मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे रोग पाहायला मिळतात. म्हणजेच अनेक रोगांचा सामना आपल्याला करावा लागतो. आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे तसेच कामात सतत व्यस्त असल्यामुळे आपल्या आहाराकडे आपले विशेष लक्ष लागत नाही आणि त्यामुळे मग अनेक रोग आपल्याला उद्भवतात. अशा अनेक बऱ्याच रोगांवरती आपला खूप सारा पैसा देखील खर्च होतो. अनेक जणांना सांधेदुखीचा त्रास असतो तर कोणाला अंगदुखी, थकवा हा खूपच असतो.
तसेच बऱ्याच जणांना केस गळतीची समस्या देखील सतावत असते. तर या सर्वांवरती आज मी तुम्हाला अशा काही वनस्पतीचा फायदा सांगणार आहे म्हणजेच ही वनस्पती आपणाला या सर्व आजारांवरती फायदेशीर ठरणार आहे. तसे तर आपल्या आजूबाजूला परिसरात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात. त्यातीलच लाख मोलाची वनस्पती म्हणजे लांडगा म्हणजेच जळमणी. म्हणजेच प्रत्येक भागात याला वेगवेगळे नाव आहे तर ही वनस्पती आपल्याला खूपच फायदेशीर आहे.
तर आपल्यातील बऱ्याच जणांना सांधेदुखीचा खूपच त्रास आहे आपण अनेक प्रकारची औषधे घेतो तरीदेखील सांधेदुखीचा त्रास कमी होत नाही तर तुम्ही या वनस्पतीची वाळलेले फळ घेऊन ते दोन ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये उकळवायचे आहे. उकळल्यानंतर त्या पाण्यावरती तुम्हाला तेल आलेले दिसेल आणि हे तेल तुम्हाला बाजूला घ्यायचे आहे आणि आपल्याला सांधेदुखीचा त्रास आहे त्या सांधेदुखीवर आपणाला या तेलाने मालिश करायची आहे.
यामुळे तुमच्या सांधेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल. परंतु हे तेल तुम्ही लहान मुलांपासून बाजूला ठेवायचे आहे. म्हणजेच जर तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्ही हात धुतल्यानंतरच आपल्या मुलांना घ्यायचे आहे. म्हणजेच लहान मुलांपासून हे तेल तुम्ही लांब ठेवायचे आहे.
अनेक जणांचे केस खूपच गळत असतात तसेच अनेक जणांचे केस हे पांढरे झालेले पाहिलेच असतील तर आपण अनेक प्रकारचे उपाय करतो जेणेकरून आपले केस हे काळे बोर होतील. तसेच केस गळतीची समस्या कमी होईल. तर तुम्ही या वनस्पतीचे पाने आहेत ही पाने घेऊन या पानांची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट तुम्ही जर आपल्या केसांना लावली तर तुमची केस गळतीची समस्या दूर होईल.
तसेच पांढरे झालेले केस देखील काळे होतील आणि आठवड्यातून दोन ते तीन दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि दोन महिने जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची केस गळतीची समस्या नक्कीच दूर होईल.
बऱ्याच जणांना मूत्राशयाच्या बाबतीत खूपच त्रास सहन करावा लागतो. म्हणजेच मूत्राशयामध्ये जळजळ होणे असे अनेक प्रकारचे त्रास होतात.
तर तुम्ही या वनस्पतीच्या एका पानाचा रस जर करून पीला तर यामुळे मूत्राशयाचा त्रास नक्कीच कमी होईल. तसेच तुमच्या त्वचेवरती काही डाग असतील म्हणजेच काळे डाग किंवा त्वचा ही खूपच काळवंडलेली असेल तर तुम्ही त्वचेवरती या वनस्पतीच्या पानाचा रस करून लावला तर तुमची त्वचा खूपच तजेलदार दिसेल.
तुमच्यापैकी जर कोणाला डोकेदुखीचा त्रास असेल म्हणजेच काही केल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होत नसेल तर तुम्ही या वनस्पतीच्या पानांची पेस्ट करून ती जर डोक्याला लावली तर तुमच्या डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होणार आहे.
अनेक जणांना मूळव्याधाचा त्रास सहन करावा लागतो. अनेक आपण औषधे डॉक्टरांचा सल्ला घेतो तरी देखील मुळव्याधाचा त्रास आपल्याला कमी होत नाही. तर तुम्ही या वनस्पतीचा पानाचा अर्धा चमचा रस दह्याबरोबर दीड महिने खाल्ला तर तुम्हाला मुळव्याधचा त्रास नक्कीच कमी होईल. तसेच तुम्हाला अशक्तपणा असेल म्हणजेच थकवा असेल तर तुम्ही दररोज उपाशीपोटी एक पान खा यामुळे तुमचा अशक्तपणा थकवा नक्कीच दूर होईल.