आई वडील आहेत तोपर्यंत… Emotional Speech….Ashok Todmal… वाचून डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही..!!

Uncategorized

मित्रांनो, जगात दोनच खरे ज्योतिषी आहेत, मनातलं जाणणारी “आई ” आणि भविष्य ओळखणारा ” बाप “. आपण अनेक जणांकडे ज्योतिषशास्त्रांकडे जातो आपले हात कोणासाठी आपले भविष्य ओळखण्यासाठी परंतु आपल्याला हे माहीत नाही की आपले भविष्य जाणवणारे ज्योतिषी फक्त दोनच आहेत ते म्हणजे आपली आई आणि आपले बाबा. आई-बाबांचे महत्त्व सांगणारे एक इमोशनल स्पीच आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

आई बाबा या दोन शब्दांचं इतके महत्व आहे आपल्या आयुष्यात कि सांगता येणार नाही,कारण हे फक्त शब्द नाहीयेत तर आपले आयुष्य आहे. आई म्हणजे ती जिने फक्त जन्मचं नाही तर हे आयुष्य दिलं हे विश्व दाखवले, आणि बाबा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली असे आई बाबा. अगदी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत ते आपल्यासाठी झटत आहे नको ते कष्ट,हव्या त्या नको त्या सर्व गरजा पुरवत आहे, पण खरं म्हंटल तर आजच्या मुलामुलींना सर्व काही भेटूनही ते आईबाबांचं महत्व विसरत चालले आहे. कारण आई बाबा हे शब्द आता फारसे ऐकूही येत नाही.

 

त्यांची जागा आता मम्मी,मॉम,पपा,ड्याड ह्या शब्दांनी घेतली आहे आणि या शब्दांमुळेच आईबाबांचं महत्व कमी झालंय असं वाटायला लागलं आहे. काळ बदलतोय तसं आईबाबांसोबत चे जे संबंध आहे आजच्या मुलामुलींचे तेही बदलताना दिसत आहे,तो आदर ती नम्रता ह्या गोष्टींची कमतरता भासायला लागली आहे असं वाटतं. जसे जसे मुलंमुली मोठे होत चालले आहे तसं आईबाबांच्या सोबतचे ते बोलणं बसणं कमी होत जातं,जे निर्णय घेयचे असतात मुलामुलींना ते जवळच्या मित्रांना ते सांगणं योग्य त्यांना वाटतं पण आईबाबांना नाही का? तर ते बोलतील रागावतील त्यांना त्यातलं काही कळत नाही अशी आजच्या मुलामुलींची स्थिती होत चालली आहे,आणि यातच आईबाबांचे महत्व आपण विसरत चाललोय असं वाटतं.

 

आपल्यापेक्षा जास्त पावसाळे त्यांनी पाहिले काय योग्य काय नाही हे त्यांना चांगलं माहित असते तरी आज आपण त्यांना बोलू देत नाही, बोलले तर त्याचा आपल्याला त्रास वाटतो सहन होत नाही,कारण बदलत्या वेळेनुसार आपणही बद्दलो आणि त्यांचा त्रास होतो म्हणून त्यांना आपण वृद्धाश्रमात ठेवतो का तर ते नसले कि आपलं आयुष्य असं मोकळं आपणंच आपल्या मनाचे राजे.खरं तर त्यांनी असे दिवस पाहायला आपल्याला जन्म दिलेलं नसतो,पण आपण त्यांचा मनाचा विचार कुठं करतो त्यांचा भावना आपण कुठे समजून घेतो.

 

आईबाबा हे दोनच असे व्यक्ती आहे जे आपल्या प्रत्येक गोष्टीत सोबत असतात तेच आपल्या जवळ असतात पण आपण त्यांना आपल्या जवळच समजत नाही,ज्यांनी स्वतःचे पंख कापून आपल्या पंखांना उडायचे शिकवले त्यांना आज आपण महत्व देत नाही. खरं तर आईबाबा हे दोनच असे आहेत ह्या विश्वावर ज्यांची जागा कोणी नाही घेऊ शकत आणि हेच आजचे मुलंमुली विसरत चालले आहे.

 

शरिराला असणारं श्वासाचं महत्व कधी सांगता येईल का? जमिनीचं आकाशाशी असणारं, दिव्याच वातीशी असणारं नातं शब्दात कसं सांगता येईल, तसंच अगदी आपल्याला ज्यांनी या सुंदर आयुष्याची देणगी दिली, ज्यांनी आपल्याला सूक्ष्मातली सूक्ष्म आणि प्रत्येक गोष्ट शिकविली आज आपलं अस्तित्व ज्यांच्यामुळे आहे त्यांचं महत्व हे शब्दांत मांडता नाही येणार, परंतु एक सांगू हे शब्दही आणि सुंदर होतात जेव्हा मी त्यांच्याविषयी लिहायला लागते, आणि तेव्हा शब्द सापडत नसले तरीही अर्थपूर्ण होतात त्यांच्यामुळे. यापेक्षा आणखी मोठं सुख कोणतं असू शकतं लिहिण्याचं .

