज पैसे उदार मागणाऱ्याला वाटत नाही, त्यापेक्षा जास्त लाज दिलेलं पैसे परत मागताना वाटते..

मनाचा कौल आणि आयुष्याचा तोल सांभाळायला शिका म्हणजे आयुष्यात कधीच कोसळणार नाहीत..

उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे..!

कर्म करताना नेहमी सावध राहा कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम हा बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही, उशिरा का होईना कर्माचं फळ मिळत असतं..

इच्छा या जरी आपल्या असल्या तरी काही गोष्टी आपल्या नसतात.

प्रवास हा कोणताच कठीण नसतो फक्त आपले विचार हे सकारात्मक पाहिजेत.

 

अशा प्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *