कोणत्या तीन स्त्रिया आहेत, ज्या कधीच विधवा बनत नाहीत……!!

Uncategorized

मित्रांनो भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये स्वतः म्हणतात, की ज्ञानी व्यक्तीला कधीच कोणीही हरवू शकत नाही. मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत, ज्या कधीच विधवा बनत नाहीत. भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मते, तीन स्त्रिया त्यांच्या आयुष्यात कधीच विधवा बनत नाहीत. आपण हे सर्व जाणून घेणार आहोत, एका प्राचीन कथेमार्फत.

 

एकदा नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णू यांना भेटण्यासाठी क्षीरसागरावर पोहोचले. त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रणाम करून नारद मुनी विचारू लागले, प्रभू पतीव्रता स्त्री कोण असते? त्याचबरोबर अपतिव्रता स्त्री कोणती असते ? असे कोणते कार्य आहेत, जे केल्यामुळे पतिव्रता स्त्रीचा पतिव्रता धर्म नष्ट होतो. मला या विषयात कृपया ज्ञान द्यावे. कृपया तुम्ही माझी ही दुविधा दूर करा. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू यांनी पतिव्रता स्त्रियांबद्दल तीन लक्षणे सांगितली. ज्या स्त्रियांमध्ये हे तीन लक्षण असतात, त्या स्त्रीचा वंश हा शुद्ध असतो. अशा स्त्रीच्या घरी नेहमी माता लक्ष्मी निवास करत असते.

 

त्या स्त्रीच्या पतीसोबतच वडिलांना सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होत असते. ज्या स्त्रिया पतिव्रता असतात, त्यांना मृत्यू पश्चात विष्णू लोकांची प्राप्ती होते. पतिव्रता स्त्रीच्या महानतेचे वर्णन करताना भगवान श्रीहरी विष्णू यांनी अत्यंत पवित्र कथा ऐकवली आहे. या कथेचा फक्त श्रवण केल्याने, व्यक्तीला श्रीहरी विष्णू यांच्यामार्फत पुन्याची प्राप्ती होते. जो पण मनुष्य लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने ही कथा ऐकतो, भगवान श्रीहरी विष्णू त्यांचे २१ अपराध माफ करतात आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्याने ही कथा लक्षपूर्वक नक्की ऐकावी.

 

प्राचीन काळातील गोष्ट आहे. मध्य देशामध्ये एक अतिशय शोभनीय अशी नगरी होती. त्या नगरीमध्ये एक पतिव्रता ब्राह्मणी राहत होती. तिचं नाव होते उज्वला. उज्वलाच्या नवऱ्याला मागच्या जन्माच्या पापकर्मामुळे या जन्मामध्ये कोड झाला होता. अर्थातच त्याला कोडाचा रोग झाला होता. त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी जखमा झाल्या होत्या. नवऱ्याची अशी दुर्गती पाहूनसुद्धा उज्वलाने तिच्या नवऱ्याचा साथ सोडला नाही आणि निर्मल भावनेने ती नवऱ्याची सदैव सेवा करत होती. पतीच्या मनात ज्या पण इच्छा असायच्या, त्या सर्व इच्छा उज्वला तिच्या परीने पूर्ण करण्याचा सदैव प्रयत्न करायची. उज्वला रोज जशी देवाची पूजा करायची, तशी नवऱ्याची सुद्धा पूजा करायची. तिच्या सर्व इच्छांचा त्याग करून ती नवऱ्यावर अत्यंत मनोभावे प्रेम करत होती.

 

एके दिवशी उज्वलाच्या नवऱ्याला रस्त्याने जाणारी एक सुंदर वैश्या दिसली. त्या वैश्याला पाहून तिचा उपभोग घेण्याची इच्छा उज्वलाच्या नवऱ्यामध्ये झाली. तो त्या वैश्यावर पूर्णपणे मोहित झाला. त्या वैश्येच्या सुंदर रूपाने त्या ब्राह्मणाला पूर्णपणे तिच्या वश मध्ये केलं होतं. तिचं रूप पाहून त्या ब्राह्मणाला आता एक क्षणही राहता येत नव्हतं आणि जेव्हा ती वैश्या त्या ब्राह्मणाच्या नजरेपासून दूर झाली, तेव्हा ती ब्राह्मण अत्यंत दुःखी झाला. नवऱ्याचा आवाज ऐकून उज्वला लगेचच धावत घरातून बाहेर आली आणि नवऱ्याला विचारू लागली, हे नाथ काय झालं? तुम्ही इतके उदास का दिसत आहात? तुमचा श्वास इतका का चढला आहे? तुम्हाला जे पण कष्ट असतील, ते मला सांगा. तुमचं जे पण काम असेल ते मला सांगा मी ते नक्कीच पूर्ण करेन. हे प्राणनात एकमात्र तुम्हीच माझे गुरु आहात प्रियतम आहात.

 

पत्नीच्या अंशा विचारल्यानंतर त्या ब्राह्मणाने म्हटलं, हे प्रिये मला जे हवं आहे, ते तू मला नाही देऊ शकत. तूच काय कोणीही मला हे देऊ शकत नाही आणि म्हणूनच या गोष्टीवर व्यर्थ बोलणं योग्य नाही आणि म्हणूनच तू ही गोष्ट सोडून दे. तेव्हा उज्वला म्हणाले, हे प्राणनाथ मला विश्वास आहे, की मी तुमचं हे कार्य नक्कीच पूर्ण करेन. तुम्ही फक्त मला आज्ञा द्या, मी माझी पूर्ण शक्ती लावून ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. ते कार्य पूर्ण करण्यासाठी जो पण उपाय असेल तो मी नक्कीच करेन. मी तुमचं हे कार्य जर पूर्ण करू शकले, तरच माझा कल्याण होऊ शकेल. तेव्हा उज्वलाच्या नवऱ्याने म्हटलं, हे प्रिये ठीक आहे तू इतकच हट्ट करत आहेस, मग मी तुला सांगतो. आत्ताच या रस्त्याने एक सुंदर अशी वैश्या जात होती. तिचा शरीर अत्यंत सुंदर आणि मनमोहक होता.

 

जिला पाहून तिचा उपभोग घेण्याची इच्छा माझ्या मनामध्ये झाली आहे. जर तू असा कोणता उपाय करू शकलीस, ज्यामुळे ती सुंदर वेश्या मला मिळू शकेल तर माझा जन्म सफल होईल. हे देवी तू मला त्या वैश्याला मिळवून दे आणि माझी आग शांत कर.नवऱ्याने असं म्हटल्यावर उज्वला अत्यंत दुःखी झाली व त्यानंतर ती म्हणाली, है नाथ तुम्ही धीर धरा. मी तुमचं हे कार्य नक्कीच पूर्ण करेन आणि त्या वैश्या सोबत तुमची भेट नक्कीच घडवून देईन. इतकं म्हटल्यानंतर उज्वलाने मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि मध्यरात्री उठून ती शेण आणि झाडू घेऊन घरातून बाहेर निघून गेली. जाता वेळेस तिच्या मनामध्ये खूप प्रसन्नता होती.

 

त्यानंतर ती त्या वैश्येच्या घराजवळ पोहोचली व त्यानंतर तिने त्या वैश्याच्या घराच्या अंगणाला झाडून झाडलं व त्यानंतर शेणाने सारवून त्या वैश्याचा अंगण अत्यंत सुंदर बनवला आणि लोकांचे लक्ष लागण्यापूर्वीच ताबडतोब ती तिच्या घरी परत आली. अशा प्रकारे उज्वलाने तीन दिवस त्या वैश्याच्या घराच्या अंगणामध्ये झाडू मारून ते आंगण शेणाने सारवलं. इकडे ती वैश्या तिचा घराचा अंगण पाहून सेवकांना विचारू लागली, अरे वा आज माझ्या अंगणाची इतकी चांगली स्वच्छता कोणी केली आहे? ज्याने पण माझा अंगण स्वच्छ केला आहे, त्याची मी इच्छा नक्कीच पूर्ण करेन.

