मित्रांनो, आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही यश मिळत जाते ते फक्त आपला आई-वडिलांमुळे असते. याची जाणीव आपल्याला ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण ते आपल्याला मोठे करण्यासाठी खूप काही करत असतात. खूप काबाडकष्ट करत असतात. जे त्यांना मिळालेल्या नाही ते आपल्या मुलाला मिळावे अशी त्यांची इच्छा असते आणि यासाठीच त्यांचे प्रयत्न चालू असतात. जेव्हा आपण मोठे होतो त्या वेळेला आपला आई-वडिलांना योग्य तो मान देणे खूप गरजेचे असते. याबद्दलची कथा आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
ही कथा उत्तर प्रदेश या शहरातील आहे. उत्तर प्रदेश मध्ये नवरा बायको राहत होते. नवऱ्याचं नाव जसवण आणि बायकोचं नाव ममता होतं. त्या लोकांच्या लग्नाला बरेच दिवस झाले होते. पण अद्याप त्यांना मुल बाळ नव्हतं. ते लोक बऱ्याच ठिकाणी फिरून आली बऱ्याच ठिकाणी जाऊन आले. बऱ्याच डॉक्टरांकडे जाऊन उपचारही घेतले. मंदिर, मज्जिद, दर्गा, चर्च प्रत्येक ठिकाणी जाऊन मुलासाठी त्यांनी प्रार्थना केली. असाच बराच वेळ निघून गेला आणि काही दिवसांनी अचानक ममताला समजले की ती गरोदर आहे आणि काही महिन्यातच तिला मुल होणार आहे. ही गोष्ट ती तिच्या नवऱ्याला सांगते. तिचा नवरा ही मुलाला घेऊन खूप टेन्शनमध्ये असायचा. त्यामुळे तो दारूही प्यायला लागला होता. पण ही बातमी ऐकताच तो आणखीन जास्त दारू पिऊ लागतो. कारण आतापर्यंत तो मुलगा होत नाही या टेन्शनमध्ये दारू पीत होता.
पण आता जेव्हाही आनंदाची बातमी त्याला मिळते तेव्हा तो जास्त आनंदात जास्त दारू पिऊ लागतो. आता हळूहळू त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीची वेळ येते. मात्र पत्नीच्या प्रसुतीची वेळ येतात जास्वंदला कळतं की जास्त मद्यपान केल्यामुळे त्याला असा आजर झाला आहे ज्यामुळे त्याचा दोन ते तीन महिन्यात मृत्यू होईल. आता हा विचार करून तो आतून जास्त अस्वस्थ होतो. तो बायकोला हे अजिबात जाणून देत नाही. हळूहळू प्रसंतीची वेळ येते आणि प्रसुती होते आणि जस्वंची पत्नी ममता तिने एका फुलासारख्या मुलाला जन्म दिला होता. आता घरात मुलगा जन्माला आल्याने आणखीन जास्त आनंद आजारी होऊ लागला होता. इकडे जसवण त्याच्या आजारपणाच्या टेन्शनमध्ये होता. पण तो विचार करत होता की काही हरकत नाही आता मूल जन्माला आला आहे तर माझं वंश सहज पुढे नेणारच आणि त्यानंतर या आनंदाच्या प्रसंगी तो आणखीन जास्त दारू पिऊ लागतो.
अल्कोहोलच्या ओव्हर डोज मुळे त्याचा आजार आणखीन जास्त वाढू लागतो आणि याच कारणास्तव अचानक त्याचा मृत्यू होतो. आता घरात दोन वातावरण तयार झाले होते. एक सुखाचा आणि एक दुःखाचा. एकीकडे ममतान एका मुलाला जन्म दिला होता. पण त्याच वेळेस दुसरीकडे तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. यामुळे ममता खूपच जास्त काळजीत होती. आता तिचं वयही वाढलं होतं. पण तिला सुचत नव्हतं की आता काय करावं. आता यानंतर तिथे शेजारी काही दिवस तिला मदतही करतात. पण काही दिवसांनी तेही तिला मदत करणे सोडून देतात. आता एकटी पडली होती. तिच्या पतीचे आधीच निधन झाले होते आणि आता मुलाच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर आली होती. यानंतर म्हणता आपल्या मुलाचे संगोपन करण्यासाठी इतरांच्या घरी काम करू लागते. कारण तिचे पती मजूर होते त्याच्याकडे अजिबात शेती नव्हती. गावात फक्त एक छोटसं घर होतं जे त्यांना वारसा हक्काने मिळाले आणि त्यांनी फक्त हेच ममता साठी सोडले होते.
ममता इकडे तिकडे इतर लोकांच्या घरी कबाड कष्ट करत होती आणि आपल्या मुलाला आधार देत होती. हळूहळू तिचा मुलगा आकाश शाळेत शिकायला जाऊ लागतो. तो शाळेत शिकतो आणि इकडे त्याची आई इतरांच्या घरी काम करून त्याची फी भरायची आणि हळूहळू हे काम करत वेळ जाऊ लागला. तिचा मुलगा आता दहावीत गेला होता. एक दिवशी त्याची आई शाळेतून त्याला घ्यायला येत होती. तेवढ्यात वाटेन जाताना तो आईला म्हणतो, आई मला न्यायला येत जाऊ नकोस. इथली सगळी मुलं माझी चेष्टा करत राहतात. ती तुझी आई इतरांच्या घरी काम करते आणि तू एक मोलकर्णीचा मुलगा आहेस. ममताने आपल्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश दिला होता आणि ममता ज्या घरात काम करायची त्या घरातील मुलही त्याच शाळेत शिकायला होती. ते मला म्हणायचे की तुझी आई आमच्या घरी कामाला येते आणि तू तिचा मुलगा आहेस आणि तुझी आई खूप घाणेरडी आहे.
आता ममताला तिच्या पंधरा वर्षाच्या मुलाकडून हे ऐकताच प्रथम तिला खूप वाईट वाटले. पण मग तिला वाटतं की काही हरकत नाही मुलाला जर वाईट वाटत असेल तर म्हणून तो असा बोलला असेल. म्हणून ती तिच्या मुलाला म्हणते की ठीक आहे बेटा आता तू मोठा झाला आहेस. त्यामुळे आता तो स्वतः शाळेतून घरी येऊन जाऊ शकतोस. हळूहळू असाच वेळ निघून जातो. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. तो अभ्यासात अतिशय हुशार होता. कधी कधी आकाश चे शिक्षक ममताल सांगायचे की, तुमचा मुलगा खूप हुशार आहे. हा एक दिवस खूप मोठे पद मिळवेल. आता हे ऐकल्यानंतर ममता असे वाटतं की माझा मुलगा खूप मोठा अधिकारी होईल आणि म्हणूनच ती तिच्या मुलाला म्हणते की तू अभ्यास करून एक मोठा अधिकारी व्हायचं आहे. आणि आकाशने ही तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढच्या शिक्षणासाठी शहरात जायचं बोलतो. तो म्हणतो की आई मी शहरात जाईन पण शहरात गेल्यावर मला जास्त पैसे लागतील. कारण तिथे अभ्यास करायला जास्त खर्च येईल. तेव्हा त्याची आई म्हणते की बेटा पैशांची काळजी करू नकोस. आज मी चार घरात काम करत आहे.
