मित्रांनो, हिवाळा आता सुरु झालाय. हिवाळयात मुळा खाण्याचे विशेष फायदे असतात. यामध्ये जीवनसत्त्वे ए, बी आणि सी, प्रोटिन्स, कॅल्शियम आणि लोह सारखी अनेक खनिजे असतात. मुळ्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून खाल्ले जातात. मुळ्याची भाजी, मुळा पराठा, मुळा करी, भुर्जी इत्यादी. मुळ्याचे विविध पदार्थ खायला चविष्ट असतात आणि पचनासाठीही खूप चांगले असतात आणि त्याचबरोबर मुळ्यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडेंट असतात, त्याचा आरोग्याला फायदा होतो. यासोबतच या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते. त्यामुळे आरोग्याला आजारांपासून वाचवण्यासाठी आणि आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे.
मात्र पांढरा मुळा हा पौष्टिक असला तरी यासोबत काही पदार्थ आणि पेये टाळली पाहिजेत. तसे न केल्यास शरीराला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. तर मित्रांनो आजच्या लेखात आपण मुळा हि भाजी खाण्यापूर्वी व खाल्यानंतर आपण कोणते पदार्थ आपण खाऊ नयेत, कोणते पदार्थ खावेत याविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत.
मित्रांनो आपल्याला सर्वाना माहिती असेलच कि मुळा हि भाजी बहुगुणी आहे, ह्यात आपल्याला सर्वाधिक प्रमाणात प्रोटीन मिळते. तसेच ह्यामध्ये कॅल्शिअम ची कमतरता जास्त आहे, ज्यांचा अंगात ह्याची कमी आहे ज्यांची हाडे कमकुवत आहेत अश्या लोकांनी मुळा नक्की खावा. त्याची भाजी किंवा त्याचा ज्युस करून प्यावा. ज्यांच्या अंगात आयर्न ची कमतरता आहे, ज्यांना ऍनेमिया चा त्रास आहे अश्या लोकांनी तर मुळ्याचे सेवन नक्की करावे. ह्यामुळे अंगातील लोह मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र ह्या भाजीसोबत आपण काही पदार्थ आहेत ते आपण चुकूनही सोबत त्याचे सेवन करू नका.
पहिला पदार्थ आहे तो म्हणजे संत्री. संत्र्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सि असते जे कि आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत करते. तसेच संत्र्यात काही अँटिऑक्सिडेन्ट देखील मोठ्या प्रमाणात आहेत. जे आपले वाढते वय हे कंट्रोल मध्ये ठेवतात. आपल्याला तरुण ठेवण्याचे काम हे संत्रे करतात.
जसे संत्र्यात अँटिऑक्सिडेंट्स आहेत तश्याच प्रकारे ते मुळ्यात देखील आहेत आणि मित्रांनो जेव्हा आपण हे दोन पदार्थ आपण एकत्र खातो तेव्हा ह्या अँटिऑक्सिडेंट्स ची एकमेकांसोबत प्रतिक्रिया होते आणि परिणामी आपल्या पोटाचे अनेक प्रकारचे विकार होतात. स्थूलपणा येतो, तसेच ऍसिडिटी, पित्त वाढणे अश्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. म्हणून मुळा खाण्यापूर्वी किंवा खाल्यानंतर संत्र्याचे सेवन करू नका.
दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे कारले. खूप जणांचं कारले हे नावडती भाजी असली तरी कारल्यात खूप प्रकारचे गुण आहेत. परंतु कारल्यासोबत आपण मुळा खाऊ नका. हे जर आपण एकत्र घेतले तर असे हे दोघांचे मिश्रण होते. त्यामुळे आपल्याला गंभीर स्वरूपाचे परिणाम होऊ शकतात.
पहिला गंभीर परिणाम आहे तो म्हणजे आपला ब्लड प्रेशर हा एकदम वाढू शकतो. परिणामी हार्ट अटॅक देखील येऊ शकतो. म्हणून आपण कारले व मुळा निदान २४ तासानंतर खावे. एकत्र कधीच त्याचे सेवन करू नये. ज्या दिवशी मुळा खात आहेत त्यादिवशी कारल्याचे सेवन करू नये.
तिसरा पदार्थ म्हणजे दूध. मुळा व दूध हे दोन्ही एकत्र खाल्ले गेले तर एक विशिष्ट प्रकराची केमिकल रिऍक्टशन घडून येते. पारंपरिक काही समजूत आहे कि मुळयासोबत, मुळा खाताना किंवा खाऊन झाल्यानंतर जर दुधाचे सेवन केले तर शरीरावरती पांढरे चट्टे, डाग येतात आणि हे लवकर बरे होत नाहीत. म्हणून आपण ते होण्याआधी आपण काळजी घेतली पाहिजे. आपण एका दिवशी हे दोन्ही पदार्थ खाऊ नयेत.
तर अश्या प्रकारे हे 3 पदार्थ खाणे आपण मुळ्यासोबत टाळावे.अगदी काळजीपूर्वक ह्या गोष्टी पाळा. म्हणजेच मुळ्याबरोबर संत्रे, दूध आणि कारले हे पदार्थ खाणे टाळणे खूपच गरजेचे आहे. जर तुम्ही हे पदार्थ मुळ्याबरोबर एकत्रित खाल्ले तरी याचा खूपच विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो. मुळा खाल्याने आपल्याला वरील सांगितल्याप्रमाणे फायदे देखील आहेत. फक्त काही नियम नक्की पाळा. काही गोष्टी सांगितल्याप्रमाणे खाणे टाळा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.