मित्रांनो आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये अशा अनेक वनस्पती आहेत त्या आपल्या खूप फायद्याचे आहेत पण आजपर्यंत त्याच काय फायदे आहेत हे आपल्याला समजले नाही आपल्याला कोणताही आजार झाला असू दे किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचा काही शरीरासंबंधी अडचणी असू द्या ते त्या वनस्पती दूर करत असतात आणि त्या वनस्पतीची देखील आपल्याला खूपच फायदे होत असतात जर तुमचा जास्त प्रमाणामध्ये डोके दुखत असेल किंवा तुमची हात पाय सुजत असतील किंवा तुम्हाला जास्त जखम झालेली असेल त्या ठिकाणी या वनस्पतीचे रस लावला किंवा हा पाला बांधला तर तुमची जी काही समस्या आहे जो काही त्रास आहे तो त्रास कमी होण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो ती कोणती वनस्पती आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो जर तुमचं जास्त प्रमाणामध्ये डोके दुखत असेल प्रत्येक वेळेस मेडिसिन खाणं देखील शरीरासाठी खूप घातक ठरत असतं त्यामुळे आपल्याला आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अशा काही वनस्पती असतात त्या आपल्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात तर त्यातली ची एक वनस्पती आहे ती म्हणजे पानफुटी पानफुटी ही वनस्पती आपण आपल्या परिसरामध्ये देखील लावू शकतो.
सर्वात पहिला याचा उपयोग होतो तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर कुठे आपल्याला जखम झाली असेल तर त्या ठिकाणी आपण अनेक प्रकारचे क्रिम लावत असतो किंवा अनेक उपाय करत असतो तर त्याऐवजी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची जखम लवकरच भरून येणार आहे तुम्हाला पानफुटीची पाने तुम्हाला या ठिकाणी तुमची जेवढी जखम आहे त्याचा एवढे तुम्हाला पाने घ्यायचे आहेत.
व ती पाने तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्या खलबत्त्यामध्ये तुम्हाला चेचून घ्यायचा आहे व चेचून झाल्यानंतर ते मिश्रण तुम्हाला थोड्या वेळासाठी गरम करून घ्यायचा आहे एकदम मंद आचेवर तुम्हाला हे गरम करून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जखम झालेली आहे त्या ठिकाणी हे मिश्रण लावायच आहे जोपर्यंत तुमची जखम भरून येत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा आहे .
आणि हा उपाय तुम्हाला सलगच करत राहायचं आहे जर तुम्ही हा उपाय सलग केला तरच तुमची जखम लवकरच भरून येण्यास मदत होणार आहे आणि त्याचबरोबर जर तुमचे हात पाय सुजत असतील तर या पानांचा देखील तुम्हाला खूपच उपयोग होणार आहे तुम्हाला गरम करून घ्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणी तुमचे हात किंवा पाय सुजले असतील त्या ठिकाणी तुम्हाला बांधून घ्यायचे आहे.
तुमचे जे काही सुजलेले हात पाय असतील ते कमी होणार आहेत. त्याचबरोबर जर लघवीची समस्या होत असेल म्हणजेच की वारंवार लघवीला येत असेल यासाठी माणसांना म्हणजेच की पुरुषांना या पानांमध्ये थोडी मध टाकून हे जर तुम्ही खाल्ला तर तुमचे लघवीची जी काही अडचण आहे ती कमी होणार आहे तर मित्रांनो साधी सोपी हे घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून बघायचे आहेत.