मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत. स्वामींची त्यांच्यावर कृपादृष्टी कायम रहावी यासाठी आपण स्वामींची मनोभावे सेवा करीत असतो. स्वामीही आपल्या भक्तांना कधीच दुखवत नाहीत. त्यांच्या पाठीशी कायम उभे राहतात. मित्रांनो अभिनेत्री निवेदिता सराफ देखील स्वामींचे भक्त आहेत. त्यांची देखील स्वामींवर श्रद्धा आहे. तर मित्रांनो स्वामींचे आपणाला प्रचिती अनेक माध्यमातून मिळते. तर मित्रांनो अभिनेत्री निवेदिता सराफ यांना आलेला स्वामी समर्थ महाराज यांचा अनुभव व प्रचिती आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत की त्यांना स्वामींचा अनुभव व प्रचिती कशी आली ते. तर मित्रांनो निवेदिता सराफ यांच्या भाषेतच आपण ती जाणून घेऊयात.
झी मराठीवर अग बाई सासुबाई ही मालिका खूपच फेमस झाली. यामधील खूप फेमस झालेले पात्र म्हणजेच निवेदिता सराफ. या स्वामींच्या नितांत भक्त आहेत. त्यांनी स्वामीविषयी सांगितलेला अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांना आलेला अनुभव आपण त्यांच्याच भाषेतून जाणून घेऊयात निवेदिता सराफ म्हणतात नमस्कार मित्रांनो मी स्वामींची भक्त आहे. मी अगदी मनापासून स्वामींची सेवा करते. मी स्वामींची सेवा करू लागले कारण माझे मिस्टर अशोक सराफ यांच्या आई या स्वामींच्या भक्ती करत होत्या. अशोक सुद्धा स्वामींचे चरित्र वाचायचे. मग मी सुद्धा स्वामींचे चरित्र वाचू लागले स्वामींचे चरित्र वाचल्यानंतर मी भारावून गेले. जसे संत गाडगेबाबा आहेत तसेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहेत.
त्यांनी कधीच असे म्हटले नाही की माझी पूजा करा. मला देव म्हणा. परंतु त्यांनी खूप काही दिलं. स्वामींनी मला सुद्धा खूप काही दिलेलं आहे. त्यांनी मला खूप आधार दिला आहे. मी स्वामींचे नाम घेऊन वरून उडी देखील मारू शकते कारण खाली धरायला स्वामींचे हात नक्कीच असतील हे मला माहित आहे.
मित्रांनो, आपले आई वडील हे आपल्या जन्मापर्यंतच आपल्या सोबत असतात. तर आपले गुरु हे आपल्या जन्मोजन्मीचे असतात. त्यांना फक्त आपला आत्ताचा जन्म दिसत नाही तर पाठीमागचा जन्म, पुढचा जन्म दिसत असतो. मला जे हवं ते स्वामींनी मला दिलेलं आहे. स्वामी हे गुरु आहेत. गुरुचा अर्थ काय तर अंधकार दूर करतो तो गुरु. तर स्वामींनी मला काय दिले तर अज्ञानाचा अंधकार स्वामींच्या नजरेने दूर झाला. आजूबाजूचा अज्ञानाचा अंधकार दूर झाल्याने माझ्या जीवनात ज्ञानाचा दिवस स्वामींच्या मुळे आला. ते ज्ञान म्हणजे काय तर तुम्ही आयुष्यात का आलाय, तुमचं इथलं प्रयोजन काय?
पहिली गोष्ट म्हणजे यश या शब्दाची व्याख्या काय. तर यश म्हणजे खूप पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान म्हणजे यश का तर नाही असे मला वाटत नाही. स्वामींच्या दृष्टिकोनातून यशाची व्याख्या अशी आहे यश म्हणजे तुम्हाला आलेल्या नातेसंबंधात तुम्ही किती चांगल्या रीतीने उतरता म्हणजे आई, बहीण म्हणून. म्हणजे मी एक स्त्री म्हणून. जो व्यवसाय मी स्वीकारलाय तो किती सचोटीने तुम्ही करता. मी किती प्रामाणिकपने व्यवसाय करते. कोणावर मी अन्याय करत नाही ना. हेच मला दर्शवून देणे हेच माझ्या मते यश आहे.
तर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग स्वामी तुम्हाला दाखवतात. शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचे असतात. स्वामी हे आपल्याला स्वावलंबी बनवतात. तुमचे निर्णय तुम्हाला घ्यायला ते शिकवतात. असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं नाही. तुम्ही प्रयत्न करायला हवेत. प्रयत्न करीत असताना कदाचित तुम्हाला ठेच लागेल. पण स्वामी तुमच्या सोबत कायम असतील किंवा तुमच्याकडून चूक झाली तर थप्पड लावायला सुद्धा स्वामी असतील. कारण स्वामी हे खऱ्या आईसारखे आहेत.
तर ते फक्त लाडच करणार नाहीत. तर बऱ्याच वेळी ते थप्पड सुद्धा तुम्हाला देतील. पण आपण कित्येक वेळा असं बोलतो मला हे हव आहे.ते हवं आहे. पण तुमची ती लायकी आहे का? तुमची तेवढी प्रगती झाली आहे का? याचा विचार कोण करते का. नववीतला मुलगा बारावीची परीक्षा नाही देऊ शकत. त्याला आधी नववीची परीक्षा पास करावी लागते. मग दहावीची, मग अकरावीची आणि मग बारावीची. तुम्हाला जे हवे ते मिळवण्याची तुमची लायकी आहे का? ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवे हे पहिल्यांदा आपण शोधलं पाहिजे. मला हे हवंय कदाचित ते तुम्हाला मिळालं नसेल तर ते तुम्हाला भेटण्याची वेळ नाही. म्हणजेच तुम्हाला अजून खूप काही शिकायचं आहे आणि मग तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल.
त्याला ते मिळालं मला का नाही असे अनेक विचार आपल्या मनात येत असतात. परंतु प्रत्येकाचा मार्ग, प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात ते सुखी आहे किंवा दुःखी आहे हे आपण काठावर उभे राहून कधी सांगू शकत नाही. कारण त्याच्या आयुष्यात जे काही सुख आहे की दुःख आहे ते फक्त त्यालाच माहिती असते. आपल्याला फक्त वरून वरून दिसत असतं त्याने किती पाप केले तरी तो किती सुखी आहे. पण त्याचबरोबर त्याच्या अंतर्मनात काय चाललंय हे आपल्याला कुठे माहित असतं.
म्हणून कधी कोणाशी तुलना करू नये. आपण नेहमी स्वतःशी स्वतःची तुलना करावी. हेच स्वामी सांगतात. काल मी इथे होतो आज मी पुढे आली आहे का आणि मी कशी आली आणि पुढे आले म्हणजे अध्यात्माच्या वाटेवर. आपण म्हणतो की, मी एक शिखर आहे. आपण शिखर आहोत म्हणजे मी एवढेच म्हणेन की मला मार्ग सापडला. मी फक्त आता एका मार्गावर आहे. मला आता कळतंय की इथून पुढे कसे जायचे. कुठल्या मार्गाने जायचे. मला काय करायचे आहे .मी कधीच अस आयुष्यात म्हणणार नाही की हे मला स्वामींमुळे मिळाले. ते मिळालं.
मी असं म्हणेन की, माझं अख्ख आयुष्य हे स्वामींमुळेच आहे. आज मी जे कोणी आहे ते फक्त स्वामींमुळेच आहे. स्वामींची कृपा आणि आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद. कारण जे आई वडील असतात ना असं म्हणतात आत्मा जी, आईची कोक जो उदर असेल ती आत्मा निवडते. ते आई वडील तुम्ही निवडलेले आहात. त्यामुळे त्यांच्याकडूनही खूप काही आपल्याला शिकायला मिळतं. आई-वडिलांचे, वाडवडिलांचे आशीर्वाद आणि गुरुकृपा या दोन गोष्टी आपल्याला आयुष्यात तारुण देतात. तर अशा प्रकारे निवेदिता सराफ यांनी स्वामींबद्दल असलेली आपली श्रद्धा व्यक्त केली.
तर मित्रांनो अशा प्रकारे अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपल्या भाषेमध्ये स्वामींच्या त्या सुद्धा नितांत भक्त आहेत हे आपणाला सांगितले. स्वामींची कृपा ही प्रत्येक भक्तांवर असतेच हे त्यांच्या बोलण्यातून आपणाला लक्षात आलेच असेल. तर मित्रांनो तुम्ही देखील स्वामींचे नामस्मरण अगदी श्रद्धेने व मनोभावे नक्कीच करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.