तर दहा घरात काम करेल पण मी तुला पैशांची कमतरता कधीच बसू देणार नाही. त्यानंतर ती तिच्या मुलाला शहरात शिकायला पाठवते आणि दर महिन्याला ती त्याच्या खर्च साठी दहा ते बारा हजार रुपये देते. हळूहळू वेळ असाच निघून जातो आणि तो पदवीधर होतो आणि पुढे तो मोठा अधिकारी होण्यासाठी कोचिंग करू लागतो. आता आपल्या घरच्या परिस्थितीचा विचार करून मोठा झालेला आकाश खूप मेहनत करतो आणि मेहनत केल्यावर एक दिवस त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळते आणि जेव्हा आकाश कलेक्टर बनतो तेव्हा सगळ्यात आधी तोही आनंदाची बातमी त्याच्या आईला देतो आणि तिला सांगतो की तो एक कलेक्टर झाला आहे. आता त्याच्या आईला हे ऐकताच ती आनंदाने वेडी होऊन संपूर्ण गावभर ओरडत सांगते की माझा मुलगा कलेक्टर झाला आहे! माझा मुलगा कलेक्टर झाला! पण लोकं तिच्यावर विश्वास ठेवत नाही. ही म्हातारी म्हातारपणात वेडी झाली आहे आणि म्हणूनच अशी म्हणतील कुठेही कामवाली बाई आणि तिचा मुलगा कलेक्टर कसा होणार.
यानंतर परिसरातील लोक तिची चेष्टा करू लागली. पण आपला मुलगा कलेक्टर झाल्याचा म्हाताऱ्या आईला खूप आनंद झाला. वेळ असाच हळूहळू निघून गेला. तिचा मुलगा ट्रेनिंग साठी जातो आणि ट्रेनिंगला जातात तो एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिथेच तिच्याशी लग्नही करतो. आता तो त्या मुलीच्या प्रेमात पडला होता त्याने तिच्याशी बोलणं सुरू केलं तेव्हा त्याने मुलीला सांगितलं होतं की या जगात माझं कोणीही नाही. तो एक अनाथ मुलगा आहे. यानंतर आकाश एक कलेक्टर झाला होता एका जागी त्याची पोस्टिंग होते आणि त्याचं लग्न तर आधीच झालं होतं. तो त्याच्या आईला फोनवर त्याच्या लग्ना ची बातमी सांगतो. पण हे ऐकताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. कारण तिने तिच्या मुलाच्या लग्नासाठी खूप मोठी स्वप्न पाहिली होती.
पण तिच्या मुलाने तिची सर्व स्वप्नात चक्का चोर केली होती. त्यानंतर ती त्याच्याशी अधिक वेळ बोलती तो तिला सांगतो की मी इथे चांगली नोकरी करत आहे आणि इथे एक मोठा बंगलाही आहे आणि आम्ही त्याच घरात राहतो. तो त्याच्या आईला त्याचा पत्ताही सांगतो. की आई आम्ही इथे राहतो. त्यावर त्याची आई म्हणती की बाळा तू मला कधी भेटायला येत आहे. मला माझ्या सुनेला तर दाखव पण तिचा मुलगा तिचं म्हणणं टाळतो आणि म्हणतो की वेळ आली की मी तुला तुझ्या सुनेशी भेट नक्कीच करून देईल. अशीच वर्ष उलटून निघून गेली आणि आज दोन-तीन वर्षांनी पुन्हा तिच्या मुलाचा फोन आला. हा तिच्या मुलाचा फोन आला आणि तो म्हणतो की आई तुला नातू झाला आहे तुझ्या सुनेने एका मुलाला जन्म दिला आहे. आता ही गोष्ट ऐकून म्हाताऱ्या आईला आणखीन जास्त वाईट वाटतं. कारण आज व तिने आपल्या मुलाच्या बायकोलाच बघितलं नव्हतं आणि आता तिला एक नातूही झाला होता.
