मित्रांनो, दातदुखी ही एक अशी समस्या आहे जी वेळेनुसार वाढत जाते आणि पुढे जाऊन दात दुखी व दात किडणे यामुळे दात दाढ काढण्याची वेळ येते. म्हणून सुरुवातीलाच दाताला कीड लागते तेव्हा केवळ एक काळा डाग असतो जर याकडे योग्यवेळी लक्ष नाही दिलं तर तो वाढत जाऊन शेवटी दाताला मधील भागाला कीड लागते. दाताला किंवा दाढेला मधील भागाला जेव्हा किड जाते तेव्हा इन्फेक्शन जास्त वाढलं तर दात काढणे हा एकच पर्याय शिल्लक राहतो आणि आपल्याला ही वेळ येऊ नये म्हणून आपण लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी काही घरगुती उपाय करून आपण दाताला लागलेली कीड हळूहळू कमी करू शकतो आणि पूर्णपणे मुळापासून संपवू शकतो.
मित्रांनो दाताला कीड लागणं याच मुख्य कारण आहे तोंडात असणारे बॅक्टेरिया किंवा छोटे जीवजंतू किंवा किटाणू आपल्या तोंडात लहानपणापासून असतात. जेव्हा आपण दाताची किंवा तोंडाची व्यवस्थित काळजी घेत नाही तेव्हा त्यांची संख्या वाढते आणि ती कीड लागण्यास कारणीभूत होतात.
आपण रोज ब्रश करतो आपल्या दाताला कीड लागते कशी या गोष्टीचा आपण विचार करतो. मित्रांनो दात किडण्याचे पहिले कारण म्हणजे साखर आणि दुसरी म्हणजे कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ जसं मैदा.जेव्हा आपण साखरेपासून बनलेला किंवा मैद्यापासून बनलेला एखाद्या पदार्थाचे जास्त सेवन करतो किंवा जास्त प्रमाणात खातो तेव्हा तोंडातील किटाणूंना जास्त चांगलं अन्न मिळतं आणि हे खाऊन किटाणू लॅक्टिक ऍसिड सोडतात.
हेच लॅक्टिक एसिड आपल्या दातावरील थर वितळवण्यासाठी कारणीभूत होतं. हे सुरक्षा कवच वितळतं आणि दातात कीड निर्माण करू लागतो. दातावर छोटे छोटे काळे डाग येतात. म्हणून म्हणतात की जास्त गोड खाल्ल्याने दात किडायला सुरुवात होते.मित्रांनो दात किडू नयेत यासाठी गोड पदार्थ कमी प्रमाणात खावेत.
त्याप्रमाणे दाताला चिकटणारे किंवा चिटकून बसणारे पदार्थ कमी खाणं गरजेचं असतं. मैदा, साखर इत्यादीमुळे जास्त दाताला कीड लागते. त्याच प्रमाणात निसर्गात अशाही काही गोष्टी किंवा अशाही काही वस्तू आहेत ज्यांचा वापर करून आपण दाताला लागलेली कीड कमी करू शकतो.
मित्रांनो अनेकदा दाताच्या संबंधीच्या विविध प्रकारच्या समस्या आपल्याला निर्माण होत असतात. तुम्हाला पण अशा प्रकारच्या समस्या जर निर्माण होत असते. जसे की आपण जर कोणताही एखादा गोड पदार्थ खाल्ला तर अचानकपणे आपल्या दातात झिणझिण्या येणे.
दात किडणे, दात सडणे, नेहमी दात दुखीचा त्रास होणे, आपण जेवल्यानंतर जर नेहमी आपले दात दुखत राहणे, थंड पाणी पिल्यावर आपल्या दाताला ठणका मारणे. जर अशा प्रकारच्या विविध समस्या जर तुम्हाला होत असतील तर आज आम्ही तुमच्यासाठी या लेखामध्ये एक खास आणि सोपा असा उपाय घेऊन आलो आहोत.
मित्रांनो हा उपाय अत्यंत सोपा असा असून तुम्ही अगदी सहज पद्दतीने ही घरगुती उपाय करू शकता. हा उपाय केल्यामुळे दाता मधला असणारा किडा सहजपणे बाहेर येईल. तसेच दात दुखी च्या असलेले सर्व समस्या मुळापासून नष्ट होतील. कोणता आहे हा उपाय चला तर मग पाहूया.
आपल्याला यासाठी काय काय लागणार आहे व कशा प्रकारे हा उपाय करावा लागेल. हे सर्व आपण आज सविस्तरपणे पाहूया. आपल्याला जर दात दुखी ची समस्या नष्ट करायची असेल तर आपल्याला काही वस्तूंची आवश्यकता आहे. तर आपल्याला सर्वप्रथम वावडिंग लागणार आहे.
आरोग्यासाठी वावडिंगच्या बिया ह्या खूपच उपयुक्त मानल्या जातात. दिसायला या बिया अतिशय बारीक असतात. या आपल्या घरातल्या काळया मिऱ्या प्रमाणे दिसत असतात. आपल्याला एक वेळच्या उपायासाठी या बिया अर्धा ते एक चमचा लागणार आहे. या बिया घेऊन थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घालाव्यात आणि साधारणतः त्याला अर्ध्या तासापर्यंत पाण्यामध्ये भिजत घातल्या नंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी बिया घ्यायचे आहे.
त्यानंतर मित्रांनो एका सुती कपड्यांमध्ये वाळलेल्या या बिया बांधून त्याची पुरचुंडी बनवावी. त्यानंतर जो दात दुखत आहे त्यावर ही पुरचुंडी धरून ठेवावी. तुम्हाला तोंडामध्ये जर लाळ आलेली दिसेल तेव्हा ही लाळ न गीळता तुम्ही बाहेर थुंकून टाकावी.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरगुती उपाय करून दातातील जी काही कीड अळी आहे ती दोन मिनिटात बाहेर घालवू शकता. तर असा हा आयुर्वेदिक, घरगुती उपाय तुम्ही एकवेळ अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.