 

तेव्हा वैश्याचे सेवक म्हणाले, हे स्त्री घराच्या अंगणाची स्वच्छता तर आम्ही केली नाही. आम्ही उठण्यापूर्वीच कोणीतरी या अंगणाची स्वच्छता करून निघून जाती. सेवकांचं बोलण ऐकून वैश्याला खूपच आश्चर्य वाटलं. ती विचार करू लागली, की असा कोण आहे जो माझ्या अंगणाची स्वच्छता करतो. त्या वैश्याची उत्कंठा वाढू लागली व त्यामुळेच ती रात्री झोपली नाही आणि लपून पाहू लागली की कोण अंगणाची स्वच्छता करत असतो. मध्य रात्र झाली तेव्हा वैश्याने पाहिलं की एक ब्राह्मणी तिच्या घराजवळ येऊन अंगणाची स्वच्छता करते व शेणाने अंगण साखते. ब्राह्मणीला पाहून ती वैश्या म्हणाली, हे देवी तुम्ही हे काय करत आहात? माझ्यासारख्या पापी स्त्रीच्या घराचा अंगण तुम्ही का साफ करत आहात? मला माफ करा, परंतु तुम्ही है काम नका करू.

 

इतकं म्हणून त्या वैश्याने त्या ब्राह्मणीचे पाय पकडले आणि म्हटलं, है पतीव्रते तुम्ही का माझं वय यश संपत्ती आणि कीर्तीचा विनाश करण्याच्या मागे आहात. मी असा कोणता अपराध केला आहे? हे साध्वी तुम्हाला जे पण हवं आहे, ते तुम्ही मागा. मी काहीही विचार न करता ते तुम्हाला देऊन टाकेल. परंतु तुम्ही कृपया हे कार्य करू नका. तेव्हा उज्वलाने वैश्याला म्हटलं, हे सुंदरी मला धनाचा कोणत्याही प्रकारे लोभ नाही. परंतु मला तुझ्याकडून एक कार्य करून घ्यायचा आहे. जर तू हे करणार असशील, तर ते कार्य मी तुला सांगेन. जर तू ते कार्य पूर्ण करणार असशील तर माझ्या मनाला शांतता मिळेल आणि तेव्हाच मी समजेल, की तू माझ्या मनातील इच्छा पूर्ण केली आहेस. तेव्हा ती वैश्या म्हणाली, हे पतिव्रते तुम्ही लवकर सांगा, मी तुम्हाला वचन देते की तुमचा जो काही कार्य असेल, ती कार्य मी नक्कीच पूर्ण करेन.

 

हे माता तुम्ही महान पतीव्रता आहात, तुमचं कार्य जर मी केलं, तर माझे सर्व पाप नष्ट होतील. तुमच्या चरणांना स्पर्श केल्यामुळेच, मी पापांतून मुक्त झाले आहे. कृपया तुम्ही लवकर सांगा, की मी तुमची कशाप्रकारे मदत करू शकते. तेव्हा उज्वला थोडी शरमेने म्हण लागली, है सुंदरी काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याची नजर तुमच्यावर पडली होती आणि तेव्हापासून ते तुमच्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. ब्राह्मणीचं असं म्हणणं ऐकून वैश्या आश्चर्यचकित झाली. काही क्षण ती विचारच करत होती. त्या वैश्याला एका कोड आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा विचार करूनच खूप दुःख वाटू लागला. तेव्हा ती वैश्या उज्वलाला म्हणाली, हे देवी जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन माझ्या घरी आलात, तर एका दिवसासाठी मी तुमच्या नवऱ्याची इच्छा अवश्य पूर्ण करेन.

 

तेव्हा उज्वलाने म्हटलं, हे सुंदर स्त्री मी आज रात्रीच माझ्या नवऱ्याला घेऊन तुमच्या घरी येते आणि जेव्हा ते तुमच्याकडून स्वतःची तृप्ती करून घेतील, तेव्हा मी पुन्हा त्यांना माझ्या घरी घेऊन जाईल. तेव्हा वैश्या म्हणाली, हे पतिव्रता स्त्री तू लगेच तुझ्या घरी जा जेणेकरून कोणीही तुला इथे पाहू नये आणि ताबडतोब तुझ्या नवऱ्याला घेऊन इथे ये. मी तुझ्या नवऱ्याची इच्छा नक्कीच पूर्ण करेन.त्यानंतर उज्वला तिच्या घरी निघून गेले व तिने जाऊन नवऱ्याला सर्व हकीकत सांगितली. तिने सांगितलं की आज रात्री ती त्याला त्या वैश्याच्या घरी घेऊन जाणार आहे