आता हे विचार करून म्हातारी आई जास्त दुखी होते. रडून रडून तिची हालत खराब झाली होती. यावेळेस पुन्हा तिने आपल्या मुलाला विचारलं की तो इथे कधी येणार आहे. सगळे माझी इथे चेष्टा करतात. म्हणतात की म्हातारपणामुळे ती म्हातारी वेडी झाली आहे आणि तिचा मुलगा कलेक्टर झाला आहे. म्हणून असं सांगत आहे. तो एवढा मोठा कलेक्टर झाला असता तर तिला इथून कधीच घेऊन गेला असता. पण यांना कोण समजावणार आकाश पुन्हा तिथे बोलणे टाळतो आणि म्हणतो की आई वेळ आल्यावर मी तुला तुझ्या सुनेला आणि तुझ्या नातूला नक्की भेट करून दे. आता तिला नातू झाला होता आणि नातू झाल्याच्या आनंदात ममता तिच्या मुलाकडे जाण्याचा निर्णय घेते. पण त्याआधी तिच्याकडे असलेल्या काही पैशांनी ती बाजारात जाऊन तिच्या सुनेसाठी साड्या आणि नातूसाठी काही खेळणी विकत घेते. काही मिठाई विकत घेते आणि त्या सर्व सामानाचं गाठोड बांधून ट्रेन पकडते आणि मुलाच्या शहरात उतरते. तिच्या मुलाने तिला एकदा त्याचा पत्ता दिला होता. शिवाय तिचा मुलगा या शहरातील कलेक्टर साहेब होता. त्यामुळे तिला त्याचा पत्ता शोधायला जास्त त्रास झाला नाही.
तिने एक ऑटो रिक्षावाल्याला तो पत्ता विचारला आणि मुलाचं नाव देखील सांगितलं आणि म्हणाली की मी कलेक्टर साहेबांची आई आहे. मला त्यांच्या घरी जायचं आ.हे रिक्षावाल्याचाही यावर विश्वास बसत नाही. कलेक्टर हे खूप मोठे पद आहे आणि त्याची आई अशा फाटक्या अवस्थेत पण रिकक्षावाला तिला त्याच्याकडे घेऊन जातो. मग त्याला कुठे जायचं आहे याची माहिती असल्याने तिने त्याला तिच्या मुलाचा पत्ता सांगितला होता. जे काही तिला आठवत हो.तं त्यानंतर रिक्षावाला त्या म्हाताऱ्या आईला कलेक्टर साहेबांच्या घराबाहेर आणून सोडतो म्हणतो की आई हेच ते घर आहे. ज्याबद्दल तुम्ही बोलत होतात. कलेक्टर साहेब इथेच राहतात. त्यांच्या घराबाहेर त्यांच्या नावाची पाटी होती आणि नावाच्या फलकावर त्यांच्या मुलाचे नाव मोठ्या अक्षरात दिले होते. यानंतर दीक्षा चालक तिला खाली उतरवून तेथून निघून जातो. तेवढ्यात म्हातारी आई घरात जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा अचानक गेटवर गार्ड तिला अडवतो आणि विचारतो की, आई तुम्ही आत कुठे जात आहात. तुम्हाला कोणाला भेटायचं आहे.
तर म्हातारी आई सांगते की मला तुमच्या साहेबांना भेटायचं. जो माझा मुलगा आहे. जा आणि त्याला सांगा की तुला भेटायला तुझी आई आली आहे. यानंतर गेटमॅनचा प्रथम यावर विश्वास बसत नाही. पण नंतर तो विचार करतो की जर खरंच या साहेबांच्या आई असतील तर म्हणून तो गार्ड घराच्या आत जातो पती-पति दोघेही बसले होते. संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळी तो गार जाऊन त्यांना सांगतो की एक म्हातारी बाई बाहेर आली आहे आणि ती तुम्हाला तिचा मुलगा असल्याचा सांगत आहे आणि ती तुम्हाला भेटायला सांगत आहे. तेव्हा आकाशच्या बायकोने हे ऐकले. तेव्हा ती लगेच त्याला बनते की तू मला सांगितलं होतं की तुझा या जगात कोणी नाही मग आता ही तुझी आई कुठून आली. पण मग आकाश म्हणतो की मला काय माहित नाही. चल जाऊन बघू कोण आलंय. ते इथे पती-पती दोघेही घराबाहेर पडतात. आकाशची बायको तिथेच उभी होती पण आकाशची आई आकाशला समोर पाहून खूप खुश होते. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडतात. ती म्हणते की बाळ आकाश कसा आहेस.
