मित्रांनो आजकाल सर्वांनाच केस पांढरे होण्याची समस्या भेडसावत आहे. तसेच अनेक लोकांचे पोट साफ होत नाही. त्यामुळे मग त्यांना फ्रेशपणा अजिबात वाटत नाही. परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की हा उपाय केल्यानंतर तुमचे जे काही पांढरे केस होण्याची समस्या आहे ती समस्या दूर होईल. तसेच तुमचे तुझे पोट आहे ते व्यवस्थितरित्या साफ होईल. तसेच बीपी देखील कंट्रोलमध्ये राहील.
मित्रांना अनेकांना पित्ताचा देखील त्रास खूपच जाणवतो. तर हा पित्ताचा त्रास या उपायामुळे कमी होऊन जाईल. तसेच बऱ्याच महिलांना मासिक पाळी मध्ये खूपच त्रास सहन करावा लागतो. तर या उपायामुळे जो काही मासिक पाळी मध्ये होणारा त्रास आहे या त्रासापासून देखील सुटका होणार आहे.
तर मित्रांनो या उपायासाठी आपण ज्या पदार्थाचा वापर करणार आहोत ते म्हणजे मित्रांनो काळे मनुके. काळया मनुक्याचा आपल्या आयुर्वेदिक दृष्ट्या खूपच महत्त्वाचे स्थान आहे. या काळया मनुक्याचा योग्य त्या पद्धतीने जर वापर केला तर अनेक आजारांपासून आपले सुटका होऊ शकते. तर मित्रांनो जर केस पांढरे होण्याची समस्या असेल किंवा पोट साफ न होण्याची समस्या असेल तर या सर्व समस्यांपासून काळी मनुके आपल्याला खूपच फायदेशीर ठरणार आहेत. तर मित्रांनो या काळा मनुक्यांचा वापर आपल्याला कसा करायचा आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आपल्या शरीरामध्ये प्रोटीन तसेच लोह यांची कमतरता असल्यामुळे आपले केस पांढरे होण्यास सुरुवात होतात. तसेच मित्रांनो बरेचजण जर गोळ्यांचे सेवन अति प्रमाणात करत असतील तर त्यांचे देखील केस पांढरे होण्यास सुरुवात होत असते. तसेच मित्रांनो अनेक लोक हे तणावपूर्ण वातावरण जगत असतात त्यामुळे देखील त्यांचे केस पांढरे होत असतात. तसेच अनेक जणांना ऍसिडिटीचा देखील त्रास असतो आणि या ऍसिडिटीच्या त्रासामुळे ते अनेक प्रकारच्या गोळ्या सेवन करतात आणि यामुळे देखील त्यांचे केस पांढरे होऊ शकतात.
अनेक जणांचे पोट साफ होत नाही आणि त्यामुळे मग शरीरामध्ये आपल्या विषारी घटक तसेच राहतात आणि हे विषारी घटक आपल्या रक्तामध्ये मिसळल्यामुळे देखील आपले केस पांढरे व्हायला सुरुवात होते.
तर मित्रांनो केसांना आपल्या जर योग्य ती पोषण घटक न मिळाल्यामुळे देखील आपले केस पांढरे व्हायला सुरुवात होते. तर मित्रांनो या सर्व समस्यांवर आज जो मी उपाय सांगणार आहे. हा काळ्या मनुक्यांचा हा उपाय तुम्ही मी सांगेन त्या पद्धतीने जर केला तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल. तुमचे केस पांढरे होण्याची समस्या दूर होईल. चला तर मग जाणून घेऊयात हा उपाय नेमका कोणता आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे.
तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायच आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला चार ते पाच थेंब लिंबूचा रस टाकायचा आहे. मित्रांनो लिंबूच्या रसामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. त्यामुळे मित्रांनो तीन ते चार थेंब तुम्हाला यामध्ये लिंबूचा रस टाकायचा आहे.
नंतर मित्रांनो मूठभर काळे मनुके आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन वेळेला धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला त्या पाण्यामध्ये ते काळे मनुके टाकायचे आहेत.
मित्रांनो हे रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर हे मनुके आपणाला मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचे आहेत. म्हणजेच मित्रांनो जे ग्लासभर पाणी आहे आणि ते मनुके आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने एक प्रकारचा ज्यूस करून घ्यायचा आहे.
रात्रभर मनुके त्या पाण्यामध्ये भिजल्यामुळे फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, विटामिन सी हे सर्व जे घटक आहेत हे सर्व घटक तयार होतात आणि हे सर्व घटक आपल्या केसांच्या वाढीसाठी, केसांचे पोषण होण्यासाठी तसेच केस पांढरे न होण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात.
लिंबुच्या चार ते पाच थेंबामुळे जे काळ्या मनुक्यातील जे गुणधर्म असतात ते गुणधर्म खूप जास्त प्रमाणात तयार होतात आणि हे आपला कोठा साफ होण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात.
मित्रांनो हा जो ज्यूस तयार झालेला आहे हा ज्यूस आपल्याला सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे. म्हणजेच काहीही न खाता पिता आपल्याला हा ज्यूस प्यायचा आहे आणि नंतर पंधरा मिनिटे आपणाला कोणत्याही पदार्थाचे सेवन करायचे नाही. हा उपाय आपल्याला दहा ते अकरा दिवस करायचा आहे आणि हा जर उपाय तुम्ही नियमितपणे केला तरीदेखील आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरते.
त्यामुळे मित्रांनो आपले केस देखील पांढरे होणार नाहीत. तसेच आपला कोठा देखील पूर्णतः साफ होईल. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. त्याचा कोणताही साईड इफेक्ट आपणाला होणार नाही.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.