सतत पॉझिटिव्ह विचार कसे करायचे ? फक्त हे छोटे बदल करा…!!

Uncategorized

मित्रांनो, सकारात्मक विचार करणे आणि ते आचरणात आणणे ही आपल्या आयुष्याची मोठी संपत्ती आहे. एक यशस्वी व्यक्तीने त्याच्या यशापर्यंत पोहचण्यासाठी नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. कारण, जेव्हा तुम्ही सकारात्मक असता तेव्हाच तुम्ही यशाला गवसणी घालू शकता. स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनीच सकारात्मक रहायला हवं, सकारत्मक विचार करायला हवेत. सकारत्मक विचार हे फक्त तुमच्या करिअरसाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी अतिशय गरजेचे आहेत.

 

जे लोक नकारात्मक विचार करतात त्यांच्या आसपास नेहमी नकारत्मक वातावरण असते. याचा परिणाम त्यांच्यासमवेत इतरांवर ही होत असतो. नकारात्मक विचार तुम्हाला मानसिक रित्या नुकसान पोहचवण्याचे काम करतात. तुमचे विचार सकारात्मक व्हावेत यासाठी आजच्या लेखामध्ये आपण पाच नियम जाणून घेणार आहोत की त्या नियमांचे पालन करून आपण आपले विचार सकारात्मक ठेवू शकतो.

 

पहिला नियम म्हणजे आपला दिवस पॉझिटिव्ह स्वसंवादाने सुरु करा. म्हणजेच आपल्याला करायचे असे आहे की सकाळी उठल्या उठल्या आपण सकारात्मक गोष्टी स्वतःला बोलायच्या आहेत. जसे की

दिवसेनदिवस माझी शरीर प्रकृती आरोग्यदायी होत चालली आहे. मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे.आजचा दिवस माझा आनंदात जाणार आहे. हा निसर्ग किवा परमेश्वर किवा ब्रह्मांड मला मदत करत आहे.

 

अशा प्रकारचे बोलणे स्वतःला बोलायचं आहे. कारण आपण जे काही बोलत असतो त्याचा खूप मोठा परिणाम आपला वर होत असतो. जर आपण सकारात्मक विचार केला तर आपल्या सोबत सकारात्मक गोष्टी घडतात. म्हणून कायम सकारात्मक तेने सुरू करावे व सकाळच्या वेळेस आपल मेंदू हा खूप उत्तेजन असतो. म्हणून सकाळ सकाळी त्या गोष्टी बोलाव्यात. हा उपाय सलग एक महिना करा. नक्कीच तुमच्यामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसून येईल.

 

दुसरा नियम म्हणजे आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींची यादी करा. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सोबत अशा काही गोष्टी घडत असतात की ज्यामुळे आपल्याला खूप आनंद झालेला असतो. अशा काही चांगला गोष्टी ज्या आहेत त्या आठऊन त्यांची यादी करा. यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश आपण करायचा आहे. तुम्हाला कोणते पुस्तक हवे असेल व त्या अचानक तुम्हाला मिळाले तर त्यातून मिळणारा आनंद, घरामध्ये एखादी चांगली गोष्ट घडल्यामुळे झालेला आनंद अशा सर्व या गोष्टी जर आपण आठवण लिहून ठेवल्या व त्यासारख्या आपण आठवत राहिलो यामुळे आपले सकारात्मक होण्यास मदत होते.

 

तिसरा नियम म्हणजे तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट घटनांवर हसायला शिका. आयुष्यामध्ये आपल्या सोबत अशा काही वाईट गोष्टी घडत असतात की ज्या आठवल्यामुळे आपल्याला खूप त्रास होत असतो. अशा गोष्टी जर आपल्याला आठवला तर त्यावर हसावे व इतके हसावे की इतरांना त्या गोष्टी सांगितल्याने देखील हसू येईल. त्यामुळे असे होते की जर आपण त्या गोष्टी आटवून उदास राहिलो तर आपल्या आजूबाजूचे वातावरण देखील आपल्याला उदास दिसू लागते व नकारात्मकतेचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. जर आपण त्या गोष्टी आठवणी त्यावर हसू लागलो तर आपला मनामध्ये सकारात्मक प्रभाव निर्माण होतात. आणि त्यामुळे आपण सकारात्मक विचार करण्याच्या मार्गावर जाऊ. म्हणून नेहमी अशा गोष्टी आठवल्या तर त्यावर हसायला शिकावे.

 

चौथा नियम म्हणजे तुमच्या संकटांचे संधी मध्ये रूपांतर करा. आपल्यावर कितीही समस्या आल्या किंवा संकटे आले तर त्यातून आपल्याला एक संधी शोधायला हवे. कारण जेव्हा केव्हा आपल्यावर कोणतीही संकटे किंवा समस्या येत असतात त्यामध्ये एक संधीही असतेच. ती आपल्याला शोधता आली पाहिजे. ती संधी शोधून काढली तर नक्कीच आपण आयुष्यामध्ये सफल होतो. असे कितीतरी अनेक मोठी लोकं होऊन गेले आहेत की जे संकट आल्यावर त्या संकटातून त्यांनी एक संधी शोधली व त्यातून ते खूप मोठे झालेले आहेत. म्हणून आपल्याला इतके काबिल बनवावे की कोणतेही समस्या आली तर त्यातून आपल्याला एक संधी शोधता आली पाहिजे.

 

पाचवा नियम म्हणजे गोष्टींना वेगवेगळ्या दृष्टीने बघायचा प्रयत्न करा. जर आपल्यावर कोणते तरी संकटे आले किंवा समस्या आली तर त्याला वेगवेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. जसे की एखादी समस्या आली व त्यावर आपण आपला दृष्टिकोन वेगळा असतो. परंतु आपण असा विचार करावा की जे व्यक्ती महान मोठे होऊन गेले आहेत त्यांना जर ही समस्या आल्या असतील तर त्यांनी कसा विचार केला असता. असा विचार करा जेणेकरून तुमची दृष्टी बदलते आणि असे म्हटले जाते की दृष्टी बदलली की सृष्टी होती. म्हणून आपली दृष्टी ही बदलावी.

 

अशाप्रकारे हे काही पाच नियम आहे. जर याचा आपण वापर केला तर नक्कीच आपले नकारात्मक विचार सकारात्मक विचारात परिवर्तन होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *