सोन्या-चांदीचे दागिने परिधान करायला सगळ्यांनाच आवडतं. पण चांदीचे दागिने वापरात आल्यानंतर त्याची चमक कमी होते आणि हे दागिने काळे पडतात.फक्त दागिनेच नाही तर भांडी, मूर्तीदेखील कालांतराने काळसर होतात. पण काळसर झाल्याने या वस्तू खराब होत नाही किंवा त्याचं मूल्य कमी होत नाही. या दागिन्यांची, भांड्यांची चमक परत कशी आणायची असा प्रश्न अनेकांना पडतो याचंच उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला सोनाराकडे जायची गरज नाही तर घरगुती गोष्टींचा वापर करून या दागिन्यांची चमक तुम्ही पुन्हा मिळवू शकता आणि चांदीच्या दागिन्यांची आणि भांड्याची चमक डोळ्यांना सोन्यासारखीच सुख देते.
आणि मित्रांनो इतर धातूंपेक्षा चांदी अधिक नाजूक असते म्हणून ती त्वरीत घाण आणि काळी होते. आपण घरी सोप्या मार्गाने चांदी चमकू शकता, तर मित्रांनो आपण असाच एक छोटासा घरगुती उपाय पाहणार आहोत हा उपाय जर मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये गेला तर यामुळे आपल्या घरामध्ये जी काही चांदीच्या वस्तू आहेत किंवा दागिने किंवा जर देव असतील तर तेही तुम्ही याने स्वच्छ करू शकता तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये ज्या काही चांदीच्या वस्तू आहेत की ज्या आता काळपटलेले आहेत किंवा त्याच्यावर काळ्या रंगाचा थर आलेला असेल तर अशावेळी मित्रांनो आज जो आपण उपाय पाहणार आहोत तो पाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा आणि त्यावर आलेला काळपटपणा घालवा.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रमुख जो घटक लागणार आहे तो म्हणजे ॲल्युमिनियम कॉइल मित्रांनो अल्युमिनियम कॉइल आपल्या सर्वांना माहीतच आहे आपण ज्यावेळी बाहेरून अन्न घेऊन येतो किंवा बाहेरून रोटी किंवा चपाती आपल्या घरामध्ये आणतो त्यावेळी आपल्यालाही चपाती किंवा रोटी त्या ॲल्युमिनियमच्या म्हणजे चांदी सारखे दिसणाऱ्या एका कागदामध्ये गुंडाळून दिली जाते त्याच कागदाला मित्रांनो असे म्हणतात तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला ए फॉर साईज ॲल्युमिनियम कॉइल पेपर लागणार आहेत आणि मित्रांनो या कॉलची आपल्याला समान चार भाग तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याला चुरगाळून आपल्याला त्याची छोटी छोटी चार बॉल तयार करून घ्यायचे आहेत.
तर मित्रांनो अशा पद्धतीने त्या कागदाचे छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला दुसरीकडे गॅसवर एक ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवायचा आहे आणि हे पाणी थोडं उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ते आपण जे ॲल्युमिनियमचे गोळे केले होते ते चारी गोळ्या आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो ते आपल्याला चमच्याच्या साह्याने किंवा इतर कोणत्याही वस्तूच्या सहाय्याने त्या उकळणाऱ्या पाण्यामध्ये आत बुडवायचे आहेत म्हणजे ते गोळ्या आपल्याला पाण्याच्या आत बुडवायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो ज्या काही तुमच्या घरामध्ये काळवटलेल्या चांदीच्या वस्तू आहेत किंवा दागिने आहेत ते आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे.
मित्रांनो हे चांदीचे दागिने किंवा वस्तू टाकल्यानंतरही आपल्याला पाच ते दहा मिनिटे गॅस तसाच सुरू ठेवू द्यायचा आहे ज्यावेळी पाणी खूप उकळेल त्यावेळी त्या चांदीच्या वस्तूंवर जी काही घाण आहे किंवा काळे डाग आहेत ते निघून जातील आणि तो ॲल्युमिनियमचा जो कागद होता त्यावर ते सर्व जाऊन चिकटतील आणि मित्रांनो अशा पद्धतीने तुमची चांदीची वस्तू किंवा दागिने स्वच्छ होतील आणि तरीही तुम्हाला अजून या चांदीच्या वस्तू काळ्याच आहेत असे वाटत असेल तर अशावेळी तुम्ही त्या उकळणाऱ्या पाण्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा डिटर्जंट पावडर टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा पाच ते दहा मिनिटांसाठी तुम्हाला हे पाणी उकळण्यासाठी ठेवायचा आहे.
आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दिसून येईल की तुमची चांदीची जी काही दागिने वस्तू आहेत त्या चमकत आहेत आणि मित्रांनो त्या गरम पाण्यामधून आपल्याला या वस्तू काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या काही वस्तू आहेत त्या गार पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या दात घासायचा जो खराब ब्रश असतो म्हणजे तुटप्रश्न त्याने आपल्याला पुन्हा एकदा या चांदीच्या वस्तू घासून घ्यायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही काळवटलेल्या चांदीच्या वस्तू किंवा दागिने किंवा इतर कोणतेही चांदीचे साहित्य असेल तर ते तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये घरच्या घरी चमकवून घेऊ शकता.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.