मित्रांनो कारलं हे कडू असतं असल्यामुळे ते बऱ्याच जणांना आवडत नाही. परंतु मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की कारल्याचे शरीराला खूप फायदे आहेत, पण त्याची चव कडू असते म्हणून आपल्यातील बरेच जण त्याचे सेवन करणे टाळतात, मित्रांनो तुम्हाला कारल्याचे किती फायदे आहेत एक माहीत नसेल किंवा जर आपण कारल्याचे योग्य पद्धतीने सेवन केले तर त्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात याबद्दलच सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो कारलं हे पोटाशी संबंधित कित्येक विकारांवर गुणकारी आहे, एवढचं नाही तर कारल्याचा ज्यूस प्यायल्याने शरीर तंदूरुस्त राहतं आणि त्वचेवरचं तेज सुद्धा वाढतं.
आणि त्याचबरोबर मित्रांनो कारलं हे रक्त शुद्धीकरणाचं काम करत असत. हे तर झाले काही मुख्य फायदे पण याव्यतिरिक्त अजुन कारल्याचे अनेक फायदे आहेत जे सर्वांना माहित असायला हवेत म्हणजे हे नावडतं कारलं सगळ्यांचं आवडतं होऊन स्वास्थ निरोगी राखण्यास मदत करेल. परंतु मित्रांनो आता असा प्रश्न निर्माण होतो की कारल्याचे सेवन आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आपल्यातील बऱ्याच जणांना कारल्याची भाजी खाणे आवडत नाही तर अशावेळी मित्रांनो जर आपण कारल्याचा रस काढून त्याचे सेवन केले किंवा कारल्याचा ज्यूस आपल्या घरामध्ये तयार केला आणि त्याचे थोडे दिवसांपर्यंत सेविंग केले तरी यामुळे आपल्या शरीराला त्याचे अनेक आश्चर्यदायीक फायदे होऊ शकतात.
मित्रांनो कारल्याचा ज्यूस हा सर्वच बाबतीत गुणकारी आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हा कारल्याचा ज्यूस वजन कमी करण्यात मोलाची भूमिका बजावतो. एका वैज्ञानिक अभ्यासानुसार कारल्याचा ज्यूस प्यायल्याने शरीरात इन्सुलिनची मात्र वाढते. इन्सुलिन नसांमध्ये अतिरिक्त ग्लुकोज जमा होऊ देत नाही. कारलं इन्सुलिनला सक्रीय करते. ज्यामुळे शरीरात तयार होणारी साखर मेदामध्ये परावर्तीत होत नाही. यामुळे चरबी व मेद नियंत्रित ठेवण्यात मदत होते. या शिवाय कारल्यामध्ये खूपच कमी कॅलरी असते ज्यामुळे कॅलरी नियंत्रणात राहते आणि वजन सुद्धा वाढत नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो कारल्याचा ज्यूस मधुमेहाचा त्रास कमी करण्यात मदत करतो.
पण खूपच कमी लोकांना माहित असतं कि या ज्यूस मध्ये अशी काय विशेष गोष्ट आहे ज्यामुळे कारलं साखर नियंत्रित ठेवण्यात उपयुक्त ठरतो. कारल्याचा ज्यूस रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मुख्य भूमिका बजावतो कारण यात दोन खास घटक मोमर्सिडीन आणि चॅराटिन असतात. हे रक्तातील वाढती साखर कमी करण्याचं महत्त्वपूर्ण काम करतात. म्हणून रिकाम्या पोटी मधुमेहाच्या रुग्णांनी कारल्याचा ज्यूस अवश्य प्यायला हवा आणि कारल्याच्या ज्यूस मध्ये डोळ्यांची दृष्टी वाढवणारा बीटा-कॅरोटिन हा घटक असतो.
आणि सोबतच मोमर्सिडीन आणि चॅराटिन रेटीना आर्टरीज मध्ये साखर जमा होण्यास प्रतिबंध करतात. म्हणून कारल्याचा ज्यूस हा फक्त डोळ्यांची दृष्टी वाढवण्यातच उपयुक्त नाही तर जास्त साखर वाढल्याने कमजोर होणारी दृष्टी सुद्धा सुस्थितीत आणण्यात मदत करतो. म्हणून ज्या कोणा व्यक्तीला डोळ्यांच्या नजरेची समस्या असेल त्यांनी न चुकता कारल्याच्या ज्यूसचे सेवन करायला हवे. आणि ज्या लोकांना पचनाशी संबंधित समस्या आहे त्यांच्यासाठी सुद्धा कारल्याचा ज्यूस खूप गुणकारी ठरतो. अपचन, गॅस, तोंडात आणि गळ्यात उष्णता निर्माण होणे, वारंवार जुलाब होणे यांसारख्या समस्या उद्भवत असतील तर त्यावर कारल्याचा ज्यूस हा एक साधा आणि प्रभावी उपाय आहे.
तर मित्रांनो असा हा चमत्कारिक कारल्याचा ज्यूस म्हणजेच रस तयार करत असताना आपल्याला सर्वात आधी दोन ते तीन स्वच्छ कारली घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती धुवून त्याचे छोटे छोटे बारीक तुकडे तयार करायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने त्याचा रस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि हा रस गाळून आपल्याला एका क्लासमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यावर थोडसं जिरं पावडर आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर याचे सेवन आपल्याला तीन दिवसांपर्यंत दररोज सकाळी काही न खाता पिता करायचा आहे दिवसांपर्यंत याचं सेवन केलं तर तुम्हाला वरील सर्व फायदे होऊ शकतात आणि त्याचबरोबर तुमच्या अनेक शरीरासंबंधी समस्या दूर होऊ शकतात.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.