मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की आपण ज्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवत असतो. मनापासून ज्या व्यक्तींवर प्रेम करत असते. तीच व्यक्ती आपला विश्वासघात करत असतो. म्हणून अशा व्यक्तींपासून आपण जवळीक साधू नये. त्या लोकांपासून दूर राहावे. यासाठी आजचा लखातून आपण सुंदर असे सुविचार जाणून घेणार आहोत.
कुणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा नका घेऊ, की त्याला वाईट बनायला भाग पडेल, लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिलं चांगला बनवून तुटलेला असतो.
जे साधं सोपं असतं तेच छान असतं मग ते जगणं असो की वागण असो.
माणसानं श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं पण साधेपणाला “दारिद्रय” कधीच समजू नये.
माणसं बदलत नसतात कालांतराने ती कशी असतात हे
कळत असतं.
थोडं फार सहन करायला शिकलं पाहिजे कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना स
मोरची माणसं सहन करत असतात.
खरं प्रेम करणारा तुमच्याकडे पैसा, संपत्ती मागत नाही त्याला तुमचा वेळ हवा असतो.
आपल्याकडे समस्या मुळापासून संपवली जात नाही तात्पुरते उपाय केले जातात परिणामी समस्या पुन्हा वर डोकं काढते म्हणून समस्येचा बेबुड करा, तेच हितकारक होईल.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महत्व देत चला, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जात असते.
ज्याला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असते तो कधीच वाईट मार्गाने जात नसतो.
अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र आणि आपतिष्ठापासून दूर करतात. गैरसमज त्याला सत्य ऐकू येत नाही, आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही.
नुसता आपला विचार करू नका ही दुनिया फक्त
आपलीच नाही दुसऱ्यांची पण तितकीच आहे.
मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं, वय नसतं.
जे तुमच्या नशिबात आहे ते कुठूनही तुमच्याकडेच येणार आणि जे तुमच्या भाग्यात नाही ते तुम्हाला मिळूनही तुमच्याकडे राहणार नाही.
परिस्थिती मारक नको असेल तर माणसाची पारख ठेवाच, कारण वाटीत खीर देऊन पाठीत खंजीर खुपसणारे भरपूर आहेत.
जी माणसं मनानं साफ असतात त्यांच्याच मागं दुनियाभराचे ताप असतात.
फक्त नीतिमत्ता साफ ठेवा दिवस सगळ्यांचं बदलत असतात.
जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा लोकही वाईट वागतात आणि चांगली वेळ आली की सगळे चांगले वागतात दोष लोकांचा नाही तर वेळेचा आणि परिस्थितीचा आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, माणसं बदलण्यात वेळ घालवू नका त्यापेक्षा आपली परिस्थिती बदला म्हणजे बाकी सगळं आपोआप बदलेल.
कामापुरती नाती आणि थंडी घालवण्यासाठी केलेली शेकोटी जास्त काळ टिकत नसते.
स्वतःचे दुःख स्वतः जवळच ठेवा दुनिया फक्त सुखातच सोबती असते.
राहणारे घर किंवा घराचा दरवाजा कितीही छोटा असला तरी चालेल पण हृदय आणि हृदयाचा दरवाजा मोठा असावा कारण तिथेच नाती आश्रय घेतात.
आपल्या व्यक्तींसाठी थोडी माघार घ्यावी लागली तर हरकत नाही पण त्यांच्याशी असलेले नातं कधी तोडू नका कारण नाती जोडायला वर्ष लागतात आणि तोडायला काही क्षण लागतात.
मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा, तो माझा, माझ्या जवळची माझी खरंतर तुमची फक्त वेळ आहे, ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे ! नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे हेच जीवनाचे सत्य आहे.
नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही हृदयापासून जो जवळचा असतो, तोच आपला असतो.
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस.
एकमेकांविषयी आदर आणि कदर असेल तर आणि तरच सगळी वचने आपोआप निभावली जातात.
जीवन तर जगायचंच आहे मग टेन्शन कशाला घ्यायचं? आणि ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो त्यांच्याकडे लक्षच का द्यायचं..?
अशाप्रकारे आपले मन प्रसन्न करणारे हे काही सुंदर सुविचार आहेत.