हे बघ तुझी आई तुला भेटायला आली आहे. तेव्हाच आकाश म्हणतो कोण आहेस तू, मी तुला ओळखत नाही आणि मी तुझा मुलगाही नाही. काहीतरी गैरसमज झाला आहे. तू तुझ्या मुलाला दुसरीकडे जाऊन शोध. आता जेव्हा त्याच्या आईने हे ऐकले तेव्हा तिला लगेच समजते ती आपल्या मुलाला चांगली ओळखत होती. ती तिच्या मुलाला तिला भेटायचेच नाही. आता यानंतर ती आपल्या सूनेकडे पाहते आणि लगेच म्हणते की बाळा माझ्याकडून चुक झाली आणि कदाचित म्हातारपणात माझी नजरही कमजोर झाली आहे. म्हणूनच मी तुमच्या घरी आली आहे. असं म्हणतात आकाश त्याच्या पत्नीसह घरात निघून जातो. इकडे म्हातारी आई त्याच्या गार्डला बोलवते आणि म्हणते की बाळा तू माझ्यासाठी एक पत्र लिहू शकतोस का? तेव्हा तो गार्ड म्हणतो की ठीक आहे आई मी तुमच्यासाठी पत्र लिहून देतो. बोला काय लिहायचं आहे. आतून पेन आणि कागद घेऊन येतो आणि म्हणतो आई बोला काय लिहायचं आहे.
त्यावर ती म्हातारी आई म्हणते की बाळा माझा मुलगा मागून आला तर त्याला ते पत्र दे. आणि त्यांनी माझ्याबद्दल काही विचारलं तर त्यांना सांग की ती आई जिथून आली होती त्याच ठिकाणी परत निघून गेली. हे ऐकून तो गार्ड ते पत्र ठेवून घेतो. पण ही गोष्ट त्याला आपल्या आप खात होती की या म्हाताऱ्या आईने असं का लिहिलं असेल. कारण त्या म्हाताऱ्या बाईने पत्रात जे काही लिहिलं होतं ते ऐकून काढ चिंतेत पडला होता. काही वेळाने त्याचा मालक तिथे येतो आणि मग तो म्हणतो की माझी आई कुठे आहे. तेव्हा तो गार्ड त्यांना ते पत्र देत म्हणतो की तुमची आई जिथून आल्या होत्या तिथेच परत निघून गेल्या. यानंतर आकाश ते पत्र त्याच्या खिशात ठेवून आज निघून जातो. जाताच त्याने त्याचे कपडे चेंज करून नाईट ड्रेस घातला. तितक्या तिथे त्यांची बायको आली आणि ते कपडे सांभाळून ठेवू लागली. तेवढ्यात त्या कपड्यांच्या खिशातून ते पत्र खालीच जमिनीवर पडली तेव्हा आकाशलाही त्या पत्राकडे पाहू लागला. कारण तो ते पत्र वाचायला विसरला होता. पण ते पत्र आता त्याच्या बायकोच्या हाती लागले होते आणि ती ते पत्र वाचू लागली होती.
