मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसावे असे वाटते. बऱ्याच स्त्रिया आणि पुरुष पार्लर मध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात. परंतु प्रत्येकालाच असे पैसे खर्च करणे शक्य नसते किंवा एखाद्या वेळेस पैसे असूनही पार्लरमध्ये वेळेअभावी जाता येत नाही. पार्लरमध्ये जाऊन बऱ्याच प्रकारच्या 1 ट्रीटमेंट घेतात आणि चेहरा सुंदर गोरा मुलायम करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी मित्रांनो खिसा मात्र रिकामा करावा लागतो. परंतु आज आम्ही घरीच करता येणारा साधा सोपा उपाय सांगणार आहोत या उपायाने तुमचा चेहरा सुंदर, मुलायम, गोरा आणि सतेज दिसेल. चारचौघात तुम्ही उठून दिसाल. यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची अजिबात आवश्यकता नाही.
मैत्रिणींनो आम्ही जो फेशियल पॅक सांगणार आहोत तो चेहऱ्यासाठी खास असून यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग धब्बे, वांगाचे डाग हे सर्व कमी होणार आहे आणि हा जो फेशियल पॅक आहे महिलांसाठी एकदम इफेक्टिव आहे आणि त्याचबरोबर हा फेशियल पॅक पुरुष सुद्धा आपल्या चेहऱ्यावर लावू शकतात तर मित्रांनो कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यानंतर त्याचा वापर कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊयात.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला जे महत्त्वाचे दोन पदार्थ लागणार आहेत ते म्हणजे कॉफी आणि दुध लागणार आहे. एका बाऊलमधे एक चमचा कॉफी घ्या आणि त्यात दोन चमचे दूध घाला. दोन्ही पदार्थ चमच्याने एकजीव करून घ्या आणि हे दोन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ घ्यायचा आहे मित्रांनो बेसन पीठ हे आपल्या चेहऱ्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी खूप मदत करतो आणि म्हणूनच यासाठी आपल्याला एक चमचा बेसन पीठ ही त्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये शेवटचा पदार्थ आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजे हळद.
मित्रांनो हळद हे आपल्या चेहऱ्यावर असणारे डाग कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपला चित्रा गोऱ्या करण्यासाठी खूपच मदत करतो म्हणूनच अर्धा चमचा हळद सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि हे पदार्थ व्यवस्थितपणे एकत्र करून घेतल्यानंतर जे पॅक तयार होईल हे पॅक आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे.
तर मित्रांनो हा झाला चेहरा स्वच्छ करणाऱा क्लींजिंग पॅक. तयार झालेला क्लींजिंग पॅक चेहर्यावर चोळून चोळून लावा. हा पॅक आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती सर्क्युलार मोशन मध्ये एक ते दोन मिनिट हळुवारपणे मसाज करून लावायचा आहे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे.
आणि मित्रांनो या उउपायासाठी तुम्ही कॉफी कोणत्याही ब्रँडची वापरू शकता. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात आणि त्यामुळे चेहऱ्यावरील रक्तप्रवाह वाढतो. चेहरा नितळ व गोरा स्वच्छ होतो. चेहऱ्यावरील वांगाचे डाग, काळे धब्बे निघून जाण्यासाठी कॉफी जादूई काम करते. तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने कॉफीचा आणि त्याचबरोबर दुधाचा वापर करून आपल्याला हा एक छोटासा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे मित्रांनो हा उपाय तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन वेळा करू शकता यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जी काही धूळ किंवा प्रदूषण आहे हे सर्व निघून जाईल आणि तुमचा चेहऱ्यावर असणारे काळे डाग वांग हेही लवकरात लवकर दूर होण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.