मित्रांनो बऱ्याच वेळी एखाद्या व्यक्तीच्या अंगावर जखम झाली की त्या जखमेच्या जागी काळे डाग पडतात. त्याचप्रमाणे काही व्यक्तींच्या तोंडावर पिंपल्स किंवा फोड येतात. आणि ते फोड फोडल्यानंतर देखील काळे डाग पडतात. कधीकधी वांग, ब्लॅक हेड्स, व्हाइट हेड्स येतात आणि प्रत्येक व्यक्तीला आपला चेहरा स्वच्छ व सुंदर असावा वाटतो. आणि सुरकुत्या व खड्डे नको वाटतात. या सर्व गोष्टींसाठी एक साधा सोपा व घरगुती करता येईल असा उपाय सांगणार आहे. या उपायांसाठी घरातीलच वस्तू लागणार आहेत तर कशा पद्धतीने यांचा वापर करायचा आहे आणि कोणते आहेत या वस्तू याचा सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो जेव्हा आपल्या चेहऱ्यावर काळे डाग येतात किंवा इतर काही समस्या होते तेव्हा आपल्यातील बरेच जण बाजारामध्ये मिळणाऱ्या औषधांचा आणि क्रीम चा वापर करतात ज्या मध्ये केमिकल च जे प्रमाण असत ते खूप जास्त असत त्यामुळे सुरवातीला तुम्हाला जर याचे फायदे दिसत असले तरीपण त्याचे साईड इफेक्ट्स खूप जास्त असतात. आणि या साईड इफेक्ट मध्ये तुमची त्वचा कोरडी व्हायला लागेल. नंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील, चेहऱ्यावरील जी त्वचा आहे ती पातळ दिसायला लागेल किंव्हा मुलींच्या चेहऱ्यावर जी केस उगवण्याची समस्या आहे ती समस्या निर्माण होते. म्हणून गोर दिसण्यासाठी, चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी कधीही आपण नेसर्गिक उपायांचा वापर केला पाहिजे.
मित्रांनो प्रत्येकालाच वाटत असते की आपण देखील सुंदर दिसले पाहिजे आपल्या देखील चेहऱ्यावर डाग किंवा कोणत्याही प्रकारचे वांग वगैरे नको त्यासाठी ते अनेक वेगळे प्रकारचे क्रिम्सचा वापर करत असतात घरगुती वापर करत असतात पण प्रत्येकाच्या स्किन नुसार ते असतो प्रत्येकाला सूट होईल असं काही ते नसतं क्रीम देखील आपण खूप महागातल्या आणतो किंवा आपण पार्लरमध्ये जाऊन अनेक वेगवेगळे महागाचे फेशियल वगैरे करत असतो त्याच्याने देखील आपल्याला तात्पुरता फरक जाणवतो परत आहे तसा आपल्याला त्रास व्हायला चालू होतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण साधा सोपा असा हा घरगुती उपाय बघणार आहोत हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये याचा फरक जाणवायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा चला तर मग आपण जाणून घेऊया.
मित्रांनो सर्वात आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला दोन चमचे इतक्या हळद घ्यायची आहे हळद ही आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत हळदीमुळे आपले शरीर हे चांगले राहते. आपण या ठिकाणी हळदी वापरण्याचे एक मुख्य कारण म्हणजे हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुण असतात. अँटिऑक्सिड प्रॉफिट आहे हे सर्व गुणधर्म आपल्या त्वचेसाठी कायद्याचे ठरतात.
या ठिकाणी दुसरा जो आपल्याला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बेसन बेसन देखील प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध हे असतेच बेसन पिठामध्ये देखील विटामिन ए विटामिन ई हे देखील असतात विटामिन सिक्स हे देखील उपलब्ध असतात पोटॅशियम मॅग्नेशियम हे देखील बेसन मध्ये आपल्याला आढळून येतं अतिशय महत्त्वपूर्ण असे हे घटक आहेत.
जे आपल्या त्वचेचे आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असतात आणि याच्या नंतर जी तिसरी वस्तू आपण वापरणार आहोत ते म्हणजे लिंबू लिंबू आपण या ठिकाणी अर्धा चमचा इतकाच त्याचा रस काढून घ्यायचा आहे लिंबू देखील सर्वांच्या घरांमध्ये उपलब्ध असतो. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला दोन चमचे इतके बेसन घ्यायचे आहे.
आणि त्याच्यानंतर नदी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हळद हळद देखील आपल्याला या ठिकाणी एक चमचा इतकी घ्यायची आहे हे सर्व मिश्रण आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी अर्धा लिंबू म्हणजेच की आपला अर्धा चमचा इतका झाला पाहिजे एवढा लिंबू आपल्याला घ्यायचा आहे. आणि ते सर्व मिश्रण एकत्र करायचा आहे.
आणि त्याच्यानंतर ना आपल्याला ज्या ठिकाणी काळे डाग आहेत वांग आहे त्या ठिकाणी लावायचा आहे व ते सुखेपर्यंत म्हणजेच की दहा-पंधरा मिनिटे तसेच ठेवून द्यायचे आहेत आणि थोड्या वेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करू शकता याच्यामुळे तुम्हाला लवकरच फरक दिसायला चालू होणार आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.