मित्रांनो, आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकत आलेलो आहे की कोणाचा तळतळाट घेऊ नका. कारण त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतात. काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय, आणि ते त्याचे भोग भोगत आहेत. त्यांना मात्र नक्की पटेल.अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो. या तळतळात विषयच आचार लेखामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत.
आपण कोणालातरी त्रास दिलेला असतो जसं की शारीरिक, मानसिक, आर्थिक अपमानास्पद वागणूक, कोणाचे मन दुखावले असेल, कोणावर अन्याय केला गेलेला असेल, छळ केलेला असेल,कोणाच्या हक्काची प्रॉपर्टी घेतली असेल, कोणाला अनिती काम करायला भाग पाडलं असेल, शारीरिक दुखापत केली असेल,विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल,त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो.
तो खूप दुःखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असतं. पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकते. जाणून बुजून त्रास जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजलं नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाम देत नाही. पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा निघते. व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषले जाते. मग समोरच्या व्यक्तीला त्याची हाय लागते.
त्यालाच तळतळाट असं म्हटलं जातं. मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही. किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही. सतत अपयश येतं. घरात आजार पण येतं. अशा अनेक प्रकारच्या घटना घडवू शकतात. आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला आणि आपल्या अंतर्मनालाच माहीत असतं. समोरच्याचे मन दुखावले जाणार म्हणजे पाप लागणार. त्याचे परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते.
तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब व्याजासहित परत करावाच लागतो. राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्याने श्री कृष्णाला विचारले की, असं का व्हावं माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महानपातक केलेले नाही. की ज्याचा परिणाम स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख शोषणं माझ्या नशिबी यावं. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राज्याला आपले पूर्व जन्म पाहण्याचे दिव्यदृष्टी दिली.
धृतराष्ट्र राजाने दिव्यदृष्टी द्वारे पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता. आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावले होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले.मात्र आगेची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले. तर पक्षांचे शंभर एक लहानपिल्ली ऊडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राज्याचे त्या वेळची ती क्रिया होती.
त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राज्याचे 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हाच ते पूर्ण झाले. कर्म हे फळ देऊनच शांत होत.प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होतं. वाईट कर्म वाईट फळ देऊन शांत होत. फक्त वेळ आणि काळ मागेपुढे होऊ शकतो.
हाच कर्माचा सिद्धांत आहे. हाच कर्माचा सिद्धांत आहे. आता आपणच ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे. ” जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर” ।। क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो निती भ्रष्ट.
अशाप्रकारे म्हणून कोणाचाही तळतळाट घेऊ नये.