खूप सेवा करूनही प्रचिती येत नाही, कारण अश्या ५ प्रकारच्या लोकांना स्वामी कधीच पावत नाही… ..!!!

Uncategorized

मित्रांनो, आपला हिंदू धर्मानुसार आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते आणि या देवघरामध्ये आपण आपण ज्या देवी देवतांची मनापासून भक्ती करत असतो त्या देवी देवतांची आपण खूप मनःपूर्वक नामस्मरण देखील करत असतो. अनेक जणांची स्वामी महाराजांवर देखील खूप भक्ती असते आणि ते त्यांची मनापासून सेवा करत असतात. त्यांची आराधना करत असतात. त्यांची पूजा करत असतात. परंतु कितीही सेवा केली तरीही त्यांना त्यांची प्रचिती येत नसते. याचे कारण कोणते व कोणत्या पाच व्यक्तींना प्रचिती येत नाही? याबद्दलची माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

अनेक जण खूप मनापासून भक्ती भावाने स्वामी महाराजांची पूजा अर्चा करत असतात. मंत्र जाप करत असतात. परंतु कितीही पूजा केली, मंत्र जप केले तरी देखील त्यांना स्वामी महाराजांची प्रचिती येत नाही. परंतु याउलट अनेक जणांना फक्त स्वामी महाराजांचे नामस्मरण केले तरी त्यांची प्रचिती येत असते. स्वामी महाराज त्यांना प्रत्येक संकटातून दूर करत असतात. अशा लोकांवर स्वामी महाराजांचे कृपा कायम असते. ते त्यांना कोणत्याही संकटामध्ये एकट्याला सोडत नाहीत. ते सतत त्यांच्याशी सोबत असतात.

 

आपले कर्म कसे आहे यावर देखील आपली वेळ अन अवलंबून असते. जर आपले कर्म चांगले असेल तर आपली येणारी वेळ देखील चांगली असते व प्रत्येक संकटातून आपल्याला कोणता ना कोणता मार्ग स्वामी महाराज दाखवतच असतात. या उलट जर आपले करण चांगले नसून वाईट असेल तर त्यातून आपल्याला बाहेर पडणार मार्ग मिळत नाही. त्याचबरोबर जरी तुम्ही चांगले कर्म केला तरी तुम्हाला आधीच्या कर्माचे फळ हे भोगावेच लागतो. त्यामुळे तुम्हाला स्वामी महाराजांची प्रचिती येत नसते आज आपण काही पाच लोकांनी विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांनी कितीही सेवा केली तरी त्यांना स्वामी महाराजांचा प्रचिती येत नाही.

 

त्यातील पहिले व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती फक्त स्वतःचाच विचार करत असते. दुसऱ्यांच्या हिताचा विचार करत नाही. फक्त स्वतःचे हित होईल हेच बघत असतील. त्या व्यक्तींना स्वामी महाराजांचे प्रचिती तुम्ही येत नाही. म्हणून आपण नेहमी गोरगरिबांचा, दुसऱ्यांचा विचार करावा. आपल्याबरोबर इतरांना देखील फायदा कसा होईल याचा विचार करणे खूप गरजेचे आहे. जर आपण कोणतेही कार्य करत असताना इतरांचा विचार केला व इतरांचे हित पण त्यातून कसे होईल याचा विचार करून जर आपण ते कार्य केले तर नक्कीच आपल्याला देव देखील मदत करेल. त्यांची प्रचिती देखील येईल. त्यामुळे कधी स्वतःचा सार्थ साधू नये. स्वार्थीपणाने कोणतेही कार्य करू नये.

 

दुसरा प्रकारचे लोक जे आहेत ते म्हणजे जे लोक आई बाबांचा सतत अपमान करत असतात. त्यांचा छळ करत असतात. आई-बाबांचा मान राखत नाही. त्यांना समाजामध्ये अपमानास्पद बनवतात. अशा लोकांना देव कधीही प्रचिती देत नाही. आई-बाबा हे आपले प्रथम परमेश्वर असतात. कारण त्यांनी आपल्याला जन्माला घातलेले असते. त्यांनी आपल्याला उभे राहायला शिकवलेल्या असतात आणि अशा परमेश्वराचा जर आपण अपमान करत असतो तर आपल्याला देव कधीही पावणार नाही. त्यात देवाची कधीही आपल्याला प्रचिती येणार नाही. म्हणून कधीही आपला आई-बाबांना दुःख देऊ नये. त्यांचा छळ करू नये. त्यांचा आपल्याला आशीर्वाद कसा मिळेल याकडे लक्ष आपण दिले पाहिजे.

 

तिसरे लोक म्हणजे ज्या घरांमध्ये स्त्रियांचा मान राखला जात नाही. त्या घरामध्ये देवाची प्रचिती कधीही येत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना लक्ष्मीचे स्थान दिलेले आहेत आणि ज्या घरात या लक्ष्मीलाच आदर मन सन्मान दिला जात नाही. त्या घरामध्ये लक्ष्मी तर कधीच नांदत नाही आणि या घरातील लोकांना दारिद्र अवस्था प्राप्त होतेच व त्यांना देवाची कधीही प्रचिती येत नाही व संकटातून ते मार्ग काढू शकत नाही. म्हणून आपल्या घरातील स्त्रियांना मान सन्मान द्यायला हवा. त्यांचा मान राखला पाहिजे. तरच आपल्याला देव पावेल.

 

चौथी गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान केला जातो अशा घरात देव कधीही प्रचिती देत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अन्नाचा अपमान म्हणजे नेमके काय? ज्या घरामध्ये जास्त प्रमाणात अन्न शिजवले जाते व ते थोडेफार खाऊन नंतर ते सर्व अन्न टाकून दिले जाते. त्याचबरोबर ताटामध्ये जास्त अन्न घेऊन त्यातील थोडंच अन्न खाल्ले जात असेल व बाकीचे अन्न फेकून दिले जात असेल. तर याला अन्नाचा अपमान म्हटले जाते आणि असा अन्नाचा अपमान करणारा घरांमध्ये नक्कीच एकदा एक दिवस दारिद्रता येते व अन्नपूर्णा माता देखील घरातून निघून जात असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नाला अन्न हे पूर्ण ब्रह्म असे म्हटले जाते. म्हणून कधीही अन्नाचा अपमान करू नये. जेवढे अन्न आपल्याला हवे आहे तेवढेच घ्यावेत व जेवढे अन्न आपल्याला लागेल तेवढेच शिजवावे.

 

पाचवे लोक म्हणजे जे लोक वाईट गोष्टींचा अवलंब करून पैसा कमवत असतील किंवा वाईट गोष्टी करत असतील. अशा लोकांना देखील देवाची प्रचिती कधीही येत नाही. म्हणून आपण नेहमी सत्कर्म केले पाहिजे. कोणत्याही वाईट मार्गाचा अवलंब करू नये. जर तुम्ही सतत चांगले कर्म केले तर नक्कीच तुम्हाला देव पावेल. वाईट मार्गाच्या अवलंब करणाऱ्या लोकांना कायम लोक शाप देत असतात. त्यामुळे लोकांचे अहित होत असते. म्हणून कधीही वाईट मार्गाचा अवलंब करू नये. सत्कर्माचा अवलंब करावा. तुम्हाला देव पावेल. त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीला वाईट शब्द तोंडातून काढून बोलू नये व कोणाचेही निंदा करू नये.

 

अशाप्रकारे या पाच व्यक्ती आहेत त्यांना कधीही स्वामी महाराज आपली प्रचिती देत नाहीत. त्यांना कितीही सेवा केली तरी त्यांना प्रचिती देत नसतात. म्हणून आपण या गोष्टी कधीही करू नयेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *