मित्रांनो, पतीपत्नीच्या नात्यात छोटीमोठी भांडणे ही अनेकदा होत असतात. आपला पती आपले ऐकत नाही, नेहमी स्वतःच्या मनाप्रमाणेच वागतो अशी प्रत्येक पत्नीची तक्रार असते. तर यामुळे आपला पती आपल्या मुठीत रहावा अशी प्रत्येक पत्नीची इच्छा असते. तुमची पण जर असीच इच्छा असेल तर तुम्ही अगदी योग्य लेख वाचत आहात. आज आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा पती कायम तुमच्या मुठीत राहील…
1. तुमच्या पतीला तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वप्रथम त्याचे मन जिंकुन घ्या. जेव्हा तुम्ही आधी त्याचे सगळे ऐकाल तेव्हाच तो तुमचे ऐकेल. तुम्हाला जर त्याची गोष्ट मान्य कराययची नसेल तर कमीत कमी त्याचे संपुर्ण बोलणे ऐकुन घ्या. त्याच्यावर नाराज होऊ नका. या उलट शांतपणे, प्रेमाने, आणि अर्थपुर्ण पद्धतीने त्याच्याशी बोला आणि त्यांना सांगा कि तुम्हाला त्यांचे बोलणे मान्य नाही.
2. बायकांना त्यांच्या नवऱ्यांना टोमणे मारायची खुप वाईट सवय असते. त्यामुळे घरात बरीच भांडणे होतात. काहीवेळा एखादा टोमणा पतीच्या मनाला असा काही लागतो की तो त्याच्या पत्नीचा राग राग करण्यास सुरुवात करतो. यामुळे पत्नी पतीच्या नजरेतुन उतरते. त्यानंतर पती त्याच्या पत्नीची कोणतीच गोष्ट ऐकत नाही. त्यामुळे पत्नीला जर त्यांच्या पतीला त्यांच्या नियंत्रणाच ठेवायचे टोमणे नाही तर प्रेमाने बोला.
3. कामाच्या किंवा ऑफिसच्या गोष्टींमध्ये इंटरफेअर केलेले पतींना आवडत नाही. त्यामुळे त्याच्या कामासंबंधी कोणतीही लुडबुड करु नका. किंवा पती काम करत असताना त्यांना डीस्टर्ब करु नका. फक्त जेव्हा पती थकुन भागुन घरी येईल तेव्हा त्याला दिवस कसा गेला, तो कसा आहे एवढच विचारा.
4. काही पत्नींना जुन्या गोष्टी उखरुन काढायची सवय असते. एखादी जुनी गोष्ट त्या कित्येक वर्ष उगाळत बसतात. त्यामुळे एखादी गोष्ट होऊन गेल्यावर ती पुन्हा बोलुन दाखवु नका. जुन्या गोष्टी विसरुन नवी सुरुवात करा. भविष्याची प्लानिंग करा. यामुळे तुमचा पती तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला साथ देईल.
5. काहीवेळा चुकीच्या गैरसमजामुळेसुद्धा पती-पत्नीचे नाते बिघडते. त्यामुळे कधीही कोणत्याही कारणांवरुन वाद झालेच तर थेट एकमेकांशी संवाद साधा. ज्या गोष्टीवरुन वाद झाले आहेत ते शांतीने आणि समजुतदारीने सोडवा. इथुन तिथुन ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवु नका. एकमेकांवर विश्वास ठेवा.
6. लग्नानंतर अनेकदा रोमान्स संपतो. त्यामुळे पतीला आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी घरात रोमॅण्टीक वातावरण तयार करा. किंवा बाहेर जेवायला किंवा फिरायला जा. तुम्ही तुमच्या लुकमध्ये सुद्धा बदल करु शकता. थोडे मॉर्डन आणि स्टायलिश बनुन तुमच्या पतीच्या मनात स्थान निर्माण करु शकता. यामुळे तो तुमच्या सर्व गोष्टी ऐकेल.
अशाप्रकारे आपल्या नवऱ्याला जर मुठीत ठेवायच असेल तर या काही टिप्स तुम्ही वापरून तुमच्या नवऱ्याला मिठीत ठेवू शकता.