देवांना कोणत्या दीवशी साफ करावे….नेवैद्य काय दाखवावा…..ह्या चुकांमुळेच देवांना उपवास घडतो…!!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्या भारतीय परंपरेनुसार आपल्या सर्वांचे घरामध्ये देवघर असतं. आपण त्याची मनोभावाने यांनी श्रद्धने दररोज पूजा अर्चना करत असतो. त्याचबरोबर स्नान देखील घालत असतो. कोणत्याही सण समारंभाच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो. त्याचबरोबर आपण दररोज सकाळी संध्याकाळी देखील घरातील देवांना नैवेद्य दाखवत असतो.

 

देवघरातील देवांची पूजा कशी करावी? हा नैवेद्य कसा दाखवावा? त्याचबरोबर तो देवासमोर किती वेळ ठेवावा? देवाला साफ कधी करावे? कशाप्रकारे करावे? कोणता चुका केल्यामुळे घरामध्ये दोष लागू शकतो व देवाला उपवास घडू शकते? या सर्वांबद्दलची माहिती आजच्या लेखनातून आपण जाणून घेणार आहोत.

 

प्रथम आपण पाहूया की, देवपूजा कशी करावी व देवांना स्नान कसे करावे? सर्वप्रथम आपण जेव्हा देवपूजा करणार आहोत त्या वेळेला आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचे आहे. घेतल्यानंतर एक तामान घेऊन त्या तामानामध्ये आपल्या घरातील सर्व देव काढून घ्यायचे आहेत. देव काढून घेतल्यानंतर जे काही आपण देवघरांमध्ये कापड अंथरलेला असतो ते काढून बदलून घ्यायचा आहे.

 

त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर दुसरे एक तामान घ्यावी. त्या तामाच्या वर कोणत्याही एका देवाला आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायचे आहे. उजव्या हातात एखाद्या क्लास मध्ये पाणी घेऊन त्या पाण्याने त्या देवाला धुवावे. देवाला तामनामध्ये ठेवू नये. कारण आपण एक एक करून प्रत्येक देवाला स्नान घालणार असतो.

 

ते सर्व देवांचे पाणी एकमेका देवाला लागू द्यायचे नाही. जर आपण एकाच पाण्यामध्ये सर्व देवांना धुतले तर त्याचा परिणाम आपल्यावर घरावर होऊ शकतो. धुवून झाल्यानंतर त्याला स्वच्छ कपड्याने पुसून त्याच्या जागेवर ठेवावे. धुतल्यानंतर त्याला कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी ठेवू नये. देवाच्या जागेवर त्याला नेऊन ठेवावे.

 

अशाप्रकारे सर्व देवांची पूजा करावी. एकत्रित सर्व देवांना धुऊ नये. एक एक करून देवांना धुवावे. देव पुसत असताना देखील एक काळजी नक्की घ्यायला हवी की, आपण एका देवाला ज्या बाजूने पुसलेले आहे त्यात बाजूने दुसऱ्या देवाला पुसु नये. असे एकत्रित देव धुतल्यामुळे किंवा पोचल्यामुळे आपल्या घरातील देवांना दोष लागू शकतात. त्यामुळे आपला घरातला त्रास होऊ शकतो.

 

त्याचबरोबर देवांच्या डोळ्याखाली काळे होऊ देऊ नका. कारण यामुळे देखील आपल्या घरात ते लोक डोळ्याचे आजार होण्यास सुरुवात होते. आपण देवांना अभिषेक घालत असतो त्याचबरोबर पितांबरीने घालत असतो. यामुळे तर देवांची झीज होते व ते काळे पडू लागतात. म्हणून आपल्याला अधून मधून ते साफ करणे खूप गरजेचे आहे.

 

साफ करताना हे कोणता दिवशी करावे व कधी करावे? हे आपण जाणून घेणार आहोत. देव साफ करताना ते देव लिंबू आणि दही व हळद याच्या साह्याने मऊ ब्रश घेऊन साफ करावे. हा जो ब्रश आहे तो देवांसाठी वेगळा असावा. आपणही साफसफाई आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा करू शकतो. फक्त गुरुवारचा वार सोडून आपण कोणत्याही दिवशी ही देवांची साफसफाई करू शकतो.

 

कारण गुरुवार हा गुरु ग्रहाची संबंधित असतो आणि गुरु ग्रह हा आपल्या प्रगतीशी संबंधित असतो. म्हणून गुरुवारच्या दिवशी कोणताही प्रकारचा सफाई करू नये. जर आपण गुरुवारच्या दिवशी देवांचे साफसफाई केली तर, आपला करत असलेल्या मेहनतीमध्ये आपल्याला यश येणार नाही आपल्या बरकतीत कमतरता निर्माण होईल.

 

तुमच्या घरातील देव तुम्ही एकादशीच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी साफ करू शकता. अमावस्येच्या दिवशी जर आपण हे देवा साफ केले तर, आपल्या घरातील आलक्ष्मी निघून जाते. दारिद्रता निघून जाते. देव साफ केला नंतर आपल्याला देवाला एकदा दुधाने स्नान घालायचे आहे. दुधाने स्नान घालून झाल्यानंतर एकदा स्वच्छ पाण्याने पुन्हा देवांना स्नान घालावे.

 

दुधाने स्नान घातल्यामुळे देव शांत होतात. स्नान घालून झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित पुसून त्यांच्या जागेवर ठेवा. गंध, हळदी, कुंकू लाववे.फुले अर्पित करावे. सर्व पूजा झाल्यानंतर आपण देवांना नैवेद्य दाखवत असताना नैवेद्य आपण देवासमोर किती वेळ ठेवावा तर, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो समोर पाच मिनिटे ठेवा आणि पाच मिनिटांनंतर ते नैवेद्याचे ताट घेऊन घरातील सर्व लोकांनी प्रसादाच्या रूपाने ग्रहण करावे.

 

अशा प्रकारे देवपूजा करू आपण देवाला नैवेद्य दाखवा व कोणत्याही प्रकारचे दोष आपल्या घरामध्ये निर्माण होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *