मित्रांनो आपल्या प्रत्येकाचे बेली बटन म्हणजेच बेंबी ही आपल्या शरीराचा केंद्रबिंदू असते. जेव्हा आपण आईच्या पोटामध्ये वाढत असतो तेव्हा आपल्याला आईच्या पोटातून आपल्यला बेंबीतूनच अन्नपुरवठा मिळत असतो. असे म्हटले जाते की बेंबीचा संबंध संपूर्ण शरीराच्या सर्व नाड्यांना कार्यक्षम ठेवत असतो व बेंबी पासूनच सर्व नाड्यांची सुरुवात होते असेही मानले जाते आणि भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून बेंबीमध्ये तेल टाकण्याची व त्याद्वारे विविध आजारांवर उपचार करण्याची आयुर्वेदीक पद्धत रुढ आहे. जुन्या काळापासून काही आजार झाल्यावर बेंबीमध्ये तेल टाकले जायचे. हे तेलही विविध प्रकारचे असतात.
आणि मित्रांनो वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या प्रकारचे तेल जर बेंबीमध्ये टाकले तर त्या आजाराचा मुळापासून खातमा केला जातो असे यामागचे शास्त्र आहे आणि खोबरेल तेल, मोहरी तेल, बदाम तेल, जैतुन तेल, एरंड तेल, नीम तेल, आल्या पासून बनवलेले तेल अशा विविध प्रकारच्या तेलांचा वापर हा प्राचीन काळापासून भारतामध्ये आजारांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे. आयुर्वेददेखील या कारणांची पुष्टी देते की हे आजारांवर वापरलेली तेलं आजारांचा मुळापासून नायनाट करते.
आईच्या गर्भामध्ये जे बाळ वाढत असते, सुरवातीच्या काळात बाळाचे हृद्य, मेंदू हे विकसित झालेले नसते. ह्या बाळाला संपूर्ण पोषण हे जी नाळ जोडलेली असते त्याद्वारे मिळत असते. नाभीचीकस्तीचे खूप मोठे महत्व आहे. जर तुम्ही ध्यान किंवा मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला माहिती असेल कि आज्ञाचक्रानंतर नाभीध्यान केले जाते आणि मित्रांनो आजकाल मेडिकल सायन्स ने देखील मान्य केले आहे कि आपल्या शरीरात ज्या ७२ कोटी नसा असतात त्या सर्व नसा आपल्या नाभीशी जोडलेल्या असतात. आणि म्हणून मित्रांनो आपण आपल्या आजच्या लेखात पाहणार आहोत नाभीत तेल टाकण्याचे आश्चर्यचकित फायदे.
चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात की नाभीत तेल टाकल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात, कोणकोणते रोग मुलांपासून नष्ट होतात हे आपण पाहणार आहोत.
मित्रांनो कोणते तेल वापरायचे कोणते फायदे होतात, कोणते रोग मुळापासून नष्ट होतात, तेल किती प्रमाणात घ्याचे कधी घ्याचे हे सर्व आपण आपल्या आजच्या लेखात पाहुयात. मित्रांनो फायदे पहिले तर त्यात पहिला म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावर ग्लो नसतो ते लोक तरुण दिसतील त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो येईल. तुमच्या डोळ्यांखाली जर डार्क सर्कल असतील तर हि निघून जातात. जर तुमच्या डोळ्यांची दृष्टी कमी असेल तर तीही चांगली बनते. काहींच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट्स असतात तेदेखील ह्यामुळे कमी होते आणि मित्रांनो आपण पाहुयात कि कोणते कोणते तेल आपल्याला घ्याचे आहे. तीन प्रकारचे तेल आपण घेणार आहोत त्यातील पाहिले आहे मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचे तेल, खोबरेल तेल व बदाम तेल हे तीन तेल आपण घ्याचे आहे.
आपण रात्री पाठीवर झोपा आणि तिन्ही तेलाचा एक एक थेंब आपण आपल्या नाभीत टाकायचा आहे. आणि अर्धा तास आपण तस्याच अवस्थेत झोपून राहणार आहोत आणि मित्रांनो हा उपाय आपण एक दिवसाड करायचा आहे. मित्रांनो ह्याचे जे फायदे आहेत हे खूप आश्चर्यजनक आहेत. आपले आयुष्य वाढते आपल्या चेह्राय्वर ग्लो वाढतो. एका आठवड्यातच तुम्हाला फरक दिसेल आणि मित्रांनो यामुळे आपले वजन नियंत्रित राहते अश्या प्रकारे खूप फायदे ह्यामुळे होतात.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.