तर वाचून त्याच्या समोर आले आणि ती घसा घसा रडू लागली. त्यानंतर ती तिच्या नवऱ्याकडे पाहून म्हणाली की तुम्ही असं कसं करू शकता. ज्या आईने तुम्हाला लहानाचं मोठं केलं. तुम्हाला तुमच्या पायावर उभा केलं आणि या लायक बनवलं की तुम्ही समाजात ताट मानेने जगू शकाल आणि आज त्याच आईला तुम्ही ओळखण्यास नकार दिला. हे ऐकून आकाश लगेच त्याच्या पत्नीला म्हणाला की मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सुरुवातीला जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडलो होतो तेव्हा मी तुला सांगितलं होतं की या जगात माझं कोणीही नाही. पण माझ्या आईनेच मला लहानाचं मोठं केलं आणि मला सक्षम बनवलं आता ती अचानक इथे आली होती. मला भीती वाटत होते की माझं रहस्य उघड होईल आणि म्हणूनच मी तिला ओळखण्यास नकार दिला होता.
आता हे ऐकून त्याची बायको त्याला समजावून सांगते की ही चांगली गोष्ट नाही. ज्या आईने तुमच्यासाठी इतका काही केलं तिला आज तुम्ही दारातून माघारी पाठवून दिलं. हे तुम्ही चांगलं नाही केलं. आता आकाश मात्र खूप भाउक झाला होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले होते. त्यालाही कळून चुकलं होतं की आज त्याने जे काही त्याच्या आई सोबत केलं ते खूप चुकीचं होतं. मग त्याने ठरवलं की आपण सकाळी लवकर उठू आणि लवकर उठल्यानंतर तो त्याच्या बायको आणि मुलाला घेऊन त्याच्या आईला भेटण्यासाठी जाऊ. खरं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या पत्रात आईने असं काय दिलं होतं. त्या पत्रात तिने लिहिले होते की,
बाळा मी तुला यासाठी लहानाचं मोठं नाही केलं की तू मोठा माणूस झालास की मलाच विसरशील. पण मला आता कळून चुकलं आहे की तू आता खूप मोठा माणूस झाला आहे आणि आता तुला माझी गरज पूर्ण नाही तुझे कुटुंब छान आहे. मी देव्हा जवळ प्रार्थना करीन की तू तुझ्या कुटुंबात आनंदी रहा. सुखी रहा पण देव न करो तुझा मुलगा उद्या तुझ्यासोबत असं वागू नये. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पती-पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन थेट त्याच गावात जातात. जिथे त्याची आई राहत होती. तिथे गेल्यावर आकाशने त्याच्या आईची माफी मागितली आणि त्याच्या पत्नीची त्याच्या आई सोबत भेट करून दिली.
इथे त्याची बायको सासूच्या पायाला हात लावून तिची माफी मागते. पतीच्या या कृत्याबद्दल आणि म्हणते की आई जे काही घडले ते माझ्यामुळे झाला आहे. कारण त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांचं या जगात कोणीही नाही आणि तुम्ही अचानक त्यांच्यासमोर हजर झाला त्यांना त्यावेळेस काही करावं तेच समजत नव्हतं. म्हणूनच ते तसं बोलून गेले. पण रात्रभर दडून त्यांनी स्वतःचे हाल करून घेतले आहेत आणि म्हणत होते की मी माझ्या आईसोबत खूप वाईट केलं. यानंतर आईचे प्रेमही जागृत होते आणि ती आपल्या मुलाला मिठी मारते. त्यानंतर तिथे असलेल्या गाठोड्यातून साड्या आणि खेळणी काढून आपल्या सुनेला आणि नातवाला देते आणि संपूर्ण वस्तीला ओरडून सांगते की हे बघा माझा मुलगा आला आहे. जो जिल्हाधिकारी झाला आहे. आता त्याला पाहून परिसरातील लोकही गप्प होतात. तर करू लागतात ती मातादी बरोबर बोलत होती त्यांचा मुलगा प्रत्यक्ष अधिकारी साहेब त्यांच्या आईला सोबत घेऊन त्यांच्या बंगल्याच्या आत घेऊन जातात. कलेक्टर साहेब ऑफिसला जायचे आणि मागून त्यांची बायको आणि आई दोघीही एकमेकांच्या सोबत आनंदाने राहायच्या.
अशा प्रकारे ही एक सुंदर कथा आहे.