मित्रांनो, प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला द्यायचे त्याचे फळ मिळत असते. परंतु आई-वडिलांच्या केलेला वाईट कर्माचे फळ मुलांना खरंच भोगावे लागते का? असा प्रश्न प्रत्येकांच्या मनामध्ये निर्माण होत असले. म्हणूनच यावर भगवान विष्णू ने काय सांगितलेले आहे याबद्दलची एक कथा आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.
एकदा माता लक्ष्मी म्हणाली. हे स्वामी, आज मला एक प्रश्न खूप अस्वस्थ करत आहेत, कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन समाधान करा. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील, ते बिनदिक्कतपणे विचार. तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, हे भगवंता, माझा प्रश्न लक्ष्मी म्हणते, हे भगवंता, माझा प्रश्न आहे की, आई-वडिलांच्या चांगले-वाईट कर्माचे परिणाम त्यांच्या पुत्रालाही भोगावे लागतात का?
तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कळेल, की कशा प्रकारे, आई वडिलांच्या कर्माचे फळ आणि त्याचे परिणाम, हे त्यांच्या मुलांना नक्कीच भोगावे लागतात. भगवान विष्णू कथा सुरू करतात आणि म्हणतात, हे देवी, प्राचीन काळी एका गावात श्याम नावाचा शेतकरी राहत होता, तो शेतकरी खूप गरीब होता. ज्याने खूप मेहनत करून कष्टाने घराचा सर्व खर्च भागवत होता, त्याला दिवसभराच्या कामानंतर मजुरी म्हणून, फक्त 30 रुपये मिळायचे. त्यातून तो दररोज 15 रुपये दान करायचा, आणि 15 रुपये घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. आणि काही दिवसानंतर त्यांना दोन जुळी मुले झाली, त्यामुळे आता श्यामच्या कुटुंबात दोन नवरा-बायको आणि दोन जुळी मुले, असे चार सदस्य झाले होते.
दिवसेंदिवस खर्च वाढत असल्याने, हळूहळू श्यामला त्याच्या मुलांच्या देखभालीमध्ये, अडचणी येऊ लागल्या.मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, एके दिवशी शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, तुम्ही रोज 30 रुपये कमावता, त्यातील 15 रुपये दान करता, आणि तुम्ही फक्त 15 रुपयांवर कसे खर्च भागविता. मग आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून, शेतकरी शांत झाला, त्यामुळे शेतकऱ्याला शांत पाहून त्याची पत्नी म्हणाली, नाही बेटा, असे नाही. तुमचे वडील रोज 30 रुपये कमावतात, आणि 15 रुपये दान करतात, ते फक्त तुमच्यासाठी, दुसऱ्यांसाठी नाही, पण दोन्ही मुलांना हे समजले नाही, कारण ते दोघेही लहान होते. मग काही काळ असाच गेला, आणि शेतकऱ्याची दोन्ही मुले हळूहळू मोठी होऊ लागली. श्याम एके दिवशी कामावरून घरी येत असताना, त्याचा अपघात झाला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, जेव्हा श्यामच्या पत्नीला तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी मिळाली, तेव्हा तिला खूप वाईट वाटले.
आणि मग एके दिवशी श्याम च्या दोन मुलांनी त्यांच्या आईला विचारले, आई, आमचे वडील कुठे गेले, तेव्हा ती म्हणाली, बेटा, तुझे वडील आम्हा सर्वांना सोडून भगवान भगवान शंकराकडे गेले आहेत. जेव्हा तुमचे वडील जिवंत होते, तेव्हा ते ते दिवसाला 30 रुपये कमवायचे, त्याच 30 रुपयांमधून 15 रुपयाने आपले पालनपोषण करायचे, आणि उरलेले 15 रुपये दान करायचे. मुले म्हणाली, आता आपले बाबा नाही आहेत, तर आपले पालनपोषण कसे होणार? आपले पोट कसे भरणार? आई आपल्या मुलांना म्हणाली, ज्या घरामध्ये गरिबी असते, तिथे मदतीला कोणी येत नाही. सर्वजण त्यांच्यापासून दूर पळू लागतात, फक्त त्यांच्यासोबत देव असतो. कारण तो गरिबांचा दाता आहे. तेव्हा मुलांनी आईला सांगितले, आई, तू असा विचार करू नकोस, आम्ही दोघे भाऊ भगवान शंकराकडे जाऊ, आणि आपल्या बाबांना घेऊन येऊ.
कारण भगवान शंकर खूप दयाळू आहेत, आमचे दुःख पाहून, त्यांना नक्कीच आमची दया येईल, आणि ते आमच्या वडिलांना नक्कीच पाठवतील. आई मुलांच्या या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाही. एके दिवशी श्यामची बायको तिच्या दोन्ही मुलांना घरी सोडून, कामाच्या शोधात गावात गेलेली असते. आणि दुसरीकडे त्याची दोन मुले म्हणजे दोघे भाऊ आपापसात विचार करू लागतात, की आपण कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे जाऊन, आपल्या वडिलांना परत आणायचे का, असा विचार करून दोघे भाऊही वडिलांना आणण्यासाठी घरातून बाहेर पडतात. दोघे भाऊ खूप वेळ चालत गेल्यावर, त्यांना थकवा जाणवला, आणि एक मोठा वटवृक्ष पाहून, ते त्याच्या सावलीत येऊन उभे राहिले. मग या वटवृक्षाच्या सावलीत थोडा वेळ आराम करावा, असा विचार दोन्ही भावांनी केला, तेव्हा वटवृक्ष मानवी आवाजात म्हणाला. मुलांनो तुम्ही कोण आहात, आणि कुठे चालला आहात. आजपर्यंत तुमच्या सारखे कोमल मुले, माझ्या सावलीत बसली नाही.
तेव्हा त्या दोन मुलांनी सांगितले, की आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत, आणि आम्ही कैलास पर्वतावर भगवान भोले शंकराकडे आमच्या वडिलांना, आणण्यासाठी जात आहोत. तेव्हा त्या वटवृक्षाने त्या मुलांचे बोलणे ऐकले, तेव्हा ते म्हणाले, की “मुलांनो, तुम्ही माझ्यासाठी सुद्धा, भगवान शंकराना एक प्रश्न विचारा. ” आणि तो म्हणाला, मी अनेक वर्षे इथे उभा आहे, पण माझे एकही पान जमिनीवर पडले नाही, आणि माझ्या फांद्याही सुकत नाहीत, मी काय पाप केले आहे? असे काय झाले आहे? की ज्याच्यामुळे मला या योनीतून मुक्ती मिळू शकली नाही, याचे कारण काय आहे? मग त्या दोन्ही मुलांनी म्हटले, की ठीक आहे, तुमचा हा प्रश्न आम्ही भगवान शंकराला नक्कीच विचारू. असे सांगून दोन्ही मुले पुढे जाऊ लागली. आणि वाटेत त्यांना एक अतिशय भयानक मोठा साप दिसला.
त्या सापाला पाहून दोन्ही भाऊ भीतीने थरथर कापू लागले. आणि उभे राहिले. दोघे भाऊ तिथून पळून जाणार होते. तेवढ्यात तो साप मानवी आवाजात बोलू लागला, आणि म्हणाला, मुलांनो, मला घाबरू नका, मी तुम्हाला काही करणार नाही. तुम्ही कोण आहात? आणि कुठे जात आहात? ते सांगा. मग दोन्ही मुलं त्या सापाजवळ गेली, आणि हात जोडून म्हणाली, हे सर्पदेव, आम्ही दोघेही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत,आणि आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत. आम्ही आमच्या वडिलांना आणण्यासाठी, भगवान शंकराकडे जात आहोत. तेव्हा साप म्हणाला, “मुलांनो, माझा सुद्धा एक प्रश्न आहे, तो तुम्ही भगवान शंकराना विचारून या. ” मी बरीच वर्षे इथे पडून आहे, मला आता चालताही येत नाही, माझ्या शरीरात थोडासाही जीव नाही.
मागच्या जन्मी मी असे कोणते पाप केले आहे, ज्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही, याचे कारण काय आहे? तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे, तुमचा हा प्रश्न भगवान भोले शंकराला विचारून आम्ही नक्की येऊ. मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, हे सांगून दोन्ही मुले पुढे चालू लागली, तेव्हा वाटेत त्यांना एक सेठजी भेटले. सेठ म्हणाला, ‘मुलांनो, तुम्ही दोघे कोण आहात? आणि इतक्या कडक उन्हात कुठे जात आहात? आणि तुम्ही दोघे लहान आणि खूप कोमल दिसत आहात. तेव्हा ती मुलं म्हणाली, सेठ जी, आम्ही दोघेही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत. आणि आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत,आम्ही दोघे कैलास पर्वतावर, आमच्या वडिलांना आणण्यासाठी, भगवान शंकराकडे जात आहोत.
“तेव्हा तो सेठ म्हणाला, की माझा एक प्रश्न तुम्ही भगवान शंकरांना विचारा. तेव्हा तो शेठ म्हणतो, मुलांनो इथे येणाऱ्या प्रत्येक जणांची तहान भागवण्यासाठी, मी अनेक वर्षांपासून इथे विहीर खोदत आहे, पण त्यातून अजून पाणी निघाले नाही. मी माझ्या मागील जन्मात असा कोणता गुन्हा केला आहे की, या विहिरीला अजून पाणी लागले नाही. ज्यासाठी मी ही विहिर खोदण्यासाठी, खूप पैसे खर्च केले आहेत? तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे सेठ जी, तुमचा हा प्रश्न भगवान शंकराला विचारून आम्ही नक्कीच तुमच्याकडे परत येऊ.
भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, असे सांगून दोन्ही मुलं तिथून पुढे जाऊ लागली. आणि चालत असताना, त्यांना एक वाहणारी नदी दिसली. मग हळूहळू दोन्ही भाऊ नदीच्या काठी पोहोचले, आणि नदीतून एक मासा बाहेर आला, आणि तो त्यांच्या पायाजवळ आला, आणि म्हणू लागला. अरे मुलांनो, तुम्ही कोण आहात? आणि तुम्ही दोघे बोटीशिवाय का जात आहात? मग मुले म्हणाली, की आमच्याकडे बोटीत बसायला पैसे नाहीत, कारण आमचे वडील रोज 30 रुपये कमवत होते. त्यातून ते रोज 15 रुपये दान करायचे, आणि 15 रुपयां मधून आमचा उदरनिर्वाह करून, कसे तरी आमचे घर सांभाळले जायचे. आता आमचे वडील घरी नाहीत, ते भगवान शंकराकडे गेले आहेत, म्हणून आम्ही दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे, आमच्या वडिलांना आणण्यासाठी जात आहोत. त्या मुलांचे म्हणणे ऐकून मासा म्हणाला, “मुलांनो, माझा एक प्रश्न भगवान शिवाला विचारून या.
कारण “मी अनेक वर्षे या नदीत भटकत आहे, माझ्या सात पिढ्या उलटून गेल्या आहेत, पण मी अजूनही या नदीत राहत आहे. मी माझ्या पूर्वजन्मात असा कोणता अपराध केला होता, ज्याच्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही, याचे कारण काय आहे? तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे, आम्ही तुमचा हा प्रश्न भगवान शिवला नक्कीच विचारू, आणि परत येताना तुम्हाला कळवू. त्यानंतर चालत चालत, दोघे भाऊ नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचले, तेव्हा त्यांना तेथे एक मृत व्यक्ती पडलेल्या अवस्थेत दिसला.
त्या दोन्ही मुलांना पाहून मृत व्यक्ति म्हणू लागला, मुलांनो, तुम्ही कोण आहात, कुठे चालला आहात? तेव्हा त्या मुलांनी त्याचा आवाज ऐकला, आणि सांगितले, की आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत,आणि आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत. आम्ही दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे जात आहोत. त्यांच्याकडून आम्ही आमच्या वडिलांना घेण्यासाठी जात आहोत.मग तो मृत व्यक्तीही म्हणू लागला, तुम्ही भगवान शंकराना माझाही एक प्रश्न विचारा, की माझे शरीर अनेक वर्षांपासून या नदीच्या काठावर आहे. कधी कधी पाण्याची लाट आली, की माझे शरीर नदीच्या आत जाते, पण नदीतून बाहेर पडल्यावर, माझे शरीर पुन्हा किनाऱ्यावर येते. शिवाय, माझे शरीर वितळत नाही, किंवा सडतही नाही, ते इतकी वर्षे हा त्रास भोगत आहे. मी माझ्या पूर्वजन्मात असे कोणते पाप केले होते? की ज्यामुळे मला या देहातून मुक्ती मिळू शकली नाही आणि याचे कारण काय आहे?
तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे, तुमचा हा प्रश्न भगवान शंकराना विचारून आम्ही नक्कीच तुमच्याकडे परत येऊ. मग तिथून चालत चालत दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराजवळ पोहोचले, आणि हात जोडून दोन्ही भावांनी भगवान शंकराना नमस्कार केला, आणि म्हणू लागले. हे भगवान, माझे वडील कुठे आहेत? जेव्हा माझे वडील घरी होते, तेव्हा ते रोज 30 रुपये कमवायचे, आणि त्यातील 15 रुपये दान करायचे, आणि 15 रुपये घेऊन आमचा सांभाळ करायचे. पण आता तो घरी नसताना, आम्ही दोघे भाऊ आणि आमची आई उपाशी मरत आहोत, कृपया त्याला आमच्यासोबत आमच्या घरी पाठवा.मग भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, भगवान शिव, त्या दोन मुलांचे म्हणने ऐकून म्हणाले, ठीक आहे, मी तुमच्या वडिलांना घरी पाठवतो, आधी तुम्ही दोघे भाऊ इथे बसा.