 

तेव्हा उज्वलाचा नवरा उज्वला म्हणाला, है प्रिये मी तिच्या घरी कसा जाणार? मला तर चालणं सुद्धा शक्य नाही. मग कशाप्रकारे है कार्य पूर्ण होऊ शकेल? तेव्हा उज्वला म्हणाली, हे प्राणनाथ तुम्ही चिंता करू नका, मी तुम्हाला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जाणार आहे आणि जेव्हा तुमचा कार्य पूर्ण होईल,तेव्हा तुम्हाला परत घेऊन येणार आहे. उज्वलाच्या तोंडून हे बोलणं ऐकून ब्राह्मण खूपच खुश झाला आणि ती उज्वला म्हणाला , हे कल्याणी तू एक महान स्त्री आहेस. तुझ्यापासून मी अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्यामुळेच माझा कार्य पूर्ण होणार आहे. तू आज जो कार्य तुझ्या नवऱ्यासाठी केला आहेस, असं कार्य या जगातील कोणतीही स्त्री करू शकणार नाही. हे देवी तू धन्य आहेस.

 

त्यानंतर रात्र झाली व उज्वला नवऱ्याला पाठीवर बसवून घेऊन जाऊ लागली.रस्त्यातच मांडव्य ऋषीला राजाने चोर समजून सुलीवर लटकवले होते. परंतु ते ऋषी अजूनही जिवंत होते आणि त्यांच्या तपस्येमध्ये लीन झाले होते. जेव्हा रात्रीच्या अंधारात उज्वला मांडव्य ऋषीच्या बाजूने जात होती, तेव्हा चुकून तिच्या नवऱ्याचा पाय मांडव्य ऋषीच्या शरीराला लागला आणि त्यांची तपस्या भंग झाली. मांडव्य ऋषी अत्यंत क्रोधीत झाले आणि शाप देऊ लागले, ज्या पापी माणसाने माझी तपस्या भंग केली आहे आणि मला वेदना दिल्या आहेत, ती पापी सूर्योदय होण्याबरोबरच भस्म होऊन जाईल. मांडव्य ऋषीने शाप देताच उज्वलाचा नवरा जमिनीवर पडला. मांडव्य ऋषीचा शाप ऐकून उज्वलाला खूप दुःख झालं आणि ती म्हणू लागली, आज पासून तीन दिवस सूर्योदय होणारच नाही. इतकं म्हटल्यानंतर उज्वला तिच्या नवऱ्याला घेऊन घरी गेली आणि नवऱ्याला अंथरुणावर झोपवून ती त्याच्या शेजारी बसली.

 

पतीव्रता स्त्रीच्या वाणीमध्ये इतकी शक्ती असते, की ती जे पण काही म्हणते, ते सर्व सत्य ठरते त्यामुळे पतीव्रता स्त्रीच्या म्हटल्यामुळे साक्षात सूर्यदेवाला सुद्धा तिच्या बोलण्याचं पालन करावं लागलं. कारण स्वतः श्रीहरी विष्णू यांनीच पतिव्रता स्त्रीला हा वरदान दिला आहे. की त्या जे पण काही म्हणतील, ते नक्कीच सिद्ध होणार आहे. त्यानंतर तीन दिवस सूर्योदय झाला नाही. सर्व जग अंधाराने ग्रासून गेले आणि तिन्ही लोकांमध्ये याची बातमी पसरली. हा दृश्य पाहून सर्वदेवता ब्रम्हा जवळ गेले आणि सूर्योदय न होण्याचा कारण विचारू लागले. तेव्हा ब्रह्मदेवाने सर्व देवतांना पतीव्रता स्त्री उज्वला आणि मांडव्य ऋषी यांचा सर्व वृत्तांत सांगितला. त्यानंतर सर्व देवता दिव्य विमानात बसून ब्रह्माजींसोबत उज्वलाच्या घरी गेले.

 

ब्रम्हाजीनी उज्वला म्हटलं, हे माता तू म्हटल्यामुळे सूर्योदय होत नाही. त्यामुळे संपूर्ण सृष्टी धोक्यामध्ये आली आहे. प्राण्यांचे जीवन धोक्यात आहेत. कृपा करून तू तुझे हे शब्द मागे घे आणि सूर्योदय होऊ दे. तेव्हा उज्वला म्हणाली, है भगवान एकमात्र माझा नवरा माझा गुरु आहे. माझा नवरा माझ्यासाठी तिन्ही लोकांपेक्षा मोठा आहे आणि सूर्योदय झाल्यानंतर माझ्या नवऱ्याचा मृत्यू होणार आहे. कारण मांडव्य ऋषींनी शाप दिला आहे. मी कोणत्याही लोभामध्ये रागामध्ये किंवा मोहामध्ये असं केलं नाही. मी फक्त माझ्या नवऱ्याचे प्राण वाचवू इच्छित आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे माते तुझ्या नवऱ्याचं आयुष्य इतकच होतं, तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूमुळे पृथ्वीचा कल्याण होणार आहे. तू तुझ्या नवऱ्याचे प्राण जाऊ दे. यामुळे तुला खूप पुण्य मिळणार आहे. तेव्हा उज्वला म्हणाली, हे ब्रम्हदेव पतीचा त्याग करून मला कुठल्याही लोकामध्ये सुखाची प्राप्ती होणार नाही. माझे पती माझ्यासाठी ईश्वर आहेत आणि म्हणूनच मी त्यांचा त्याग करू शकत नाही. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे कल्याणी तुझ्या ह्या पतीव्रता धर्मामुळे मी खूपच प्रसन्न झाली आहे.

 

तू आत्ता तुझा हा हट्ट सोडून दे आणि सूर्योदय होऊ दे. ज्यामुळे पूर्ण संसार स्वस्थ होऊन जाईल आणि आमच्या आशीर्वादामुळे तुझा कोड रोगाने ग्रसित नवरा सुद्धा काम देवासारखा सुंदर होईल. ब्रह्माजींनी असं म्हटल्यानंतर त्या पतिव्रता स्त्रीने थोडा वेळ विचार केला व त्यानंतर तिने ब्रह्मदेवांना होकार दिला व त्यानंतर सूर्योदय झाला व त्यानंतर मांडव्य ऋषींच्या शापामुळे लगेचच उज्वलाच्या नवऱ्याचा देहांत झाला व त्यानंतर त्या राखेतून कामदेवासमान अत्यंत सुंदर असा तिचा नवरा बाहेर आला. हा सर्व चमत्कार पाहून उज्वला अत्यंत प्रसन्न झाली व त्यानंतर स्वर्गलोकांतून एक अत्यंत तेजस्वी विमान आला व त्या विमानात उज्वला तिच्या नवऱ्यासोबत बसून स्वर्ग लोकांसाठी निघून गेली.

 

तर मित्रांनो अशा प्रकारे पतीव्रता स्त्रीमध्ये या संसाराला नष्ट करण्याची सुद्धा शक्ती असते. पतिव्रता स्त्री समोर मोठ मोठ्या देवांना सुद्धा माघार घ्यावी लागते. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, है नारद मुनी आता मी तुम्हाला स्त्रियांचे ते तीन लक्षणे सांगतो, ज्या स्त्रियांमध्ये हे तीन लक्षणे सांगतो, ज्या स्त्रियांमध्ये है तीन लक्षण असतात, अशा स्त्रिया कधीच विधवा होत नाहीत. पहिला लक्षण आहे, जी स्त्री पतिव्रता असते, जी स्त्री पतिव्रता धर्माचा पूर्णपणे पालन करते अशी स्त्री कधीच विधवा होत नाही. नंबर दोन, जी स्त्री तिच्या नवऱ्याचा कोणताही शब्द खाली पडू देत नाही. नवऱ्याची इच्छा लगेचच पूर्ण करते, नवऱ्याने जे सांगितलेलं कार्य असेल ते कार्य करण्यासाठी ती स्त्री सदैव तत्पर असते अशी स्त्री कधीही विधवा होत नाही. नंबर तीन, जी स्त्री नवऱ्यासाठी कोणासमोर ही माघार घेत नाही. देवांनाही तिच्यासमोर माघार घ्यावी लागते, अशी स्त्री सुद्धा कधीच विधवा होत नाही.

 

अशाप्रकारे कोणत्या तीन स्त्रिया आहेत, ज्या कधीच विधवा बनत नाहीत याची माहिती आज आपण जाणुन घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *