जन्म महिन्यानुसार व्यक्तींचा स्वभाव व गुण….. या महिन्यातील माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात ?

Uncategorized

मित्रांनो, एखादे मूल जन्माला आले की त्याच्या जन्मलेल्या तारखे वरून व वारा वरून त्या व्यक्तीची सर्व कुंडली काढली जाते. की ज्यामध्ये तो व्यक्ती कसा असेल? पुढे भविष्यात तो काय करू शकेल व त्याचा स्वभाव कसा असतो? हे आपल्याला ज्योतिष शास्त्रामधून कळते. परंतु ज्याप्रमाणे जन्मलेल्या तारखेवरून व वारा वरून आपण त्या व्यक्तीची माहिती काढू शकतो. त्याचप्रमाणे त्याच्या जन्मलेल्या महिना वरून देखील त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व व गुण दोष आपल्याला ओळखता येतात.

 

याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. की ज्यामध्ये बारा महिने नुसार त्या व्यक्तीचा गुण व व्यक्तिमत्व कसे असेल? व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या जन्म तारखेवरून पाहिला जातो. मात्र व्यक्तीचं जन्म महिना ही, स्वभावासाठी तसंच त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी, महत्त्वाचा असतो. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर, या सर्व 12 महिन्यांत जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो, हे ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेले आहे ते आपण जाणून घेऊया.

 

जानेवारी महिन्यात जन्मलेले लोक, अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात. यांना शिकायला आणि, शिकवायला आवडते. इतरांच्या कमतरतेकडे, जास्त लक्ष देतात. हे लोक खूप कष्टाळू असतात, आणि खूप संवेदनशील असतात. इतरांना खुश कसे ठेवायचे, हे त्यांनाचांगले माहीत असते. अशाप्रकारे जानेवारी महिन्यातील व्यक्तींचे स्वभाव व गुण असतात.

 

फेब्रुवारी महिन्यातील व्यक्तीं यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते. ही माणसे फार बुद्धिमान, आणि चतुर असतात.आपले ध्येय गाठण्यासाठी, ते खूप मेहनत करतात. यांचे व्यक्तिमत्व मात्र, बदलत राहते.

हे नाती अगदी, प्रामाणिकपणे निभावतात. यांचा परिवार तसेच, मित्रपरिवार फार मोठा असतो.यांना मित्रासोबत फिरायला खूप आवडते, लहान छान गोष्टींवर यांना लवकर राग येतो.

 

मार्च या महिन्यात जन्मलेली माणसे, आकर्षक व्यक्तिमत्त्वाची असतात. यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही. हे यात, अतिशय शांतीप्रिय असतात. ही माणसे संवेदनशील आणि, सेवाभावी असतात. यांच्यातील विश्वासू गुणांमुळे, यांना मित्र जास्त असतात. यांना घराची सजावट करण्याची आवड असते.

 

एप्रिल या महिन्यात जन्मलेली व्यक्ती, जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते, या व्यक्ती इतरांची मदत करण्यास, नेहमी तत्पर असतात. यांना धाडसी कामे करायला आवडतात, यांची स्मरण शक्ती चांगली असते. कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन, पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते, परंतु हे मनाने खूप खंबीर असतात.

 

मे महिना, ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे, ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाची असतात.यांचे विचार स्थिर असून, इतरांना स्थळ प्रभावित करतात. हि माणसे फार कष्टाळू असतात. प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात, त्यांना राग लवकर येतो. जून महिना,ज्या लोकांचा जन्म जून मध्ये झाला, त्यांना चांगली दूरदृष्टी असते. ही माणसे विनम्र असतात. ही व्यक्ती उत्तम वक्ता असते.

 

सतत नवीन गोष्टी, यांच्या डोक्यात सुरू असतात. कामासंबंधी, जास्त विचार करीत असतात. अत्यंत संवेदनशील असतात, तसेच सतत बोलत राहणारी असतात. ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात, आणि अपेक्षा पूर्ण झाले नाही, तर राग आणि चिडचिड करतात. जुलै महिना, या महिन्यात ज्यांचा जन्म झाला, त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते. या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या, परंतु तणावात असताना, उत्तेजित होणारे असतात. ही माणसे खूप प्रामाणिक, आणि भावुक असतात. इतरांची चिंता करतात, लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात, व सहजपणे कुणालाही माफ करीत नाहीत.

 

ऑगस्ट या महिन्यात जन्मलेली माणसे, गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असता. यांचा स्वभाव मोहुन घेणारा असतो, सर्वांची काळजी करतात. प्रत्येकाला मदत करणे, हा त्यांचा स्वभाव असतो. यांना धाडसी कामे करायला आवडतात. ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात, तर कधी कधी फार अहंकारी होतात.सप्टेंबर महिना , ज्या लोकांचा जन्म सप्टेंबर मध्ये झालेला आहे, ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात. इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात. यांचे स्मरण शक्ती चांगली असते.ही माणसे फार बुद्धिमान असतात, तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात.

 

ऑक्टोबर या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना, गप्पा मारायला खूप आवडते. त्यांना नवीन मित्र करायला आवडते. यांना प्रवास करायला आवडतो. यांना कला आणि, साहित्याची खूप आवड असते. ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात, स्वप्नांच्या दूनीयेत रमायला यांना खूप आवडते.नोव्हेंबर महिना, या महिन्यात जन्म घेणारी माणसे, वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात. बुद्धिमत्ता उत्तम, आणि कल्पक असते.

 

त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते, या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात, खूप उत्सुकता असते. या महिन्यातील वेक्ती, कधीही हार मानत नाहीत, मात्र मनमिळाऊ असतात. डिसेंबर महिना, डिसेंबर मध्ये जन्मलेली व्यक्ती, खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असते. यांना खेळायला आणि, गप्पा मारायला आवडते. हे फार महत्त्वाकांक्षी असतात. यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे, त्यांचे प्रत्येकाशी पटते. ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात.

 

अशा प्रकारे प्रत्येक महिन्यानुसार ज्या त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व व त्या व्यक्तीचे गुणधर्म असतात. याची माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *