कितीही काहीही करा पण ही पाच माणसे १००% धोका देतातच चाणक्य नीति….!!

Uncategorized

मित्रांनो, आपला जीवनामध्ये व्यक्ती हे आपल्याला धोका देतच असतात. आपल्या पाहण्यात असे अनेक वेळा आलेले असतात की जे एकमेकांना धोका ही देत असतो. दोन प्रेम करणारा व्यक्ती देखील कालांतराने कितीही प्रेम त्यांच्यामध्ये झाले असले तरी ते एकमेकांना धोका हे दिलेल्या आपण पाहिलेच असतील. पती-पत्नी एकमेकांना धोका देत असतात. त्याचबरोबर मित्र-मैत्रिणी किंवा मित्रांमध्ये देखील धोका हा देतो आहे. आपण पाहिलेले आहेत. म्हणूनच आज आपण अशा पाच व्यक्तीं बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत की ज्या व्यक्ती आपल्याला धोका देत असतात.

 

ज्याप्रमाणे आपण सोने खरे आहे की नाही यासाठी ते घासून पाहतो, त्याला तापवून पाहतो, तापवल्यानंतर त्याच्यावर वार करून पाहतो. मग ते आपल्याला कळते की सोने खरे आहे की नाही. त्याचप्रमाणे जर एखाद्या माणसाची पारस करायचे असेल तर त्याला देखील योग्य रीतीने त्याची पारक करणे खूप गरजेचे आहे. चाणक्यांनी सांगितलेली अशी काही पाच माणसे आहेत की ज्यांच्यावर आपण भरोसा कधीही ठेवू नये. अशा व्यक्तींबद्दलच आजच्या या लेखात आपण माहिती पाहणार आहोत.

 

त्यातील पहिले व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्ती चुकीच्या मार्गाने पैसे कमवत असतात. पैसे कमावण्यासाठी वाईट मार्गाचा अवलंब करत असतात. अशा व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नये. कारण ही व्यक्ती त्यांच्या स्वार्थासाठी मैत्री ही करत असते आणि मैत्री केल्यानंतर त्यांचा स्वार्थ साधून झाल्यानंतर जे काही आपल्याकडून त्यांना घ्यायचं आहे ते घेऊन जा नंतर ते आपल्याला धोका देत असतात. कधीही अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. या उलट जे व्यक्ती धार्मिक आहेत, नीतीवंत आहेत अशा व्यक्तींना आपण विश्वास ठेवावा.

 

दुसरी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तींवर आपण विश्वास ठेवत आहोत त्या व्यक्तीचे चरित्र आधी पहावे. आणि मगच विश्वास ठेवावे. कारण ज्या व्यक्तीच स्वभाव हा त्याच्या चरित्रावर अवलंबून आहे. अशा चरित्रहीन व्यक्ती जास्त असतात त्या व्यक्ती कधीही चांगला विचार करत नाही. आणि त्या जीवनामध्ये कधी ना कधी आपल्याला धोका या देतच असतात. म्हणून व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी त्याचे चरित्र पारखून पाहणे खूप गरजेचे आहे.

 

तिसरी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्ती खूप आळशी, नेहमी खोटं बोलणारे, तापट स्वभावाचे, गर्विष्ठ अशा व्यक्ती आहेत अशा व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नये. कारण या व्यक्ती कधी ना कधी समोरच्या व्यक्तीचा विश्वास घात करतच असतात. या उलट जे व्यक्ती कष्टाळू आहेत, नेहमी खरे बोलतात, त्यांचा स्वभाव अगदी शांत आहे अशा व्यक्तींवर आपण विश्वास ठेवावा.

 

चौथी व्यक्तीची आहे ती म्हणजे ज्या व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करता, इतरांच्या सुखदुःखाचा विचार करत नाही, दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करत नाही अशा व्यक्ती जीवनामध्ये आपल्याला धोका या नक्की देत असतात. या उलट ज्या व्यक्ती खूप प्रेमळ स्वभावाच्या आहेत, कोणतेही कार्य करत असताना इतरांचा विचार करत असतात, इतरांच्या सुखदुःखाचा विचार करत अशा व्यक्तींवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवावे.

 

अशाप्रकारे या काही व्यक्ती आहेत त्यांच्यावर आपण अजिबात विश्वास ठेवू नये. असे चाणक्यांनी त्यांचा चाणक्य नीति मध्ये सांगितलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *