कोणी सारखा सारखा अपमान करत असेल, तेव्हा फक्त ह्या ५ गोष्टी शिका…… परत कोणाची हिम्मत होणार नाही तुमचा अपमान करायची ?

Uncategorized

मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला आपल्या आत्मसन्माना पेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नसते. जर एखाद्या व्यक्तीचा सतत अपमान करत असेल, ज्या व्यक्तीचा कोणी आदर करत नाही अशी व्यक्ती जिवंतपणे देखील मेल्या सारखे असते. अनेक लोक असे म्हणत असतात की आमचा कोणी आदर करत नाही! आमचा लोक सतत अपमान करत असतात! यासाठी आम्ही काय केले पाहिजे? तर आजच्या लेखांमध्ये आपण अशा काही पाच गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्यामुळे जर या पाच गोष्टी तुम्ही अमलात आणला तर संपूर्ण जग तुमचा आदर करेल. तुमचा सन्मान करेल! कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

 

आजच्या लेखामध्ये आपण ज्या पाच गोष्टी जाणून घेणार आहोत त्या पाच गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अमलात आणल्या तर संपूर्ण जग तुमचे आदर करेल, तुमचा सन्मान करेल. परंतु या पाच गोष्टी ज्या व्यक्ती अमलात आणणार नाही त्यांचा लोक अनादर करतील, त्यांचा सतत अपमान करतील. म्हणून या पाच गोष्टी आपला जीवनात आणलात आणणे खूप गरजेचे आहे.

 

पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर करायला शिका. कारण जोपर्यंत आपण स्वतः आपला आदर करायला शिकत नाही तोपर्यंत आपल्याला समाज कधीही आदराच्या नजरेने आपल्याकडे पाहणार नाही आणि त्यामुळे समाजामध्ये आपला सतत अपमान होत राहील. म्हणून आपण आपली काही तत्त्वे बनवली पाहिजेत. काही लिहून नियम बनवले पाहिजेत. जेणेकरून आपल्याला आपला प्रति आदर वाटला पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला तुमच्याबद्दल आदर वाटेल. तेव्हा नक्कीच तुम्हाला समाजामध्ये देखील आदर मिळेल.

 

दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी रुबाबात राहा. आपण नेहमी आपल्याला रुबाबात ठेवले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आपण महागडे कपडे, महागडे वस्तू विकत घ्याव्यात. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये आपण आपल्याला कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. त्यावर समोरचा व्यक्ती आपल्याशी कसे वागेल. हे अवलंबून असते. आपण जर व्यवस्थित राहिलो तर नक्कीच समोरची व्यक्ती आपल्याशी व्यवस्थित वागेल. म्हणून आपण नेहमी रुबाबात राहिले पाहिजे.

 

तिसरी गोष्ट म्हणजे मोठी ध्येय ठेवा. जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्याला समाजामध्ये मानसन्मान मिळावा तर आपली ध्येयही मोठी असायला हवेत. आपले आपल्या ध्येय साध्य करण्याची धडपड खूप जास्त प्रमाणात असायला हवी. त्याच प्रकारे आपली ध्येय देखील मोठी असावी. कारण यश गाठण्यासाठी आपण नक्की प्रयत्न केले पाहिजेत. कारण प्रयत्नार्थी परमेश्वर आपल्याला प्राप्त होतच असतो. म्हणून आपली ध्येय ही मोठी ठेवावी. तरच आपल्याला समाजामध्ये मानसन्मान मिळेल.

 

चौथी गोष्ट म्हणजे सातत्याने ज्ञान वाढवत रहा. जर समाजामध्ये आपल्याला मानसन्मान मिळावा असे वाटत असेल, आपला कोणी अपमान करू नये असे वाटत असेल तर आपल्या ज्ञानामध्ये वाढ करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर आपल्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असेल तर नक्कीच आपल्याला कोणीही अडाणीच्या नजरेने पाहणार नाही आणि आपण जर आपल्या असलेल्या ज्ञानामध्ये सतत भर करत गेलो तर नक्कीच आपण चांगले यश मिळवण्यात मागे पडणार नाही आणि त्यामुळेच आपल्याला समाजामध्ये मान सन्मान देखील मिळेल.

 

पाचवी गोष्ट म्हणजे बोलण्याचा कलेमध्ये पारंगत व्हा. आपला अपमान होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जी आपला असणे खूप गरजेचे आहे ती म्हणजे आपल्याला आपला बोलण्याचा कलेमध्ये पारंगत घ्यायला हवे. कारण कधी कोणत्या शब्द वापरावे हे जर आपल्याला माहीत असेल तर नक्कीच आपण कोणतेही निश्चित ध्येय साध्य करू शकतो. पण कोणत्या व्यक्तीशी कशा प्रकारे बोलावे कोणत्या व्यक्तीशी काय बोलावे हे जर आपल्याला योग्य ज्ञान असेल तर नक्कीच आपल्याला समाजामध्ये योग्य ते स्थान मिळेल.

 

अशा प्रकारे या काही पाच गोष्टी आहेत. या गोष्टी जर आपण अमलात आणल्या तर नक्कीच आपल्या कोणीही अपमान करणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *