मित्रांनो, शनीची साडेसाती ही सात वर्ष आणि सहा महिन्यांची असते. या कालावधीला तीन टप्प्यांमध्ये विभागले जाते. पहिला टप्पा (शनी कुंभ राशीच्या आधीच्या राशीत असतो). दुसरा टप्पा (शनी कुंभ राशीत असतो). तिसरा टप्पा (शनी कुंभ राशीनंतरच्या राशीत – मीन राशीत असतो). सध्या कुंभ राशीवर दुसरा टप्पा सुरू आहे, जो 29 मार्च 2025 रोजी संपणार आहे. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे कुंभ राशीच्या जातकांसाठी साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.
हा कालखंड 3 जून 2027 रोजी संपणार आहे, ज्यावेळी कुंभ राशी साडेसातीच्या प्रभावातून मुक्त होणार आहे.कुंभ राशी ही शनीची स्वामी रास आहे, त्यामुळे शनी महाराज या राशीवर अधिक कृपादृष्टी ठेवतात. चांगले कर्म करणाऱ्यांना शनी महाराज कठीण प्रसंगांमधून देखील सकारात्मक फळं देतात. मात्र, साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, जरी हा टप्पा तुलनेनं सौम्य असला तरी आव्हानांचा सामना करावाच लागतो. पण आपण जर का कर्म चांगले केले असेल तर त्याचे तुम्हाला चांगलेच फळ मिळेल.
साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्याचे महत्व : साडेसातीचा तिसरा टप्पा हा व्यक्तीच्या जीवनातील परिणामाचा काळ असतो. म्हणजे तुम्ही कोणते चांगले कर्म केले किंवा वाईट कर्म केले असतील त्याचे फळ या टप्प्यात तुम्हाला शनिदेव देत असतात . या टप्प्यात शनी व्यक्तीच्या चांगल्या वाईट कर्मांचा निकाल देतात – चांगल्या कर्मांचे फळ लाभदायक असते, तर वाईट कर्माच्या परिणामस्वरूप अडथळे आणि त्रास सहन करावे लागतात. तिसऱ्या टप्प्यात जीवनात स्थैर्य येते, पण संयम, शिस्त, आणि धैर्य आवश्यक ठरते.
तिसऱ्या टप्प्यातील विविध परिणाम : या तिसरा टप्प्यात तुमच्या प्रगतीचा वेग कमी होईल. तिसऱ्या टप्प्यात काही वेळा अपेक्षित यश मिळण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो, पण योग्य प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. नोकरीत वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही जर का सहकार्याने काम केल्यास तुमच्यावरच्या अडचणी टळतील. करियरमध्ये नवीन जबाबदाऱ्या येतील, ज्या पूर्ण करणे तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहेत. व्यवसायिक क्षेत्रात माठे अडथळे येणार, पण तुम्ही जर का योग्य पद्धतीने नियोजन केले तर ते अडथळे तूम्हाला टाळता येणार आहेत.
तुमच्या नियोजनाचा अभाव आर्थिक संकट वाढवणार आहे. तिसऱ्या टप्प्यात आर्थिक स्थिती स्थिर होण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करणे आवश्यक आहेत. तुमच्याकडून अतिरिक्त खर्च सुद्धा होणार आहे. आणि तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही .कारण शनीचा तिसरा टप्पा तुमच्यावर चालू असणार आहे. त्याचा प्रभाव तुमच्यावर असणार आहे त्यामुळे या सर्व गोष्टी तुमच्या बाबतीत घडणार आहेत. त्यामुळे तुम्ही आर्थिक नियोजन गरजेचे आहे.
अपेक्षा पेक्षा जास्त खर्च झाल्यामुळे आर्थिक चणचण भासणार आहे. त्यामुळे तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. पण जर का तुम्ही सावध राहून बचत केली तर तुम्हाला ही परिस्थिती व्यवस्थित हाताळता येणार आहे. पैशाची व्यवस्थित नियोजन केलं तर सगळं सुरळीत होणार आहे. तुम्ही जर का गुंतवणूक करत असाल किंवा विचार करत असाल तर गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. तुमच्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य असला तरीही कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयात सतर्कता बाळगा. विचार करून निर्णय घ्या. तुमच्या वरिष्ठांशी बोलून मगच निर्णय घ्या.