 

ही खरंच किती छान गोष्ट आहे कि आपण त्यांना पाहून, त्यांचं अनुकरण करत मोठे होत असतो, सर्वच बाजूने, आणि ते आपल्या जगण्याचं कारण असतात. कितीही मोठ्यातली मोठी चूक आपल्या हातून घडू द्या, त्यासाठी कडक शासन आणि माफीची तरतूदही त्यांच्याकडेच असते. आपण एक छान माणूस व्हावं यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात, झगडत असतात , असीम कष्ट घेत असतात. फक्त आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देतात. हे फक्त आणि फक्त आपले आई – बाबाच करू शकतात. आणखी कोणीही नाही.

 

फक्त सध्या वाढत चाललेली वृद्धाश्रमांची संख्या बघते तेंव्हा फारच अस्वस्थ , निराश, आणि हैराण होते, हतबल त्याहीपेक्षा ज्यास्त कारण जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याहीपेक्षा ज्यास्त ज्या आई – बाबांचं महत्व आहे, त्यांच्या निस्वार्थ , निर्मळ, प्रेमाविषयी, कसे सांगावे त्या निर्दयी आणि अभागी लोकांना हे समजत नाही आणि मुळात सांगण्याची वेळ यावी हे आपलं दुर्भाग्यच. कधी जाग येईल याबाबतीत हे प्रश्न मात्र अनुत्तरित असतात, कारण आपण कुणातही परिवर्तन करू शकत नाही ” आपल्याशिवाय “. नाही का ?

 

आपलं कस होत माहित आहे का , तुझे आहेतुजपाशी, परी तू जागा चुकलासी. आपण आईवडील सोडून ना सगळ्यांना मान देतो. आई बाबासोडून सगळ्यांचे काम ऐकतो आणि करतोसुद्धा. मित्रासाठी ४ कोस दूर काम असलं तरीजाणार पण आईने बाजारातून काही सांगितलं कि लगेच भांडण करणार . आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे , जॉबसाठी किंवा इतर अनेक कारणामुळे मुलांना आई बाबा वेळ नाही शकत. पण ते जे कमावताय त्यामुळेच मुलांचे सगळे लाड, हट्ट पुरे होतात हे त्यांना समजून घ्यायचं नसत. फक्त आई बाबा वेळ देत नाही किंवा गरज असतानाते सोबत नव्हते म्हणून त्यांचा तिरस्कार करणारेपण अनेक आहेत.

 

पण पालकांनी त्यांचे सुखाचेक्षण सोडून आपल्याच भविष्यासाठी स्वतःचावर्तमान पुसून टाकला हा त्यांचा त्याग मात्रसमजून घेण्यासाठी कोणी तयार नसत.आई आणि बाबा आपल्या आयुष्याच्या गाडीचे २ चाक असतात. त्यातल्या एकाला खूप किंमत आहे आणि दुसऱ्याला नाही असं नसत. आई संस्कार देते तर वडील कर्त्यव्याची जाणीव देतात. आई प्रेमाची ऊब देते तर बाबा जगण्यासाठी लागणार कणखरपणा. आई बाबांची किंमत त्यांनाच माहित ज्यांना त्यांचं छत्र मिळत नाही . आई बाबा आपल्याला आयुष्याला पुरणारे नसतात पण आहे तोवर त्यांचा सन्मान आणि त्यांनी केलेल्या आपल्या सुखासाठीच्या त्यागाची आपण किंमत ठेवावी. त्यांची सेवा करावी. हि जाणीव सगळ्यांना झाली ना तर खर्च या जगात वृद्धाश्रमाच नामोनिशाण च राहणार नाही.

 

ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले आपले कपडे फाटलेले असताना त्यांनी आपल्या मुलांना कधीही कमी केली नाही. त्याच बरोबर आपली चप्पल तुटलेली असताना आपल्या मुलाला दोन दोन तीन जोड नवीन चप्पल घेऊन देणारे आई आणि बाबाच असतात. ते प्रत्येक कष्टातून आपल्या मुलाला सर्व सुख देण्याचा प्रयत्न करत असतात स्वतः मात्र झिजले तरी त्याची ते परवा करत नाही अशा या आई-वडिलांना आपण देखील महत्त्व दिले पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. मेल्यानंतर सरनावर रडत बसण्यापेक्षा आतापासूनच त्यांनी केलेला कष्टाच्या जाणीव आपल्याला असणे खूप महत्त्वाचे आहे.

 

अशाप्रकारे हे एक मोटिवेशनल स्पीच आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *