आपल्या जीवनात शुभ घटना घडण्यापूर्वी दिसू लागतील हे संकेत…!!

Uncategorized

मित्रांनो, काळ आपल्याला येणाऱ्या उद्याचे संकेत आधीच देत असतो. आपल्या आयुष्यात आनंद येणार आहे की वाईट दिवस सुरू होणार आहेत, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आयुष्यात अशा अनेक घटना घडतात, ज्या आपल्याला चांगल्या-वाईट दिवसांचे संकेत देतात. परंतु, आपण ते संकेत वेळीच ओळखत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो.

 

धर्मग्रंथात सांगितले गेले आहे की काळ आपल्याला येणाऱ्या उद्याचे संकेत आधीच देत असतो. आपल्या आयुष्यात आनंद येणार आहे की वाईट दिवस सुरू होणार आहेत, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. हे शुभ संकेत जाणून घेण्यापूर्वी त्यामागील पौराणिक कथा जाणून घेणे आवश्यक आहे. पौराणिक कथा काय – शास्त्रानुसार एकदा नारदमुनी भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेले. नारदजी म्हणाले, हे भगवान! स्वतःच्या आयुष्यात चांगली वेळ येणार आहे, हे माणसाला कसे कळणार? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद! जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी चांगली वेळ येते, तेव्हा मी काही शुभ संकेत दर्शवतो, काहींना ते समजतात आणि काहींना हे संकेत ओळखता येत नाहीत. जाणून घेऊया ते संकेत कसे ओळखावे, जे आपल्या चांगल्या काळाचे सूचक आहेत.

 

चांगल्या वेळेचे शुभ संकेत. घराबाहेर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची गाय आली तर तो खूप शुभ संकेत मानला जातो. आपण गाईला रोटी खायला दिली पाहिजे, त्यातून आपल्याला पुण्य मिळते. घरातून बाहेर पडताना वाटेत कुठे हिरव्या भाज्या, हिरवे गवत दिसले तर तुमचे रखडलेले काम पूर्ण होण्याचे ते संकेत मानू शकता. जर घरामध्ये पक्षी येऊन किलबिलाट करत असतील आणि घरात घरटं करून राहू लागले असतील तर त्याचा अर्थ काही शुभवार्ता मिळण्याचे ते संकेत आहेत.

 

घराबाहेर पडताना जर एखाद्या पुरुष किंवा स्त्रीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते देखील आपल्यासाठी शुभ मानले जाते.कधीकधी आपल्या तळहातावर खाज सुटते, तसे होत असेल तर येणाऱ्या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. झोपेत असताना स्वप्नात माता लक्ष्मीजीचे दर्शन झाले तर समजून घ्या की तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. अचानक मंदिरात पूजा किंवा आरती ऐकू आली तरी ते शुभ लक्षण आहे. त्याचप्रमाणे घरात पांढरे कबुतर दिसणे हे देखील येणाऱ्या चांगल्या काळाचे शुभ संकेत आहे.

 

सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजेच श्रीफळाचं दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे ते संकेत असतात. कारण नारळाला हिंदुस्थानच्या सामाजिक परंपरेत शुभ मानलं जातं. प्रवास करतानाही काही शुभ संकेत असतात. पण ते आपल्या लक्षात येत नाहीत. कधी प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो.

 

सोनेरी साप दिसणंही चांगलं असतं म्हणे. रात्री झोपतांना जर पांढरा किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला तर तो एक शुभ संकेत असल्याचं मानायला काहीच हरकत नाही. काहीजणांना याचा चांगला अनुभव आलाय. हिरवा निसर्ग डोळे भरून पाहायला कुणालाही आवडेल. पण हाच निसर्ग जर स्वप्नात दिसला, म्हणजे स्वप्नात एखादे नैसर्गिक चित्र दिसले तरीही तेशुभ मानलं जातं. त्यातूनही हा हिरवेगारपणा जर पाण्याच्या ठिकाणीदिसला तर ते त्याहूनही शुभ मानलं गेलं आहे.

 

अशाप्रकारे हे काही संकेत आहेत जे आपल्याला शुभ घटना घडण्या अगोदर मिळत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *