आपल्या सोबत जे लोक वाईट वागतात बघा त्यांच्यासोबत काय घडत?

Uncategorized

मित्रांनो,आपण कर्म करतो तसे फळ आपल्याला भोगावे लागतात. आपल्यासोबत जे लोक वाईट वागतात त्यांच्यासोबत वाईटच होतं. म्हणून नेहमी आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होईल दुसऱ्याला दुःख होईल असं कधीच वागू नये कारण आपले कर्म आपलं भविष्य ठरवत असतात आपले कर्म आपल्या सुखदुखात कारण असते. आपल्या सोबत वाईट वागणाऱ्या लोकांचे काय होते? ते जाणून घेणार आहोत.

 

आपण जे कर्म करत असतो त्याचं आपल्याला फळ हे भविष्यामध्ये कधी ना कधी मिळत असतो. म्हणून आपल्याला कायम चांगले कर्म केलेच पाहिजे. हे या लेखात आपण एका कथेतून जाणून घेणार आहोत. दोन व्यापारी असतात. ती एका महिन्यानंतर आपल्याला घरी परतत असतात आणि एक महिन्यांमध्ये केलेली कमाई म्हणजेच पैसे त्यांच्याबरोबर असतात. परंतु आंधर झालेला असतो. खूप अंधार पडत असतो आणि त्यामुळे त्यांना अंधाराची भीती वाटत असते.

 

तेवढा त्यांना एक घर दिसते तेव्हाचा ते घरामध्ये रात्री झोपून पुन्हा सकाळी आपण पुढे जाऊ असा विचार करून त्या घराजवळ जातात आणि त्या घरातील घरमालकाला विचारतात. ‘आम्ही दोघे आजची रात्र येथे राहू शकतो का?’ तो घर मालक त्या दोघांना घरामध्ये राहण्याची परवानगी देतो आणि ज्यावेळी त्या दोघांच्या मध्ये हे बोलणे चालू असते तेव्हा व्यापारि यांच्याकडे असलेल्या पैशाच्या बॅगेकडे घर मालकाचे लक्ष जाते.

 

आणि त्याच्या मनात विचार येतो की जर आपल्याला हे पैसे मिळाले तर आपण किती श्रीमंत होईल. असा विचाराणे तो खूप लालशी हावरट वृत्तीचा होतो आणि तो स्वतः दोन व्यापाऱ्यांना आपल्या घरामध्ये बोलावतो आणि आपल्या मुलांच्या खोलीमध्ये त्यांना घेऊन जातो. आणि तो घरमालक त्या दोन व्यापाऱ्यांना म्हणतो, ‘ही माझ्या मुलांची रूम आहे. तुम्ही दोघे इथे झोपू शकता!’ त्याप्रमाणे हे दोन व्यापारी त्या रूममध्ये झोपतात.

 

या घरमालकाला पैशाचा खूप हावरटपणा झालेला असतो. त्यामुळे तो दोन गुंठांना भेटायला जातो आणि त्या दोन गुंडांना सांगतो की, ‘माझ्या घरामध्ये एक रूम आहे आणि त्या रूम मध्ये दोन व्यापारी झोपलेले आहेत. त्या व्यापाऱ्यांना तुम्ही जर मारले तर मी तुम्हाला हवे तितके पैसे देईल!’ यावर ते गुंड देखील आपल्याला पैसे मिळणार म्हणून हे काम करण्यासाठी तयार होतात.

 

घर मालक पुन्हा घरात येतो व आपल्या रूममध्ये जाऊन झोपतो. तो झोपी गेला नंतर त्याची दोन मुले परत घरी येतात आणि ते आपल्या रूममध्ये जातात. त्यावेळी त्याचे दोन व्यापारी झोपलेले दिसतात. त्यांना ते उठवतात आणि त्यांना बोलतात की, ‘ही आमची रूम आहे. तुम्ही इथे कसे काय झोपू शकता! बाहेर जाऊन झोपण्यासाठी ते त्यांना सांगतात. त्याप्रमाणे ते दोन व्यापारी बाहेर जाऊन झोपतात. घर मालकाची मुले रूममध्ये जाऊन झोपतात.

 

मध्यरात्रीच्या वेळी ते गुंड लोक घरामध्ये शिरतात. आणि त्या रूम मध्ये झोपलेला दोन माणसांना ते मारून टाकतात. ज्यावेळी सकाळ होते त्यावेळी ते दोन व्यापारी उठतात आणि त्यांना खोलीच्या बाहेर रक्त पडलेल्या दिसत. त्यावर ते घरमालकांना बोलवण्यासाठी आरडा ओरड करू लागतात. घर मालक बाहेर येतो तेव्हा त्याला ते दोन व्यापारी जिवंत दिसतात.

 

आणि जे दोन व्यक्ती मेले आहेत ते त्याची मुले होती. हे त्याला जेव्हा समजते तेव्हा त्याला खूप दुःख होते व आपली चूक त्याला कलते. जेव्हा आपण कोणाचे वाईट करायला जातो तेव्हा आपलेच वाईट होते हे त्याला कळून चुकते. आपले कर्म जैसे असते त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत असते हे त्याला कळते.

 

अशा प्रकारे जर आपण कोणाचे वाईट चिंतत असेल तर आपलेच आधी वाईट होत असते. म्हणून कधीही कोणाचे वाईट चिंतू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *