मित्रांनो, आपले दात पिवळे असतील तर चार चौघात मोकळ्या मनाने खुलून मनसोक्त हसता येत नाही. पण काळजी करु नका ह्याच पिवळ्या दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि त्यांना चकचकीत, शुभ्र बनवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आपण ह्या लेखात पाहणार आहोत. चेहऱ्याच्या सौंदर्याचं रहस्य फक्त चमकदार केस किंवा डाग मुक्त त्वचा नाही, तर पांढरे दात देखील आहेत. तुमचं हास्य हे देखील सौंदर्याचे वैशिष्ट्य आहे. सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे तुमच्या चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळेच दात पिवळे होतात.
मित्रांनो आपल्या वाईट खाण्याच्या सवयींमुळे दात पिवळे होतात. जसे की चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स जास्त पिणे ह्यामुळे दात पिवळे होतात. ह्या शिवाय, तंबाखू, दारू, गुटखा इत्यादींच्या सेवनामुळे किंवा स्वच्छतेच्या अभावामुळे दात पिवळे पडतात. दातांचा नैसर्गिक रंग निघून जाण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीच्या गोष्टींचा वापर. मित्रांनो दातांवर अधिक चमक आणण्यासाठी, लोक उपचार करतात ज्यामुळे दातांचा रंग आणखी खराब होत जातो. कधीकधी टेट्रासाइक्लिन नावाच्या औषधामुळे दातांवर पिवळे डाग पडतात आणि मित्रांनो लोक दात स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारची केमिकल असलेली औषधे वापरतात.
पण मित्रांनो त्याचाही दातांवर वाईट परिणाम होतो. मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला आपले दात पांढरेशुभ्र असावे असे वाटेत. सुंदर दात हे सौंदर्यासोबत आरोग्याचेही लक्षण आहे दातांची योग्य निगा राखली तर दात चांगले व पांढरे शुभ्रदिसतात जेंव्हा व्यक्तीच्या चेहेऱ्यावर हसू उमलते. तेंव्हा अश्या दंतपंक्ती मुळे त्या व्यक्तीच्या चेहेऱ्याचे सौंदर्य चांगलेच खुलून दिसते आणि आपल्यापैकी बरेच लोक दातांची चांगली काळजी घेतांना दिसून येतात. तरीदेखील दात पांढरेशुभ्र नाही होत. त्यांच्यादातांवर पिवळे डाग असतात. जेणेकरून हसल्यावर त्यांचे दात चांगले दिसत नाही.दातांचे पिवळेपणा आणि काळे डाग ही हे दातांवर प्लेक असल्याचे लक्षण असतात. प्लेक एक विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया मुळे तयार होतात.
दातांवरील किटन काढून दात पांढरे करण्याचे उपाय जर तुम्ही योग्य वेळी कराल तर तुमचे दातांवरचे डाग निघू शकतात आणि दात पांढरे होऊ शकतात. आपण आज आपले पिवळे दात पांढरे शुभ्र करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या दातांमध्ये अडकलेली घाण पूर्णपणे बाहेर निघून जाण्यासाठी आणि आपल्या दातावर एक वेगळीच चमक निर्माण व्हावी यासाठीच आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक छोटासा उपाय आज पाहणार आहोत. आणि तर मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपले दात नक्कीच पांढरे शुभ्र होतील. मित्रांनो हा उपाय करत असताना आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचा वापर करून हा कमी खर्चामध्ये अगदी सोप्या पद्धतीने हा उपाय करू शकतो.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत आणि त्या खलबत्त्याच्या साह्याने चेचून त्याची एक बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे मित्रांनो लसूण मध्ये असणारे अनेक पोषक घटक हे आपल्या दाता संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात आणि त्याचबरोबर आपल्या दाताचा पिवळेपणा दूर करण्यासाठी यांचा खूप उपयोग होतो तर अशा या लसणाच्या दोन-तीन पाकळ्यांची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा जो घटक लागणार आहे तो म्हणजे टोमॅटो मित्रांनो साधारणता दोन ते तीन चमचे आपल्याला टोमॅटोचा रस काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या घरामध्ये असणारी कोणत्याही एका तूटपेस्ट ची पेस्ट आपल्याला एक ते दीड चमचा एका वाटीमध्ये घ्यायची आहे.
आणि हे तिन्ही पदार्थ आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत सर्वात आधी लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट त्यानंतर दोन ते तीन चमचा टोमॅटोचा रस आणि तुमच्या घरामध्ये असणारी कोणत्याही टूथपेस्ट ची एक ते दीड चमचा पेस्ट आपल्याला घ्यायची आहे आणि हे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत थोडे मिश्रण झाल्यानंतर आपल्याला मित्रांनो त्यामध्ये आणखीन एक शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे खायचा सोडा मित्रांनो खायचा सोडा ही आपल्या दाताच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त असतो म्हणूनच या उपायासाठी आपल्याला दोन ते तीन चिमूट बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा ही या मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो आता हे आपले मिश्रण तयार झालेले आहे अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतल्यानंतर आता याचा वापर कसा करायचा आहे हे जाणून घेऊया तर मित्रांनो हे आपण मिश्रण तयार केलेले आहे याने आपल्याला आपण ज्या पद्धतीने ब्रश करतो त्या पद्धतीने आपल्या ब्रशवर ही पेस्ट म्हणजेच हे मिश्रण घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्या सहाय्याने सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ब्रश करायचा आहे मित्रांनो ही जी पेस्ट आपण तयार केलेली आहे ही तुम्ही फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता तीन दिवसांपर्यंत एकदा तयार केलेल्या पेस्टचा वापर तुम्ही करू शकता तर अशा या पेस्टचा वापर करून तुमच्या दाताच संबंधित सर्व समस्या तुम्ही दूर करू शकता.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.