शनीच्या तिसरा टप्प्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबासोबत तुमचे मतभेद वाढणार आहेत . ज्यामुळे घरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होणार आहे. तुम्हाला भावनिक ताण जाणवणार आहे .तुमच्या प्रेमसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो, पण तुम्ही जर का संवाद साधून आणि विश्वासाच्या माध्यमातून नातेसंबंध चांगले सुधारता येतील. त्यामुळे संवाद साधा . तरच नातेसंबंध टिकून राहील. शनीचा तिसरा टप्प्यामुळे तुमचे सामाजिक संबंध कमी होतील. जवळचे लोक जरा दूरवर जातील. त्यामुळे काही कुंभ राशीच्या व्यक्तींना एकटेपणाची भावना होऊ शकते. या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांची मदत मिळेल . तुम्हाला योग्य वेळी मित्रांकडून पाठबळ मिळेल.
आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर तुम्हाला थकवा जाणवणार आहे. मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल. तुम्हाला सांधेदुखी, त्वचारोग किंवा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या . सततचा मानसिक ताण आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. ताण तणावाचे तुमच्या आरोग्यावर चांगलेच परिणाम होणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनशैलीत सुधारणा करायला हवी. आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, आणि ध्यान आवश्यक आहे. शनीच्या तिसऱ्या टप्प्या मुळे संकटे आणि अडचणी येणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला कायदेशीर समस्या सुद्धा जाणवणार आहेत.
काही जातकांना कायदेशीर विवादांचा सामना करावा लागू शकतो. कायदेशीर परिस्थिती हाताळताना संयम आवश्यक आहे. कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी घाई न करता शांत राहून विचार करा. नाहीतर मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे . प्रवास करताना देखील अडथळे आणि अतिरिक्त खर्च येऊ शकतो. त्यामुळे योग्य नियोजन करा .
साडेसातीचा तिसरा टप्पा सौम्य का आहे ?
शनी कुंभ राशीची स्वामी रास असल्यामुळे शनीचा प्रभाव तुलनेने सौम्य ठरतो. कर्मांवर आधारित फलन होते. चांगले कर्म केल्यास यश आणि स्थैर्य मिळते. शनी संथ पण स्थिरतेकडे नेतो. तिसऱ्या टप्प्यात जरी आव्हानात्मक स्थिती असली तरीही दीर्घकालीन स्थैर्य निर्माण होतो. परीक्षेचा शेवट म्हणजे : शनीच्या साडेसातीचा शेवट हा सर्वसाधारणतः पूर्वीच्या अडचणींवर मात करण्याचा काळ असतो. म्हणजे तुम्हाला याआधी ज्या अडचणी आल्या होत्या त्या अडचणीवर मात करण्याचा हा काळ असतो .
शनीच्या कृपेसाठी उपाय :
1. शनीची उपासना : शनिवारी “ॐ शं शनैश्चराय नमः” या मंत्राचा जप करा. शनी मंदिरात काळ्या तीळाचे तेल आणि काळ्या वस्त्राचे दान करा. शनी चालीसाचे पठण करा.
2. दान आणि सेवा : गरजू लोकांना अन्न, कपडे किंवा आर्थिक मदत करा. शनिवारी गरीब किंवा अपंग लोकांना मदतीचा हात द्या.
3. ध्यान आणि संयम : तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. कोणत्याही परिस्थितीत शांत आणि संयमी राहा.
4. आत्मपरीक्षण : जीवनातील चुकांवर आत्मपरीक्षण करून चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करा.
5. कुटुंबीयांशी संवाद वाढवा : मतभेद कमी करण्यासाठी संवाद साधा आणि नातेसंबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करा.
कुंभ राशीच्या जातकांसाठी 29 मार्च 2025 ते 3 जून 2027 हा साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा असेल. हा टप्पा तुलनेने सौम्य आहे, पण तरीही जीवनात स्थिरता आणि यश मिळवण्यासाठी संयम, शिस्त, आणि चांगल्या कर्मांची गरज आहे. शनीच्या कृपेने आणि योग्य प्रयत्नांनी तिसऱ्या टप्प्यातील आव्हानांवर मात करता येईल, आणि 2027 नंतरचा काळ स्थिरतेचा आणि प्रगतीचा असणार आहे. त्यामुळे चांगले कर्म करा आणि चांगले योग्य फळ तुम्हाला शनिदेव देतील.
अशाप्रकारे कुंभ राशी विषयीची ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.