मित्रांनो, आता थंडीचा काळ सुरु झाला की. या काळात लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमजोर पडते आणि त्यांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून थंडीच्या दिवसांत लहान बाळांची जास्तीत जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. खासकरून एकदम लहान बाळ किंवा त्यासोबत पाच ते सहा महिने वयाचे बाळ यांची अधिकाधिक काळजी घ्यावी. जर थंडीच्या दिवसांत लहान बाळाला सर्दी, खोकला वा ताप येऊ लागला तर अशावेळी घरगुती उपाय कामी येतात. लहान बाळांना आपण औषधे, गोळ्या जास्त देऊ शकत नाहीत. त्यामुळे घरगुती व आयुर्वेदिक उपाय त्यांच्यासाठी सुरक्षित ठरतात.
तर मित्रांनो आज आपण या आजारांवर लहान बाळांवर तुम्ही काय काय उपचार करू शकता ते जाणून घेऊया. अनेक पालक अशावेळी सतत मुलाला डॉक्टरकडे घेऊन जातात. पण मित्रांनो डॉक्टरांनी लिहून दिलेली महागडे औषधे आणि गोळ्या यांचा अनेकदा परिणाम होत नाही.तर मित्रांनो अशा वेळी आपण आपल्या घरामध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय नक्की करून पाहू शकतो.मित्रांनो आज आपण अशा पद्धतीने एक छोटासा उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये केला त्यामुळे आपल्या घरामध्ये जे लहान बाळ आहे त्याच्या छातीमध्ये झालेला कफ दूर होईलच आणि त्याचबरोबर त्याच्या सर्दी, खोकला, ताप यांचा काही समस्या दूर होतील.
तर मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना तर वारंवार सर्दी, खोकला होत असेल, छातीमध्ये कफ तयार होत असेल तर अशावेळी कोणते उपाय प्रभावी ठरतात याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोन पदार्थांचा वापर करायचा आहे मित्रांनो या ज्या दोन वस्तू आहेत ते आपल्या घरामध्ये असतातच आणि जरी नसल्या तरी आपल्याला किराणामालाच्या दुकानांमध्ये अगदी पाच ते दहा रुपयाला या वस्तू अगदी सहजरित्या मिळून जाते तर मित्रांनो या दोन वस्तू आहेत त्या म्हणजे लवंग आणि मध मित्रांनो हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्याच्या पदार्थांमध्ये असतच.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो प्रमुख आणि अत्यंत प्रभावी असा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लवंग कारण मित्रांनो लवंगामध्ये दाहशामक आणि अॅन्टीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे वेदना, कफाचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे घशातील खवखव कमी होण्या सोबतच खोकल्यामुळे घसा दुखत असल्यास त्याच्या वेदना कमी होतात. लवंगामधील जे ऑईल असत ते श्वसनाचा मार्ग मोकळा करण्यास मदत करते आणि सुक्या खोकल्यामुळे होणारा त्रासही कमी करण्यास लवंग फायदेशीर ठरते. अॅन्टीव्हायरल आणि अॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कफ आणि अनावश्यक घटक बाहेर टाकून रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला साधारण तीन ते चार लवंगा घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे आहेत मित्रांनो या लवंग आहेत त्या व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत त्या भाजल्यानंतर जेव्हा फुगतील तेव्हा आपल्याला गॅस बंद करून त्या थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्याची पावडर आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने किंवा खलबत्त्याच्या साहाय्याने करून घ्यायचे आहे आणि याची पावडर तयार करून घेतल्यानंतर आपल्याला एका चमचावर साधारणता एक चिमूटभर लवंगाची पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये एक चमचा मध घ्यायचा आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने एक चिमूटभर लवंग आणि एक चमचा मध हे दोन्ही पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो याचे चाटण जे आहे ते लहान मुलांना सकाळी जेवल्यानंतर आणि रात्री जेवल्यानंतर अशा दोन वेळा द्यायचा आहे आणि याची जेव्हा सेवन आपण करणार आहोत तेव्हा त्यानंतर कोणताही इतर पदार्थ आपल्याला साधारणता एक तास तरी खायचं नाही तर अशा पद्धतीने दिवसातून दोन वेळा आहे चाटण आपल्याला घ्यायचा आहे यामुळे सर्दी खोकला आणि ताप या सर्व समस्या लवकरात लवकर दूर होण्यासाठी नक्की मदत होईल तर असा हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.