मित्रांनो,जे आई वडील आपल्याला जीवापाड जपतात, रक्ताचं पाणी करून सांभाळतात त्यासाठी आपण काय करतो? आणि जरी केलं असेल तरी आपण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे उपकार करत नाहीत. त्यांनी आपल्याला जन्म देऊन आपल्यावर उपकार केले आहेत. आई वडील मुलांना लहानसे मोठे करतात त्यांना सांभाळून कष्टाचे पाणी करून त्यांना वाढवत असतात व मोठे करत असतात परंतु काही मुलांना त्यांची जाणीव नसते. अशीच एक कथा आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
आप्पा बाजल्यावर बसले होते. बाजूच्या बंगलातच त्यांचा मुलगा राहत होता. परंतु त्या बंगलामध्ये त्यांना जागा नव्हती. म्हणून त्यांना जवळच्याच घरात ठेवलं. आप्पांना काही हालचाल झाल्यासारखे वाटते, ‘रघु वाचव मला! इथं काहीतरी आहे’. रघु तिथं आला पण तो फक्त बघत उभा होता. जणू काही मज्जाच बघत होता. रघु ने आवाज देऊन बायकोला बोलून घेतला. दोघे नुसता मजा बघत होते. अप्पा बोलू लागले रघु येथे साप आहे का? मला व्यवस्थित दिसत नाही रे! बघ काय आहे.’ दोघं नवरा-बायको हसू लागली. त्या दोघांना काहीच फरक पडला नव्हता.
माधवी म्हणाली, साप बनून आई आप्पा तुम्हाला घेऊन जायला आले असतील!’ हे बोलणे ऐकून रघु आणि माधवी खूप हसू लागली. पण आप्पांना मात्र त्याचे खूप दुःख झाले होते. त्यांना डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नव्हत. पण कित्येक वर्ष शेती केली होती त्यांनी त्यामुळे बऱ्याच प्राण्यांचे आवाज हालचाल त्यांना लगेच कळत होत. आप्पांना मोतीबिंदू झाला होता. त्यांचा ऑपरेशन करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी. पण फुकट खर्च नको म्हणून दोन्ही मुलांनी अंग काढून घेतलं होतं. तो खर्च करेल मी का खर्च करू यात ऑपरेशन राहून गेलो होत.
ते पायांच्या मोजमापावर सगळीकडे डोळसपणे फिरत होते. पण घर सोडून साधे दुसरीकडे जरी केलं तर त्यांना चालणे कठीण होत अस. माठ किती पावलावर आहे, मुलाचं घर किती पावलावर आहे, बाथरूम किती पावलावर आहे हे आपण पाट होतं. म्हणून दुःखाने भरलेले जीवन थोडं सोपं वाटत होतं. त्यांना जुन्या आठवणी खूप सुखकर वाटत अस. त्या जुन्या आठवणीत खूप रमून जायचे. मंजुळाताई होत्या तेव्हा घर एखाद्या महला सारखा वाटायचं. शेती होती पण राहत्या घरापासून खूप लाब होती. त्यामुळे गावात सरपनाचा अड्डा ते चालवत होते.
आप्पा दिवस रात्र लाकड तोडत होते, फक्त मेहनत त्यांच्या नशीब होती. सगळ्या पैशाचा व्यवहार मंजुळा ताई बघत होत्या. अप्पा फक्त दिवस रात्र कष्ट करत होते. शेती एक एक पैसा जमवून घेतली होती. दोन मुलं, दोन मुली असा परिवार. मोठा मुलगा होतकरू होता. मात्र लहान आएत खाऊ होता. मोठा मुलगा शिकला. नोकरीला लागला. त्याचं लग्न झालं. तो बायकोला घेऊन नोकरीच्या ठिकाणी निघून गेला. जाताना आपल्याला आईला सोबत घेऊन गेला नाही. कारण त्यांच्या माघारी शेती आणि कल्पना चा अड्डा कोण पाहणार. दोन्ही मुलींची लग्न करून दिली होती. त्या दोघी त्यांच्या घरी सुखी होते.
छोटा मुलगा उडान टप्पू होता. म्हणून त्याचे लग्न एका नात्यातल्या मुलगी बरोबर करून दिलं होतं. जवळची मुलगी आहे आपल्याला सांभाळून घेईल असा त्यांचा समज होता. पण घरात शिरतात त्या मुलीने तिचे रंग दाखवले. लग्न अगोदर प्रेमाने बोलणारी वागणारी मुलगी इतकी निष्ठुर असेल असे त्यांना वाटले नव्हते. आई आप्पांचे आता वय झाले होते म्हणून त्यांना काम झेपत नव्हते. माधवीने एक शेतीचा तुकडा विकून शेतात बंगला बांधला होता. बंगला बांधल्यावर रघु आणि माधवी ते घर सोडून शेतातल्या बंगल्यामध्ये राहायला गेले.
नाईलाजाने आप्पांना आणि आईला भावाचं घर सोडून शेतात राहायला जावे लागले. तिथे गेल्यावर रघु आणि माधवीने त्यांना कुडाच्या घरात ठेवलं. कुडाचं घर असल्यामुळे पावसाळा ते चौपून गळायचं. झोपण्यासाठी काय बसण्यासाठी सुद्धा जागा नसायचे. त्यातच ते एक चूल मांडून चुलीवर दोन भाकर करून पाण्यासोबत भाकरी खायची. पण कधी मुलगा म्हणाला नाही की आई आप्पा तुम्ही आमच्याबरोबर बसून जेवण करा. रघु माधवी रोज नवीन नवीन पदार्थ बनवून खायची. पण आई-वडिलांना खूप कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन दोन सोन्याचे गंठण बनवले होते. ते त्या कोणालाच देत नव्हता. माधवीने त्यांच्याकडून ते कितीदा भांडण काढून घेण्याचा प्रयत्न केला. इतके दिवशी तर रोखूने त्याच्या वडिलांचा कॉलर पकडून भांडण काढले.
पण तरी देखील त्यांनी ते गंठण कोणालाही दिले नाही. त्या दोघा म्हातारा म्हातारीचे आयुष्य त्या झोपडीतच चालत होते. कसेबसे ते आपला निवारा करत होते. पावसाचा पाण्यात भिजून एक दिवशी आई खूप आजारी पडली आणि ताप तिच्या अंगामध्ये मुरल्याने तिला खूप खूप आजारी पडली. पण तरी देखील तिचा मुलगा तिच्याकडे अजिबात लक्ष दिला नाही. अंगात ताप मुरल्याने ती अंथरुणाला पडली होती. ज्यावेळी ती शेवटची क्षणाच्या श्वास घेतो ते त्यावेळी तिचा मोठा मुलगा आला. त्यावेळी त्या आईने दोन केलेले गंठण तिच्या मोठ्या सुनेला दिली व तिला सांगितले की, ही दोन्ही गंठण माझ्या दोन्ही मुलींना द्या तुमच्यासाठी करोडो रुपयांची शेती आहेच.
एवढे बोलून तिने आपल्या प्राण सोडले. पण त्या सुनेने देखील ते गंठण कोणालाही दिली नाही व स्वतःच घातले. इकडे आईचा जीव गेलेला दुःख कोणत्याही मुलाला नव्हते. ते घरामध्ये शोधा शोध करत होते की अजून कोणत्या खजिना त्यांना सापडतो आहे का. त्यांना एक पेटी दिसली त्या पेटीला कुलूप घातले होते. इकडे आईचे मृतदेह घरात असून ही दोघे शोधाशोध करत आहेत. हे पाहून आप्पांना खूप वाईट वाटले. यावर त्यांनी त्या दोघा मुलांना म्हटले की, हे घ्या चावी आधी त्या आईचे अंत्यविधीत पूर्ण करा आणि तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते घ्या.
पण यावर त्या मुलांनी अजिबात ऐकले नाही आधी ती पेटी तोडली व त्यातून दोन पासबुक त्यांना मिळाली ज्यामध्ये एका पासबुक मध्ये पाच लाख रुपये तर दुसऱ्या पासबुक चा अकाउंट मध्ये सात लाख रुपये होते. यावरही ते दोघे भांडू लागले मला पाच रुपये लाख रुपये तुला सात लाख रुपये हे पाहून त्या आप्पांना खूप वाईट वाटले.
आई वडील जे काही कष्ट करत असतात ते आपल्या मुलाबाळांसाठीच असतात. हे त्या मुलांना अजिबात कळत नाही. त्यांना त्यांच्या आई-बाबांची किंमत नसते. फक्त ते पैशासाठी जगत असतात. पण हे जे जगताना बघण्याचे भाग्य मिळाले आहे ते त्या आई-वडिलांना पासून आलेले आहे हे त्यांना कळत नाही.
अशाप्रकारे ही एक सुंदर कथा आहे.