मित्रांनो, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात जितके आई महत्वाचा असते, तितकाच बापही महत्वाचा असतो. प्रत्येक मुलीला आपला बापाची ओड असतेच. बाबा कसाही वागला तरी मुलीच्या मनामध्ये बाप्पा प्रतीचे प्रेम हे कायम जागृत असते. अशीच काही एक कथा रूपालीताई सवणे यांनी एका कीर्तनातून सांगितलेली आहे. याची माहिती आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत .
रूपालीताई सवणे या म्हणतात, एकदा त्या एका लग्नासाठी गेले होते. लग्नातील नवरी मुलगी लग्नामध्ये तिचे लक्ष दुसरीकडे होते. ती सतत मागे वळून पाहत होती. रूपालीताई यांनी एका बाईला विचारले की, ही मुलगी सतत मागे वळून का पाहत आहे. तिच्या मनाविरुद्ध लग्न होत आहे का? त्यावर ती बाई म्हणाली, नाही हो लग्न हे तिच्या मनाप्रमाणेच होत आहे. परंतु ती तिच्या बापाला पाहत आहे. हा बाबा तिचा.
ही त्याची पाचवी मुलगी आहे. पाचवी मुलगी असल्याने त्याला ती नको होती आणि त्याने गर्भातच तिला मारण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ही काय मेली नाही. जन्माला आल्यापासून ते आत्तापर्यंत या मुलीचे तो दोन शब्दही बोलला नाही. त्यामुळे ती मुलगी बापाची आस लावून बघत आहे की बाप आता तरी आपला जवळ येईल. मुलगी संपूर्ण लक्ष तिचे तिच्या बापाकडेच होते. ती सतत मागे वळून आपल्या बापाकडे बघत होती.
कन्यादान झाले, लग्न सोहळा पार पडला मुलगी जाण्याची वेळ आली. मुलगी सगळ्यांच्या गळ्यात पडून रडत होती. बाप मात्र एका कोपऱ्यात राहून तिच्याकडे डोळे वाटा करून पाहत होता. आईला म्हणू लागली, आई बाबा मला मिळाले नाही ग! त्यावर रूपाली ताईंच्या मनात आली की आपण जाऊन त्या बापाशी बोलावे, त्यावर बापाशी बोलायला गेला की, दादा जावा आता तरी त्या मुलीला भेटा. ती मुलगी आस लावून बसलेली आहे.
त्यावर तो बाप म्हणाला, ताई ही मुलगी माझी पाचवी मुलगी आहे. मी तिला गर्भातच मारण्याचा प्रयत्न भरपूर प्रमाणात केला होता. परंतु हे काही मेले नाही. जन्माला आली आईच्या अंगावरचे दूध कधी बाजू दिली नाही. असं वाटत होतं की ही मरेल. परंतु ही कार्टी काही लिहिली नाही. जन्माला येऊन महिना झाला बायकोला घेऊन शेतामध्ये कामाला घेऊन जाऊ लागलो. हिच्या अंगावर एक कपडा सुद्धा टाकू दिल्या नाही. असं वाटत होते की कुठला तरी किडा येऊन चालेल आणि ही कार्टी मरेल. परंतु त्यातूनही देखील ही कार्टी जगली.
बाकी पोरीं पेक्षा सगळ्यात हुशार निघाली. ही कार्टी कधीही नवा कपडा घेतला नाही. जुने झालेले कपडे बाकीच्या पोरींची ही पोर घालत होती. तिला कधी मायेने जवळ घेतले नाही का कधी मांडीवर बसून घेतले नाही. शाळेमध्ये अगदी हुशार. एकदा शाळेतून निरोपाला मुलीच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. परंतु मला काही कौतुक नसल्यामुळे मी कधीच केलं नाही. की कौतुकाची थाप या पोरीच्या अंगावर कधी पाडली नाही. तरी देखील ती पोर माझीच आस लावून आजपर्यंत उभी आहे. यावर मी कसा जाऊ. असं बोलून तो बाप रडू लागला.
त्यावर रूपालीताई म्हणाल्या, ती पोर आताही आस लावून बसलेले आहेत मी विनंती करते की कृपा करून तुम्ही जावा. पोरगी गाडीमध्ये बसली होती. गाडीची काच काय ती वरती येऊ देईल नव्हती. कारण तिला अजूनही आस होती की आपला बाप आपला जवळ येईल. गाडीचे स्टेरिंग गाडी मारणारा ड्रायव्हरला थोडेसे नेऊ देत नाही. कारण तिला अजूनही आस होती की आपला बाबा आपल्याजवळ येईल. ड्रायव्हर गाडीमध्ये बसला त्याने गेअर टाकला, गाडीचा काचा झाकत होत्या तिथून तो बाप अचानकपणे पळत पळत येऊ लागला.
ज्या प्रकारे एखाद्या गाईला दिवसभर बाहेर चरायला नेले असेल आणि परत गोटामध्ये आणल्यानंतर ज्याप्रमाणे ती आपल्या पिल्लाला शोधत पळत सुटते त्याप्रमाणे त्या बापाची हालत झाली होती. बापाने त्या पोरगीला हाक मारली पोरगी लगेच गाडीतून बाहेर दरवाजा उघडून आली आणि बापाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. पोरगीच नाही तर बाप देखील ढसाढसा रडत होता. बापच नाही तर सर्व समाज लग्नात आलेली एक आणि एक व्यक्ती या बापलेकीचे दृश्य पाहून रडत होती.
अशाप्रकारे त्यांनी एक प्रसंग सांगितलेला आहे की जो मुलीच्या आयुष्यामध्ये असणारा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक मुलीला ज्याप्रमाणे आईचे आस असते त्याचप्रमाणे बापाचे आज देखील असते.