भगवान शंकरांनी त्या दोन मुलांना आपल्या जवळ बसवले, आणि त्यांना खाऊ घातल्यानंतर, त्यांना विचारले, की तुम्हाला आणखी काय हवे आहे.* मग त्या दोन मुलांनी भगवान शंकराना वाटेत जे काही घडले, त्यांना कोण कोण भेटले, आणि ते काय म्हणाले, त्याबद्दल प्रश्न विचारले, तेव्हा भगवान शिव त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत म्हणाले. मुलांनो, जाताना तुम्ही दोघांनी, तुम्हाला जे कोणी भेटले, त्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना सांगा. त्यानंतर भगवान शिव म्हणाले, की तुम्ही दोघेही जण आता तुमच्या घरी जा, तुमची आई तुमची वाट पाहत आहे, तुमचे वडील तुमच्या घरी पोहोचतील.
मग दोन्ही भाऊ भगवान शंकरांना नमस्कार करून, परत आपल्या घरी निघाले, वाटेत नदीच्या काठी पडलेला, तोच मृत व्यक्ती त्यांना दिसला. त्या दोन मुलांना पाहून मेलेला माणूस म्हणाला, मुलांनो, माझा प्रश्न तुम्ही भगवान शंकरांना विचारला का? तेव्हा मुलांनी सांगितले, की हो, भगवान शिव म्हणाले, की तुम्ही पूर्वी मोठे विद्वान होता, पण तुमचे ज्ञान तुम्ही कुणालाही सांगितले नाही. आता जेव्हा तुमचा मृत्यू झालेला आहे, तेव्हा तुमच्याकडे असलेले ज्ञान, आतल्या आतच तुमच्यामध्ये घुसमटत आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे ज्ञान कोणाला सांगत नाही, तोपर्यंत तुमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तेव्हा मेलेला माणूस म्हणाला, मुलांनो, आता अशा परिस्थितीत माझ्याकडे ज्ञान घेण्यासाठी कोण येईल, तुम्हीच माझ्याकडे असलेले ज्ञान घ्या. त्यानंतर मृत व्यक्तीने आपल्याजवळ असलेले, सर्व ज्ञान दोन्ही भावांना दिले. आणि ज्ञान दिल्यानंतर त्यांच्या आत्म्याला त्वरित मोक्ष प्राप्त झाला.
मग दोघे भाऊ तिथून पुढे निघाले, आणि चालत असताना त्यांना तिथे एक मासा दिसला, तेव्हा मासा म्हणाला, मुलांनो, तुम्ही भगवान शंकराला माझा प्रश्न विचारला होता का? तेव्हा ती दोन मुले म्हणाली की हो, भगवान शंकर म्हणाले, की तुमच्या आत अमृत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हे अमृत कोणालाही देत नाही, तोपर्यंत तुम्ही असेच व्यथित राहाल. तेव्हा मासा म्हणाला, मुलांनो, आता माझे अमृत कोणाला मिळेल? तुम्ही दोघेच माझ्यात असलेले अमृत घ्या. मग माशांनी त्याचे अमृत त्या दोन मुलांना दिले, आणि त्या माशाचा आत्मा, अमृत देताच त्यांना मोक्ष प्राप्त झाला.
अशा पद्धतीने दोन्ही भाऊ तिथून पुढे निघाले. तर वाटेत त्यांना सेठ दिसले, जे तेथे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी, विहीर खोदत होते. ते सेठ दोन्ही पोरांना पाहताच म्हणाला, बेटा, तुम्ही दोघांनी भगवान शंकरांना माझा एक प्रश्न विचारला होता का? तेव्हा मुले म्हणाली, की हो, भगवान शिव म्हणाले, की तुझ्या घरी दोन कुमारी मुली आहेत,जोपर्यंत तू त्या दोन मुलींचे लग्न करून, त्यांचे कन्यादान करत नाहीस, तोपर्यंत तुम्ही खोदलेल्या या विहिरीत पाणी येणार नाही, जे तुझे कर्तव्य आहे, ते आधी कर. आधी तुमच्या मुलींची लग्न करा, आणि कन्यादान करा, आणि मग ही विहीर खोदून घ्या.
मग तो सेठ त्या मुलांना म्हणाला, मी आता माझ्या मुलींसाठी लगेच मुलगा शोधण्यासाठी कुठे जाऊ, तुम्ही दोघेच मला माझ्या मुलींसाठी योग्य दिसत आहात. तुम्ही दोघेही खूप साधे स्वभावाचे आणि सुंदर आहात. आणि तुम्ही दोघेही सारखे दिसता, आणि आता तुम्ही दोघेही तरुण झाला आहात, आणि विवाहास पात्र सुद्धा आहात, म्हणून हे पुत्रांनो, तुम्ही दोघेही माझ्या दोन्ही मुलींसोबत लग्न करा. मग त्या सेठने आपल्या दोन मुलींचे लग्न त्या दोन मुलांशी लावून दिले, आणि आपल्या दोन्ही मुलींना भरपूर पैसे देऊन, त्यांची पाठवणी केली.
मग दोन्ही भाऊ पुढे निघाले, आणि वाटेत त्यांना तोच साप भेटला, त्या दोघांना पाहून साप म्हणाला, “मुलांनो, तुम्ही भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला होता का?” मुले म्हणाली, हो, भगवान शंकर म्हणाले की, जोपर्यंत तुझ्याकडे असलेले सर्परत्न, पृथ्वीवर जोपर्यंत तुम्ही तो रत्न दान करत नाही, तोपर्यंत तुमचे शरीर असेच राहील. तेव्हा साप म्हणाला, मुलांनो, हे सर्परत्न आता मी कोणाला देऊ? मुलांनो हे सर्प रत्न तुम्हीच तुमच्याकडे ठेवा अशा प्रकारे ते रत्न दोघांना देताच, सर्पाच्या आत्म्याला, म्हणजेच त्या सापाला मोक्ष प्राप्त झाला,
अशा प्रकारे दोन्ही भाऊ आपापल्या पत्नीसह पुढे जाऊ लागले. आणि वाटेत तेच प्रचंड वटवृक्ष दिसले. ज्या खाली ते दोन्ही भाऊ, आराम करण्यासाठी सावलीत बसले होते. मुलांना पाहताच वटवृक्ष म्हणाले, मुलांनो, तुम्ही माझा प्रश्न भगवान शंकराला विचारला होता का? तेव्हा दोघांनीही हो म्हटले, त्यावर भगवान शिव म्हणाले, की तुमच्या मागच्या जन्मी तुमचे काम गुरुकुलात मुलांना शिकवायचे होते, पण त्या बदल्यात तुम्ही त्या लहान मुलांकडून काम करून घेतले, आणि त्यांना चांगले शिक्षण देखील दिले नाही.
त्या मुलांच्या शापामुळे तुम्हाला मोक्ष मिळाला नाही, म्हणून तुमच्यात भरलेले ज्ञान कोणाला तरी द्या, त्यानंतरच तुम्हाला पुन्हा मोक्ष मिळेल.तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, दोन्ही मुलांचा संवाद ऐकून, झाड म्हणाले, “हे ज्ञान मी कोणाला देऊ, तुम्हीच का माझे ज्ञान घेत नाहीत. “तेव्हा वटवृक्षाने आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान, दोन्ही भावांना दिले. त्यामुळे त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळाली. आणि तो त्या झाडाच्या बंधनातून मुक्त झाला.
मग दोन्ही भाऊ त्यांच्या पत्नीसह, चालत चालत त्यांच्या घरी पोहोचले. जेव्हा दोन्ही भाऊ त्यांच्या घरी पोहोचले, त्यांना पाहून त्यांची आई, खूप खुश झाली, आणि म्हणू लागली. तुम्ही दोघे कुठे गेला होतात, आणि तुमच्या सोबत या दोन मुली कोण आहेत? तेव्हा दोन्ही भावांनी, त्यांच्या आईला त्यांच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली. तेव्हा भगवान विष्णू, माता लक्ष्मीला म्हणाले, हे देवी, आता दोन्ही मुलांना समजले होते, की आपले वडील परत येऊ शकत नाहीत. त्यांना मोक्ष मिळाला आहे. आपल्या वडिलांनी केलेल्या दानाचे फळ, भगवान शंकरांनी आम्हा दोन्ही भावांना दिले आहे.
अशा प्रकारे भगवान विष्णूंनी, माता लक्ष्मीला संपूर्ण कथा सांगितली