मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार…. प्रेरणादायी आणि उत्तम असे हे मराठी सुविचार वाचून तुमच्याही मनाला एक नवीन प्रेरणा मिळेल?

Uncategorized

मित्रांनो,आपल्या वाचनात व ऐकण्यात असे काही चांगले विचार असतात जेव्हा ऐकल्यामुळे किंवा वाचल्यामुळे आपले मन अगदी प्रसन्न होऊन जाते. असेच काही सुविचार जे आपले मन प्रसन्न करतात. त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते. अशा काही सुविचार आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

१.परक्यांनाही आपलसं करतील असे गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.

२.जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेंव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरूवात करतात.

३.जे हक्काचे आहे ते झगडुन देखील मिळवावे, पण ज्यावर हक्क नाही ते स्वीकारू नये.

४.जात हा अपघात आहे, त्याबद्दल “गर्व” कधीच करू नका कारण “काळ” आणि “वेळ” आल्यावर जातीचं नाही तर “माणुसकीचं” रक्त कामाला येतं

५.ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे. परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान अमृत आहे.

६.वाढत्या वयापेक्षा, वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात… सुख आपल्या हातात नाही परंतु सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे.

७.एका मिनीटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनीट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमर्च आयुष्य नक्की बदलु शकतो.

८. “संत” आणि “वसंत” मध्ये एक साम्य आहे. जेव्हा वसंत येतो, तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा “संत”येतात, तेव्हा “संस्कृती”सुधारते.

९.ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो.

१०.हिम्मतीने हारा.. पण हिम्मत हारू नका… प्रत्येकजण हिरा बनवूनच जन्माला घातला जातो, पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो.

११.खेळ शिकायचा असेल तर बुध्दिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्या माणसाचा पराभव करत नाही.

१२.संयम ठेवा आणि कधीच हार मानू नका मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतोच.

१३.सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही… परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल…!

१४. आयुष्य आपल्या सामर्थ्यावर जगायला हवं, दुसऱ्याच्या खांद्यावर तर केवळ अंत्ययात्राच निघते.

१५.सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी राहू.

१६.मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात.., माणसाचं ही तसंच आहे गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही…! ” ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं ”

१७.जगणं खूप सुंदर आहे; त्यावर हिरमुसू नका… एक फूल उमललं नाही; म्हणून रोपाला तुडवू नका… सगळं मनासारखं होतं असं नाही; पण मनासारखं झालेलं विसरू नका सुटतो काही जणांचा हात नकळत; पण धरलेले हात सोडू नका.

१८.” हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा, जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा. आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड रहा, कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो.

१९.आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे की, भविष्याचा विचार करत बसायचे, की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.

२०.आपली चांगली वेळ जगाला सांगते की, आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की, जग काय आहे.

२१.छोटसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.

२२.आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर “स्वाद” आणि “वाद” या दोन्हीचा त्याग केला पाहिजे. “स्वाद” सोडला तर “शरीराला” फायदा आणि “वाद” सोडला तर “नात्याला” फायदा.

२३.भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.

२४.आयुष्यात झालेल्या चुकांमुळे जर आपण प्रयत्न करण थांबवलं तर ते मात्र चुकीच आहे त्या चुकांतून शिकणं आणि पुढे जाणं म्हणजे आयुष्य आहे..

२५. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे……

२६.बोलण्यापूर्वी “शब्द” आणि पेरण्यापूर्वी “बी” कोणतं वापरणार याचा जरूर विचार करा नंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही कारण परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहात.

२७.बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.

२८.स्वतःच्या चुका लपवून *आणि दुसऱ्याच्या चुका दाखवून आपलं व्यक्तिमत्व सिद्ध होतं नसतं.

२९.सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे, आयुष्यात सावकाश चाला काही हरकत नाही, पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची, आणि मनमिळावू स्वभावाची, आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची, आणि दैदिप्यमान यशाची सोनपावलं सदैव मागे उमटली पाहिजे.

३०.मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही.

 

अशाप्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत. ज्यामुळे आपले मन अगदी प्रसन्न होते. त्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *